उद्योग भरारी, लोकसत्ता - चतुरंग पुरवणी - चंद्रिका चौहान, सोलापूर

Submitted by सावली on 15 January, 2016 - 11:03

जानेवारी २०१६ पासून, दर पंधरा दिवसातून एकदा, शून्यातून मोठा व्यवसाय उभ्या करणार्या उद्योजीकांच्या मुलाखती घेऊन लोकसत्ता चतुरंग पुरवणीच्या 'उद्योग भरारी' या सदरामध्ये प्रकाशित होणार आहेत. लोकसत्ता-चतुरंग साठी असे वर्षभराचे सदर लिहायला मिळणे ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहेच शिवाय त्याबरोबर येणारी जबाबदारीही खूप मोठी आहे असे मला वाटते. या कामासाठी मित्रमंडळी आणि इतर वाचकांची मदत आणि प्रतिक्रिया दोन्ही माझ्यासाठी खूप महत्वपूर्ण आहेत.

पहिला लेख २ जानेवारीला प्रकाशित झाला. त्याची लिंक इथे देतेय ( इतके दिवस ऑनलाईन पुरवणीत लिंक उपलब्ध नव्हती, त्यामुळे उशीर)

=====================================
चंद्रिका चौहान, सोलापूर
=====================================
ChandrikaChauhan
चंद्रिका चौहान यांची ‘उद्योगवर्धिनी’ तिथल्या सुमारे तीन हजार स्थानिक स्त्रियांना आत्मनिर्भर करणारी ठरली असून लाखो रुपयांची उलाढाल असलेल्या ३१० उद्योजिकाही तयार झाल्या आहेत. रोज सुमारे तीन-साडेतीन हजार लोकांचा स्वयंपाक ‘उद्योगवर्धिनी’मार्फत केला जातो. इतकंच नव्हे तर उद्योगाबरोबरच ‘अन्नपूर्णा’ योजना आणि ‘मंगलदृष्टी’ योजनाही राबविण्यात येते.

आयुष्याचा आणि करिअरचा मूलमंत्र ‘‘प्रत्येक स्त्रीच्या हाताला काम हवं, तिला स्वाभिमानानं जगता यायला हवं. कुटुंबातली एक स्त्री स्वत:च्या पायावर उभी राहिली तर ती संपूर्ण कुटुंबाला उभं करते.’’
उद्योग करू इच्छिणाऱ्या तरुणींसाठी ‘‘समोर येणाऱ्या कोणत्याही कामाला कधी नाही म्हणू नका. कष्ट करून जेवा, फुकट काही घेऊ नका आणि कुटुंब आणि सग्यासोयऱ्यांना घेऊन पुढे चला.’’ - See more at: http://www.loksatta.com/udyogbharari-news/inspirational-stories-of-women...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.