"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक ११

Submitted by संयोजक on 28 August, 2009 - 07:14

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------

"शेपटीवाल्या प्राण्यांची.... "

झब्बू म्हणून पाळीव/वन्य प्राण्यांची छायाचित्र द्यायची आहेत. कोलाज नको.

Animals_zabbu.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

होय होय.

Lake Del Valle
त्या दिवशी ट्रेक मध्ये याच्या वर पाय पडणार होता पण लास्ट मोमेंट्ला उडी मारली.
P1010031.jpg
रॅटल स्नेक

IMG0115A.jpg

मालदीव- ससे

( टीप- मी इथे बायकोचा फोटो टाकू का असे विचारले होते... पण तिचा फोटो पाळीव - वन्य पशू च्या झब्बू वर टाकावा की स्थापत्यकलेचा नमुना म्हणून टाकावा, हे न समजल्याने मी तो बेत रद्द केला.... वरचा फोटो हा खरोखरच सश्याचाच आहे, याची नोन्द घ्यावी..... तमाम पुरुषाना अशाच सश्यासारख्या 'नरम' बायका मिळाव्यात, ही प्रभू चरणी नम्र प्रार्थना..)

झब्बू म्हणून सासर्‍याचा फोटो चालेल का ? ( त्यांचे नाव तात्या आहे, पण मी त्याना तात्या विन्चू म्हणतो.... )

सगळ्यांचेच फोटो मस्त..!! Happy
डिस्कव्हरी किंवा अ‍ॅनिमल प्लॅनेट बघतोय अस वाटतय. फक्त ही चित्र हलत नाहीयेत इतकच.. Proud

आज रात्री कुणी खेळाडु असेल तर मी उतरतो शड्डु ठोकुन. एकट्यानेच मुदगल (बहुतेक असेच म्हणतात) केली तर संयोजक रागावतील. Proud

जरा हिंस्त्र प्राणी आण सोबतीला. संयोजक घाबरून काही नाही बोलणार मग तुला ! Proud

कांदापोहे, माझ्याकडे २-३ च प्राणी उरलेत... पण बाकीची लोकंपण असतलीचं की... आम्हि संयुक्त आघाडी केली तर चालेल ना!
(पण तु पक्षांबद्दल बोलतोस की प्राण्यांबद्दल?)

रणथंबोर..
IMG_0125_skw.JPG

ह्या जिराफाने त्याच्या खरखरीत जिभेने माझ्या हाताला चाटले.. एक फुटावर डोके आणतात आपल्याजवळ.. बाप रे!!

Sep-Oct06 photos 089.jpg

सॉल्लिड...
माझ्याकडे फोटोच नाहीयेत.. हा एकच आहे. माझ्या पॅटिओत आलेल्या खारूताईचा..

झब्बूच्या ह्या खेळाला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार ! ह्या निमित्ताने अनेक सुंदर प्रकाशचित्रे सगळ्यांना बघायला मिळाली. गणेशोत्सवाच्या सांगतेबरोबरच हा धागा आता बंद करत आहोत.

Pages