सातपुड्यातील भटकंती

Submitted by चिंतामण पाटील on 12 February, 2016 - 01:38

*चिंतामण पाटील***
इको टूरिझमला गती मिळून
सातपुडयातील वनदर्शनासोबत पर्यटकांना
येथील आदिवासींचे समृध्द
जीवन पाहता येईल. इकडे आपल्या
ग्रामीण-शहरी भागात
होळीचा गुलाल उधळला जातो, तेव्हा या
भागात भोंगऱ्या बाजार गजबजू लागतो.
रंगीबेरंगी पेहराव, नाचत येणारे
आदिवासी तरुण-तरुणींचे जथे मन
वेधून घेतात. ही नयनरम्य
संस्कृती पाहायला यावल, अडावद, पालच्या
भोंगऱ्या बाजारात परदेशी
पर्यटकही येतात.
साग आणि अंजनाची दाट
झाडीची अमाप निसर्गसंपदा लेवून
खान्देश-विदर्भासाठी मान्सूनचा पाऊस अडवायला
सातपुडा उभा आहे. परंतु 'तुझे आहे
तुजपाशी, परी जागा
भुललासी' ह्या
उक्तीसारखी गत होऊन
ही पर्वतराजी दुर्लक्षित
राहिल्याने, डोळयांचे पारणे फेडणाऱ्या वनसंपदेला दुष्ट
प्रवृत्तीची नजर
लागली. साग-अंजनवर
कुऱ्हाडीचे घाव बसले. पण
वेळीच जाग आल्याने बराचसा भाग त्या
दुष्प्रवृत्तीला ओरबाडता आला
नाही. सह्याद्रीच्या रांगांमधल्या
निसर्गसंपदेपाठोपाठ पर्यटकांना पर्यटनाचा पुरेपूर आनंद
सातपुडा देऊ शकतो हे दिसते. पट्टेदार वाघाचे अस्तित्व
नक्की झाल्याने ताडोबा, मेळघाटची
सफारी करणाऱ्यांसाठी आता यावल
अभयारण्यही खुणावू लागले आहे.
सातपुडा पर्वतराजीत 175 चौरस
किलोमीटर एवढया विस्तृत पट्टयात यावल
अभयारण्य विस्तारले आहे. 20-25
वर्षांपूर्वी जंगलतोड सुरू झाली.
'नवाड'च्या लालसेपोटी सुरू झालेल्या या
जंगलतोडीने हे अभयारण्य बकाल होते
की काय, असे चित्र निर्माण झाले होते.
1969 साली यावल अभयारण्याची
घोषणा झाली. हे अभयारण्य जंगलसंपदा व
वन्यजीवांचे अस्तित्व यामुळे जगाच्या नकाशावर
ठळकपणे उठून दिसते.
पूर्वीपासूनच मेळघाट ते थेट आहवा डांगच्या
जंगलापर्यंत वाघाचा संचार होता, असे
निसर्गप्रेमी मानतात. हा मेळघाट, अंबाबरवा,
वढोदा वनसंवर्धन, पाल-यावल अभयारण्य, अनेरडॅम
अभयारण्य, तोरणमाळ ते गुजरातमधील
शूलपाणेश्वर अभयारण्य असा वाघाचा नैसर्गिक कॉरिडॉर
आहे. मधल्या काळात बाधित झालेला हा कॉरिडॉर पुन्हा
पुनरुज्जीवित झाल्यास या अभयारण्याला वैभव
प्राप्त होईल.
निसर्ग पर्यटनाला अलीकडे प्रोत्साहन मिळू
लागले आहे. यावल अभयारण्याकडे म्हणूनच अधिक
लक्ष दिले जाऊ लागले आहे. शासनाचा
वन्यजीव विभाग त्यासाठी पुढे
आला आहे. आदिवासी उपयोजना
क्षेत्रविकास योजनेतून सात कोटी रुपये खर्चाचा
विकास आराखडा तयार करण्यात आलाय. त्या माध्यमातून पाल
आणि सुकी धरण परिसराचा विकास केला जाणार
आहे. या अभयारण्यात निसर्गप्रेमींना
भटकंती सोपी
व्हावी यासाठी शासनाचा वनविभाग
