पीएफ व व्हीपीएफ वर टॅक्स पडतो का?

Submitted by मेधावि on 28 January, 2016 - 06:56

पी एफ व व्ही पी एफ ह्या दोन्हीवर टेक्स पडत नाही अशा समजुतीत बरेच दिवस होते परंतु नुकतेस असे ऐकण्यात आले की ह्या दोन्हींच्या व्याजावर टॅक्स पडतो. पीपीएफ, पीएफ व व्हीपीएफ बद्दल अधिक माहिती व फायदे तोटे जाणून घेण्यास आवडेल.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पी एफ़ , पी पी एफ़ वर मिळणार्‍या व्याजावर कर लागत नाही.

अकाउंट मॅच्युअर झाल्या नंतर मिळणार्‍या रकमेवर (मुद्दल + व्याज) यावर कर भरावा लागत नाही.

ही रक्कम नंतर कुठेही गुंतवली तर त्यावर मिळणारे व्याज/उत्पन्न/नफ़ा हे करपात्र आहे.

मिळणारे व्याज करमुक्त असते.

Section 10 of the Income Tax Act is about Tax Feee income. Clause 11 reads:-

(11) any payment from aprovident fund to whivh the Provident Funds Act, 1925 (19 of 1925), applies or from any other provident fund set up by the Central Government and notified by it in this behalf in the Official Gazette.

ई.पी.एफ. आणि पी.पी.एफ. चे व्याज नक्कीच करमुक्त आहे. व्हीपीएफ साठी नोटिफिकेशन पहावे लागेल. कंपनी सांगू शकेल.

पी एफ़ची रक्कम पाच वर्षाच्या आत काढली की पूर्ण रक्कमेवर टॅक्स भरावा लागतो. ही रक्कम तुमचे त्या
चालू वर्षाच्या उत्पन्नात जमा केले जाऊन टॅक्स लावला जातो.
पाच वर्षानंतर पीएफची रक्कम काढली तर ती पूर्ण टॅक्स फ्रि असते.

ई.पी.एफ. मधील गुंतवणूक केव्हाही चांगली.

पी.पी.एफ. मध्ये पैसे काढण्यावर नियंत्रण आहे. सातव्या वर्षी पहिल्या वर्षातील गुंतवणूक काढता येते. आठव्या वर्षी पहिल्या दोन वर्षातील गुंतवणूक काढता येते...... वगैरे पंधराव्या वर्षापर्यंत.

त्यानंतर खाते बंद होते. सर्व पैसे करमुक्त असतात.

माझा पण व्हि पी एफ वर्षाला 1.65 L आहे.
त्यावर टॅक्स पडत नाही. पण हा धागा उघडून शंका निरसन झालं ते बरं झालं.

पी एफ़ची रक्कम पाच वर्षाच्या आत काढली की पूर्ण रक्कमेवर टॅक्स भरावा लागतो. ही रक्कम तुमचे त्या
चालू वर्षाच्या उत्पन्नात जमा केले जाऊन टॅक्स लावला जातो.
पाच वर्षानंतर पीएफची रक्कम काढली तर ती पूर्ण टॅक्स फ्रि असते.>>+१

म्हणुन स्टेट बॅक जर त्या वर्षात पैसे जमा केले असले तर त्या वर्षी खाते बंद करु देत नाहीत.

१५ वर्षानंतर खाते दर ५ वर्षासाठी वाढवता येते. त्यासाठी बॅकेत लेखी अर्ज द्यावा लागतो.

दिवाळखोरी , किंवा कुणाला लोन घेण्यासाठी गॅरेंटर झाले असल्यास किंवा आजुन कसल्याही दिवाणी कायद्याद्वारे पीएफ व पीपीएफ मधुन वसुली करु शकत नाही. त्यामुळे ती भारतातिल सर्वात सुरक्षित गुंतुवणुक आहे.

>>दिवाळखोरी , किंवा कुणाला लोन घेण्यासाठी गॅरेंटर झाले असल्यास किंवा आजुन कसल्याही दिवाणी कायद्याद्वारे पीएफ व पीपीएफ मधुन वसुली करु शकत नाही. त्यामुळे ती भारतातिल सर्वात सुरक्षित गुंतुवणुक आहे.>> +१

कुणीही म्हणजे नोकरदारांना असते PF खाते. त्यात पैसे वाढवायचे.
पण इतर व्यावसायिक, दुकानमालक व्यापारी,एजंटस इत्यादी स्वयंमालक काय करणार? त्यांच्यासाठी ppf फक्त.

Ok