विचारी प्रत्येकजण आहे

Submitted by जयदीप. on 7 February, 2016 - 09:25

"विचारी" प्रत्येकजण आहे
कसे हे वातावरण आहे

कशाला सांगायचे नाही
तुझे योग्य उदाहरण आहे

युगांनंतर भेटलो; कळले
तुला माझी आठवण आहे!

तळे नाही हे......नदी आहे!
पुढे गेल्यावर धरण आहे

कसा होतो काल मी? नाही ?
कसा बघ मी आजपण आहे...

इथे थांबूयाच जय आपण
पुढे अपघाती वळण आहे

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुरेख गझल. जवळपास सगळे शेर आवडले. तुमच्या गझलांमध्ये चित्तरंजन भटांच्या गझलांची झाक जाणवते. प्लीज टेक इट अ‍ॅज अ काँप्लिमेन्ट!

-'बेफिकीर'!

(लय जरा अवघड जात आहे ह्या गझलेची, प्रयत्न करतो)