पुढे येत आहे. तशी यंत्रणा
उभी राहत आहे. या भागातील
रस्त्यांची कामेही
हाती घेतली जात आहेत.
पर्यटकांसाठी या अभयारण्याच्या परिसरात भरपूर
पाहण्यासारखे आहे. या अभयारण्यात पाल हे एक
हिलस्टेशन आहे. येथूनच जंगल
भ्रमंतीला प्रारंभ होतो. पालहूनच पुढे
जामन्या-गाडरया रेंजमध्ये प्रवेश होतो. लंगडा आंबा भागात
पर्यटकांना राहण्याची सोय आहे. तसेच
पाल, देवझरी, उनपदेव, चारठाणा येथे रेस्ट
हाउसची सोय आहे. जामन्या, कर्जाना येथे
शासकीय आश्रमशाळा आहेत.
विनंती केल्यास निवासाची व्यवस्था
होऊ शकते. डोलारखेडा-वढोदा वनक्षेत्रात वाघाचे दर्शन
होऊ शकते. तेथे पूर्वपरवानगी घेऊन जाता
येते. संपूर्ण अभयारण्य भटकायचे झाल्यास
वनविभागाची लेखी
परवानगी घ्यावी लागते. जळगाव
आणि यावल विभागाचे उपवन संरक्षक, तर
वन्यजीव विभागाचे साहाय्यक वनसंरक्षक
परवानगी देतात. अद्याप या अभयारण्याचा
पर्यटनाच्या हेतूने विचार झाला नव्हता. त्यामुळे जंगल
फिरवून आणायला कोणी गाइड तेथे
नाहीत. मात्र जंगलातले रस्ते
दाखविण्यासाठी वनविभागाचे गार्ड मदत करतात.
येथे खास जंगल सफारीसाठीच्या
वाहनांची सोय नाही. परंतु
सध्या जे पर्यटक येतात, त्यांना यावल अगर रावेर येथे
खाजगी वाहने मिळू शकतात.
इको टूरिझमला गती मिळून
सातपुडयातील वनदर्शनासोबत पर्यटकांना
येथील आदिवासींचे समृध्द
जीवन पाहता येईल. इकडे आपल्या
ग्रामीण-शहरी भागात
होळीचा गुलाल उधळला जातो, तेव्हा या
भागात भोंगऱ्या बाजार गजबजू लागतो.
रंगीबेरंगी पेहराव, नाचत येणारे
आदिवासी तरुण-तरुणींचे जथे मन
वेधून घेतात. ही नयनरम्य
संस्कृती पाहायला यावल, अडावद, पालच्या
भोंगऱ्या बाजारात परदेशी
पर्यटकही येतात. या भागात पर्यटनाला
गती मिळू लागल्यास जामन्या
येथील ग्राम परिस्थितिकीय विकास
समिती पर्यटकांच्या निवासासाठी तंबू
खरेदी करणार आहे. स्थानिक तरुणांना गाइड
म्हणून तयार केले जाणार आहे. तसेच येणाऱ्या
पर्यटकांना येथे मक्याची भाकरी,
ठेचा, मक्याचा घाटा ह्या आदिवासी मेनूचा स्वाद
चाखता येईल.
अभयारण्याच्या ह्या विस्तृत पट्टयात भरपूर बघण्यासारखे
आहे. ज्यांना वन्यजीव पाहायचे आहेत,
त्यांनी अनेर व सुकी
ही धरणे गाठावी. या धरणाच्या
आसऱ्याला अनेक वन्यजीव येतात. तसेच
नेहमीच वस्तीला असणाऱ्या
रानपिंगळयासोबतच गरुड, सुतार या पक्ष्यांसह 200हून
अधिक प्रजातींचे पक्षी येथे
आढळतात. सुकी धरण परिसरात तर अनेक
पाहुणे पक्षीही दिसतात. या
अभयारण्यात अलीकडेच पट्टेदार वाघाचा वावर
आढळलाय. बिबटया तर अनेकदा दिसतो. तसेच अस्वल,
कोल्हे, लांडगे, रानकुत्रे, रानडुक्कर, सशकर्ण
(रानमांजर) ह्या श्वापदांसोबतच चिंकारा
