Submitted by सुप्रिया जाधव. on 29 January, 2016 - 03:47
हिवाळा उन्हाळा पुन्हा पावसाळा
मनाचा ऋतू याहुनीही निराळा
क्षमा कर अता त्रास देणार नाही...
म्हणाला तुझ्या आठवांचा उमाळा
असो वा नसो आज नात्यात अपुल्या
घराचे तरी नांव ठेवू 'जिव्हाळा'
उजेडातुनी खोल गर्तेत नेतो
तुझ्या अंतरंगातला डोह काळा
कधीची तुला वाटते संपली, पण...
नव्याने शिकवतेच आयुष्य शाळा
निघूद्यात....बरसू नका ऐनवेळी
अरे आसवांनो दिला शब्द पाळा
कुणाचे कुणावर खरे प्रेम कुठले
रिकाम्या मनाला हवा फ़क्त चाळा
सुप्रिया
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
निघूद्यात....बरसू नका
निघूद्यात....बरसू नका ऐनवेळी
अरे आसवांनो दिला शब्द पाळा << khallas !
कधीची तुला वाटते संपली,
कधीची तुला वाटते संपली, पण...
नव्याने शिकवतेच आयुष्य शाळा>>सुरेखच!
काळा , शाळा , पाळा ....
काळा , शाळा , पाळा .... अप्रतिम शेर
अप्रतिम......
अप्रतिम......
अप्रतिम गझल!
अप्रतिम गझल!
वाह. मस्तच.
वाह. मस्तच.
सुरेख रचना !
सुरेख रचना !
छान कल्पना मांडल्यात...
छान कल्पना मांडल्यात...
क्या बात है !
क्या बात है !
मनःपूर्वक आभार मंडळी !!
मनःपूर्वक आभार मंडळी !!
सुरेख, सुबक, स्वच्छ आणि गझल
सुरेख, सुबक, स्वच्छ आणि गझल म्हणावी अशी गझल
धन्यवाद बेफिजी !!
धन्यवाद बेफिजी !!
सुरेख गझल... जवळजवळ सगळेच शेर
सुरेख गझल... जवळजवळ सगळेच शेर आवडले.
धन्यवाद नचिकेत !!
धन्यवाद नचिकेत !!
आवडली...
आवडली...
आभार सर्वांचे
आभार सर्वांचे