Submitted by जयदीप. on 7 February, 2016 - 09:25
"विचारी" प्रत्येकजण आहे
कसे हे वातावरण आहे
कशाला सांगायचे नाही
तुझे योग्य उदाहरण आहे
युगांनंतर भेटलो; कळले
तुला माझी आठवण आहे!
तळे नाही हे......नदी आहे!
पुढे गेल्यावर धरण आहे
कसा होतो काल मी? नाही ?
कसा बघ मी आजपण आहे...
इथे थांबूयाच जय आपण
पुढे अपघाती वळण आहे
जयदीप
विषय:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Chan aahe
Chan aahe
खूप सुरेख गझल. जवळपास सगळे
खूप सुरेख गझल. जवळपास सगळे शेर आवडले. तुमच्या गझलांमध्ये चित्तरंजन भटांच्या गझलांची झाक जाणवते. प्लीज टेक इट अॅज अ काँप्लिमेन्ट!
-'बेफिकीर'!
(लय जरा अवघड जात आहे ह्या गझलेची, प्रयत्न करतो)
वा सुंदर
वा
सुंदर
जयदीप जी गझल साधी आणि सरळ आहे
जयदीप जी गझल साधी आणि सरळ आहे ओड़तान नाही खूप आवडली।।
छान आहे.
छान आहे.