हरीण, चितळ, चौशिंगा, सांबर,
नीलगायही नजरेस पडतात.
साग, अंजनासोबत ऐन, शिसव, तिवस, खैर, हिरडा,
बेहडा, तेंदू, आवडयाची दाट
झाडी आहे. पावसाळयात जामन्या, कर्जाने,
पाल, उमर्टी-सत्रासेनच्या डोंगररांगात
होणारी ढगांची दाटी
पाहिल्यावर आपण महाबळेश्वर-लोणावळयात आहोत
असा भास होतो. हिवाळयातही हे डोंगर
धुक्याची दुलई ओढतात.
हा भाग नुसताच निसर्गरम्य नाही, तर येथे
पुरातन देवस्थानेही भरपूर आहेत.
मुक्ताईनगरच्या संत मुक्ताबाईचे दर्शन घेऊन पुढे पुरातन
चांगदेव मंदिर पाहायची ओढ टाळता येत
नाही. सातपुडयाच्या गाभाऱ्यात
मनुदेवीचे दर्शन मन प्रसन्न करते. तिथून
जवळच उष्ण पाण्याच्या झऱ्यासाठी प्रसिध्द
उनपदेव. ज्यांना आणखी पुढे जायचे, ते मध्य
प्रदेश-महाराष्ट्राच्या सीमेवरच्या
उंचीवरील खुपसदेव व
ताजुद्दीन अवलियाचे दर्शन करून येतात.
देवदर्शनातला थरार अनुभवायचा असेल, तर शिरवेलचा
महादेव आणि गोरक्षनाथ मंदिर आहेच. यातला शिरवेलचा
महादेव म.प्र.तल्या खरगोण जिल्ह्यात आहे, तर
गोरक्षनाथला जायचे तर मुक्ताईनगर
तालुक्यातील कुऱ्हाकाकोडयापासून जोंधनखेडा
व राजुरा या मार्गांनी जाता येते. या
दोन्ही ठिकाणाहून हे अंतर सहा ते
सात कि.मी. पायी जावे लागते.
दऱ्याखोऱ्यांच्या वाटा तुडविण्याची आवड असलेले
राजुरामार्गे जातात. हरिपुऱ्याहून आपण निघून लंगडा
आंबाच्या रस्त्यावर असतो, तेव्हा
सातपुडयातील सर्वाधिक उंच शिखराचे दर्शन
होते. पंचपांडव आणि बुरडीबोरी
बरडी ही शिखरे 3200
फुटाहूनही जास्त
उंचीची आहेत.
गिर्यारोहणाची आवड असणारे स्तिमित
व्हावेत असे हे पॉइंट आहेत. पालपासून जवळ
असलेल्या चिंचाटी व्ह्यू पॉइंटवरून
सातपुडयाचा पायथा न्याहाळता येतो. इतकी
सगळी ठिकाणे यावल-पाल अभयारण्याच्या
कुशीत असावीत आणि सगळा
महाराष्ट्र त्यापासून अनभिज्ञ राहावा, हे केवळ
दुर्दैवच. जनतेपर्यंत ही
माहिती पोहोचू नये या धोरणाला विवेकच्या
एका वाचकाने 'रेशनकार्ड संस्कृती' असा शब्द
दिला होता. रेशनकार्ड संस्कृती म्हणजे
सगळे ठरावीक मर्यादेत. महाराष्ट्र टूरिझम
खात्याने हे रेशनकार्ड धोरण झटकले, तर यावल-पालच्या
अभयारण्याची सफर पर्यटकांना
सोपी होऊ शकेल.
या अभयारण्याच्या सफरीला यायचे असेल तर
कोठूनही यायचे असेल तर जळगाव हे
मध्यवर्ती ठिकाण आहे. येथे थांबायला
शासकीय विश्रामगृहे आहेत.
मोठी हॉटेल्ससुध्दा तुमच्या स्वागताला
आहेत. जळगाहून यावलला जाता येते. तेथून
सातपुडयाच्या रांगेत विस्तारलेल्या अभयारण्यात प्रवेश करता
येते. काही ठिकाणांना जाण्यासाठी
चोपडा, रावेर, मुक्ताईनगरही
गाठावी लागतात. या! सातपुडा
स्वागतासाठी हात पसरून उभा आहे!
8805221372

