'अग्निपंख'- छोट्या एअरक्राफ्ट इंजिनियरचे फुल्ली लोडेड लढाऊ विमानाचे डिझाईन!

Submitted by मी_आर्या on 3 September, 2009 - 09:43

img038.jpg

नावः तनिष्क मोरे
वयः १२ वर्ष पूर्ण
इयत्ता: ७ वी
चित्राचे माध्यमः फक्त पेन्सिल
पालकांची मदतः चित्र फक्त २ तासात पूर्ण करुन घेणे

लढाऊ विमाने, तोफा, हेलीकॉप्टर, एवढच काय बाईक्स यांचे डिझाईन तनिष्क ८ वर्षाचा असल्यापासुन काढतोय. विशेष नोंद म्हणजे त्याची कल्पनाशक्ती आणि डिटेलिंग! बाईक्स ( 'धुम' फेम) ची डिजाईन्स तर तो इतकी सफाईदारपणे काढतो की समोर बाइक उभी करुन काढलय की काय असे वाटेल...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

awsome!!!

छान!!!!!

सुपर....त्याला रंगवायलाही लावायचे होते नं !
त्याने विमानावर काढलेलं अशोकचक्र आणि त्याची जागा खास आवडली मला!
शुभेच्छा !

Wow.

कसले कलाकार आहेत एक एक!! सहीच!!
डीटेलींग अफलातून आहे.. विंग्ज ऑफ फायर, इंडीयन एअर फोर्स आणि अशोकचक्र केवळ ग्रेट!!

जबरदस्त... काय विमान आहे.... गरुड - 'अग्निपंख' नाव पण एकदम समर्पक. नयना तुझ्या पोराच्या हातात जादु आहे बरं.. चांगल ट्रेनिंग दे त्याला. त्याचे इमाजिनेशन पण सही आहे. त्याची मदर्स डे ला काढलेली 'अष्टभुजा आई' पण सहीच होती. Good Luck तनिष्क!

सर्वांचे मनापासुन खुप खुप आभार आणि प्रतिसादाबद्दल धन्यवाद! Happy
<<<<< जबरदस्त... काय विमान आहे.... गरुड - 'अग्निपंख' नाव पण एकदम समर्पक. नयना तुझ्या पोराच्या हातात जादु आहे बरं.. चांगल ट्रेनिंग दे त्याला. त्याचे इमाजिनेशन पण सही आहे. त्याची मदर्स डे ला काढलेली 'अष्टभुजा आई' पण सहीच होती. Good Luck तनिष्क!<<<

अगं, घरी त्याला मामा वगैरे सर्व चिडवायचे...की "काय पेंटर बनायच आहे का? आपण तुला एक टपरी टाकुन देऊ पीडब्ल्युडी रोडवर आणी बोर्ड लिहु'येथे सर्व पेंटींगची कामे करुन मिळतील असा" ! त्यामुळे बिचारा नर्व्हस झाला होता! त्याला कसे तरी तयार करुन काढायला लावले! आता तुम्हा सर्वांच्या प्रतिसादाचे प्रिंट काढुन त्याला दाखवेल...खुश होऊन जाईल एकदम! Happy

खरंच ऑसम! काय डीटेलिंग आहे.. त्याला चिडवू नका अशी ताकीद दे गं सगळ्यांना! काय जादू आहे हातात त्याच्या!

छान आहे ग चित्र. आवडलं.. Happy त्याला इथल्या प्रतिक्रिया दाखव, म्हणजे तो अजुन चित्रे काढेल.. Happy

त्याची कल्पनाशक्ती आणि डिटेलिंग !!<< सह्हीच !! Happy

त्याची बाकीची चित्रे बघायला खुप आवडेल....

त्याची बाकीची चित्रे बघायला खुप आवडेल.... >>> नयन खरच टाक इथे सगळी चित्रे... Happy

तनिष्क... हात कुठे आहेत... ग्रेट यार...

Pages