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडेल यायला खरच .... 2-3 दिवसांचा plan करायला मदत करु शकाल का ? रहाण्या सारखी कोण्ती ठिकाणे आहेत? मुम्बईहुन train का???

पाटील साहेब, जरा लेख पुन्हा पॅरा टाकून प्रकाशित कराल काय?
म्हणजे बाकीच्यांना पण ही माहिती मिळेल.

सातपुड्यातील भटकंती
चिंतामण पाटील | 12 February, 2016 - 12:08
*चिंतामण पाटील***
इको टूरिझमला गती मिळून सातपुडयातील वनदर्शनासोबत पर्यटकांना येथील आदिवासींचे समृध्दजीवन पाहता येईल. इकडे आपल्या ग्रामीण-शहरी भागात होळीचा गुलाल उधळला जातो, तेव्हा या भागात भोंगऱ्या बाजार गजबजू लागतो.रंगीबेरंगी पेहराव, नाचत येणारेआदिवासी तरुण-तरुणींचे जथे मन वेधून घेतात. ही नयनरम्य संस्कृती पाहायला यावल, अडावद, पालच्या भोंगऱ्या बाजारात परदेशी पर्यटकही येतात. साग आणि अंजनाची दाट झाडीची अमाप निसर्गसंपदा लेवून खान्देश-विदर्भासाठी मान्सूनचा पाऊस अडवायला सातपुडा उभा आहे. परंतु 'तुझे आहे तुजपाशी, परी जागा भुललासी' ह्या उक्तीसारखी गत होऊनही पर्वतराजी दुर्लक्षित राहिल्याने, डोळयांचे पारणे फेडणाऱ्या वनसंपदेला दुष्ट प्रवृत्तीची नजर लागली. साग-अंजनवर कुऱ्हाडीचे घाव बसले. पण वेळीच जाग आल्याने बराचसा भाग त्या दुष्प्रवृत्तीला ओरबाडता आला नाही. सह्याद्रीच्या रांगांमधल्या निसर्गसंपदेपाठोपाठ पर्यटकांना पर्यटनाचा पुरेपूर आनंद सातपुडा देऊ शकतो हे दिसते. पट्टेदार वाघाचे अस्तित्व नक्की झाल्याने ताडोबा, मेळघाटची सफारी करणाऱ्यांसाठी आता यावल अभयारण्यही खुणावू लागले आहे.

सातपुडा पर्वतराजीत 175 चौरस किलोमीटर एवढया विस्तृत पट्टयात यावल अभयारण्य विस्तारले आहे. 20-25 वर्षांपूर्वी जंगलतोड सुरू झाली. 'नवाड'च्या लालसेपोटी सुरू झालेल्या या जंगलतोडीने हे अभयारण्य बकाल होते की काय, असे चित्र निर्माण झाले होते. 1969 साली यावल अभयारण्याची घोषणा झाली. हे अभयारण्य जंगलसंपदा व वन्यजीवांचे अस्तित्व यामुळे जगाच्या नकाशावर ठळकपणे उठून दिसते. पूर्वीपासूनच मेळघाट ते थेट आहवा डांगच्या जंगलापर्यंत वाघाचा संचार होता, असे निसर्गप्रेमी मानतात. हा मेळघाट, अंबाबरवा, वढोदा वनसंवर्धन, पाल-यावल अभयारण्य, अनेरडॅम अभयारण्य, तोरणमाळ ते गुजरातमधील शूलपाणेश्वर अभयारण्य असा वाघाचा नैसर्गिक कॉरिडॉर आहे. मधल्या काळात बाधित झालेला हा कॉरिडॉर पुन्हा पुनरुज्जीवित झाल्यास या अभयारण्याला वैभव प्राप्त होईल.
निसर्ग पर्यटनाला अलीकडे प्रोत्साहन मिळू लागले आहे. यावल अभयारण्याकडे म्हणूनच अधिक लक्ष दिले जाऊ लागले आहे. शासनाचा वन्यजीव विभाग त्यासाठी पुढे आला आहे. आदिवासी उपयोजना क्षेत्रविकास योजनेतून सात कोटी रुपये खर्चाचा विकास आराखडा तयार करण्यात आलाय. त्या माध्यमातून पाल आणि सुकी धरण परिसराचा विकास केला जाणार आहे.

या अभयारण्यात निसर्गप्रेमींना भटकंती सोपी व्हावी यासाठी शासनाचा वनविभाग पुढे येत आहे. तशी यंत्रणा उभी राहत आहे. या भागातील रस्त्यांची कामेही हाती घेतली जात आहेत. पर्यटकांसाठी या अभयारण्याच्या परिसरात भरपूर पाहण्यासारखे आहे. या अभयारण्यात पाल हे एक हिलस्टेशन आहे. येथूनच जंगल भ्रमंतीला प्रारंभ होतो. पालहूनच पुढे जामन्या-गाडरया रेंजमध्ये प्रवेश होतो. लंगडा आंबा भागात पर्यटकांना राहण्याची सोय आहे. तसेच पाल, देवझरी, उनपदेव, चारठाणा येथे रेस्ट हाउसची सोय आहे. जामन्या, कर्जाना येथे शासकीय आश्रमशाळा आहेत. विनंती केल्यास निवासाची व्यवस्था होऊ शकते. डोलारखेडा-वढोदा वनक्षेत्रात वाघाचे दर्शन होऊ शकते. तेथे पूर्वपरवानगी घेऊन जाता येते. संपूर्ण अभयारण्य भटकायचे झाल्यास वनविभागाची लेखी परवानगी घ्यावी लागते. जळगाव आणि यावल विभागाचे उपवन संरक्षक, तर वन्यजीव विभागाचे साहाय्यक वनसंरक्षक परवानगी देतात. अद्याप या अभयारण्याचा पर्यटनाच्या हेतूने विचार झाला नव्हता. त्यामुळे जंगल फिरवून आणायला कोणी गाइड तेथे नाहीत. मात्र जंगलातले रस्ते दाखविण्यासाठी वनविभागाचे गार्ड मदत करतात. येथे खास जंगल सफारीसाठीच्या वाहनांची सोय नाही. परंतु सध्या जे पर्यटक येतात, त्यांना यावल अगर रावेर येथे खाजगी वाहने मिळू शकतात. इको टूरिझमला गती मिळून सातपुडयातील वनदर्शनासोबत पर्यटकांना येथील आदिवासींचे समृध्द जीवन पाहता येईल.

इकडे आपल्या ग्रामीण-शहरी भागात होळीचा गुलाल उधळला जातो, तेव्हा या भागात भोंगऱ्या बाजार गजबजू लागतो.रंगीबेरंगी पेहराव, नाचत येणारेआदिवासी तरुण-तरुणींचे जथे मन वेधून घेतात. ही नयनरम्य संस्कृती पाहायला यावल, अडावद, पालच्या भोंगऱ्या बाजारात परदेशी पर्यटकही येतात. या भागात पर्यटनाला गती मिळू लागल्यास जामन्या येथील ग्राम परिस्थितिकीय विकास समिती पर्यटकांच्या निवासासाठी तंबू खरेदी करणार आहे. स्थानिक तरुणांना गाइड म्हणून तयार केले जाणार आहे. तसेच येणाऱ्या पर्यटकांना येथे मक्याची भाकरी, ठेचा, मक्याचा घाटा ह्या आदिवासी मेनूचा स्वाद चाखता येईल.

अभयारण्याच्या ह्या विस्तृत पट्टयात भरपूर बघण्यासारखे आहे. ज्यांना वन्यजीव पाहायचे आहेत, त्यांनी अनेर व सुकी ही धरणे गाठावी. या धरणाच्या आसऱ्याला अनेक वन्यजीव येतात. तसेच नेहमीच वस्तीला असणाऱ्या रानपिंगळयासोबतच गरुड, सुतार या पक्ष्यांसह 200हून अधिक प्रजातींचे पक्षी येथे आढळतात. सुकी धरण परिसरात तर अनेक पाहुणे पक्षीही दिसतात. या अभयारण्यात अलीकडेच पट्टेदार वाघाचा वावर आढळलाय. बिबटया तर अनेकदा दिसतो. तसेच अस्वल, कोल्हे, लांडगे, रानकुत्रे, रानडुक्कर, सशकर्ण (रानमांजर) ह्या श्वापदांसोबतच चिंकारा हरीण, चितळ, चौशिंगा, सांबर, नीलगायही नजरेस पडतात. साग, अंजनासोबत ऐन, शिसव, तिवस, खैर, हिरडा, बेहडा, तेंदू, आवडयाची दाट झाडी आहे. पावसाळयात जामन्या, कर्जाने, पाल, उमर्टी-सत्रासेनच्या डोंगररांगात होणारी ढगांची दाटी पाहिल्यावर आपण महाबळेश्वर-लोणावळयात आहोत असा भास होतो. हिवाळयातही हे डोंगर धुक्याची दुलई ओढतात.

हा भाग नुसताच निसर्गरम्य नाही, तर येथे पुरातन देवस्थानेही भरपूर आहेत. मुक्ताईनगरच्या संत मुक्ताबाईचे दर्शन घेऊन पुढे पुरातन चांगदेव मंदिर पाहायची ओढ टाळता येत नाही. सातपुडयाच्या गाभाऱ्यात मनुदेवीचे दर्शन मन प्रसन्न करते. तिथून जवळच उष्ण पाण्याच्या झऱ्यासाठी प्रसिध्द उनपदेव. ज्यांना आणखी पुढे जायचे, ते मध्य प्रदेश-महाराष्ट्राच्या सीमेवरच्या उंचीवरील खुपसदेव व ताजुद्दीन अवलियाचे दर्शन करून येतात. देवदर्शनातला थरार अनुभवायचा असेल, तर शिरवेलचा महादेव आणि गोरक्षनाथ मंदिर आहेच. यातला शिरवेलचा महादेव म.प्र.तल्या खरगोण जिल्ह्यात आहे, तर गोरक्षनाथला जायचे तर मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हाकाकोडयापासून जोंधनखेडा व राजुरा या मार्गांनी जाता येते. या दोन्ही ठिकाणाहून हे अंतर सहा ते सात कि.मी. पायी जावे लागते. दऱ्याखोऱ्यांच्या वाटा तुडविण्याची आवड असलेले राजुरामार्गे जातात. हरिपुऱ्याहून आपण निघून लंगडाआंबाच्या रस्त्यावर असतो, तेव्हा सातपुडयातील सर्वाधिक उंच शिखराचे दर्शन होते. पंचपांडव आणि बुरडीबोरी बरडी ही शिखरे 3200 फुटाहूनही जास्त उंचीची आहेत. गिर्यारोहणाची आवड असणारे स्तिमित व्हावेत असे हे पॉइंट आहेत. पालपासून जवळ असलेल्या चिंचाटी व्ह्यू पॉइंटवरून सातपुडयाचा पायथा न्याहाळता येतो. इतकी सगळी ठिकाणे यावल-पाल अभयारण्याच्या कुशीत असावीत आणि सगळा महाराष्ट्र त्यापासून अनभिज्ञ राहावा, हे केवळ दुर्दैवच.

जनतेपर्यंत ही माहिती पोहोचू नये या धोरणाला विवेकच्या एका वाचकाने 'रेशनकार्ड संस्कृती' असा शब्द दिला होता. रेशनकार्ड संस्कृती म्हणजे सगळे ठरावीक मर्यादेत. महाराष्ट्र टूरिझम खात्याने हे रेशनकार्ड धोरण झटकले, तर यावल-पालच्या अभयारण्याची सफर पर्यटकांना सोपी होऊ शकेल. या अभयारण्याच्या सफरीला यायचे असेल तर कोठूनही यायचे असेल तर जळगाव हे मध्यवर्ती ठिकाण आहे. येथे थांबायला शासकीय विश्रामगृहे आहेत. मोठी हॉटेल्ससुध्दा तुमच्या स्वागताला आहेत. जळगाहून यावलला जाता येते. तेथून सातपुडयाच्या रांगेत विस्तारलेल्या अभयारण्यात प्रवेश करता येतो. काही ठिकाणांना जाण्यासाठी चोपडा, रावेर, मुक्ताईनगरही गाठावी लागतात. या! सातपुडा स्वागतासाठी हात पसरून उभा आहे!
8805221372

माझं गाव ....माझं गाव.....................................हुर्हेर्हेर्हेह्रेर्हेर्हेर्हेह्रे

वाचा