वोडका जेलो शॉट्स!!!

Submitted by वर्षू. on 17 January, 2016 - 11:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

वोडका शॉट बरोबर किन्वा सलाद - सुपर संडे ब्रंच
http://www.maayboli.com/node/57239

हे वोडका शॉट्स करायला अगदी सोपे आहेत, होम पार्टीज करता काहीतरी अ‍ॅडिशनल गम्मत..

१) ३,३ औंस ची ३ जेलो पॅकेट्स. मी Jell-O ब्रँड ची शुगर फ्री जेली वापरलीये. स्ट्रॉबेरी फ्लेवर मधे. तुम्ही आपल्या आवडी ची फ्लेवर घेऊ शकता.
२) २ १/२ कप वोडका ( मी ग्रे गूस ओरिजिनल वापरलीये)
३) ३ १/३ कप पाणी

क्रमवार पाककृती: 

१) भांड्यात पाणी उकळायला ठेवा. उकळी फुटल्यावर गॅस बंद करा
२) आता जेलो क्रिस्टल्स मिसळून नीट विरघळवून घ्या. तीन चार मिनिटे तसेच ठेवा.
३) आता थंड वोडका अ‍ॅड करा.
४) शॉट साईझ प्लास्टिक कप्स मधे ओता.
५) फ्रिज मधे सेट करायला ठेवा. ( फ्रीझर मधे नाही)
घरी पार्टी असेल तर एंटरंस ला सर्व करा. एकेक ग्लास उचलून सरळ तोंडात स्क्वीझ करून गट्टम करता येतात.
कालच प्रयोग केलाय.. Happy अगदी कधी ही अल्कोहोल न घेणार्‍यांनीही दोन दोन ,तीन तीन शॉट्स एंजॉय केले Lol

'दाखवायच्या' काचेच्या स्टँड मधे सर्व करा.. Happy

पुढच्या वेळेकरता तयारी

वेगवेगळ्या फ्लेवर आणी रंगाच्या बनवता येतील..

वाढणी/प्रमाण: 
जितनी मर्जी जी!!!
अधिक टिपा: 

यापूर्वी, मी मैत्रीणी च्या रेस्टोरेंट मधे ट्राय केले ते तिने डिसपोझेबल इंजेक्शन सीरींज( नीडल बिना हाँ.. Wink ) मधे बनवलेले होते. डायरेक्ट एकेकाच्या तोंडात ती स्वतःच सर्व करत होती. पोलियो ड्रॉप्स ची आठवण आली होती मला..उगीचच.. Happy
इथे ऑन लाईन ऑर्डर करता आल्या असत्या सीरींजेस..पण वेळ नव्हता पुरेसा.. म्हणून प्लास्टिक कप्स वर भागवलं..

माहितीचा स्रोत: 
मैत्रीणी च्या आधिक टिपांसकट नेट ची मदत
आहार: 
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देशामधे वेकफिल्ड किंवा बाकी जी जेलीची पाकिटे मिळतात. त्यात जनरली सर्व पाकिटाला मिळून २ कप पाणी असे प्रमाण लिहिलेले असते.
त्यामधे १ अधिक १/५ कप पाणी + ४/५ कप व्होडका असे प्रमाण करायचे.

थोडक्यात म्हणजे पाकिटावर दिलेल्या पाण्याच्या प्रमाणाच्या अर्ध्यापेक्षा थोडे कमी अल्कोहोल आणि उरलेले पाणी असे करायचे. अल्कोहोल जास्त झाले तर सेट होत नाही जेली.

हे प्रकरण जनरली युनिव्हर्सिट्यांमधे नुकतेच दारूयोग्य वयाचे झालेल्या विद्यार्थ्यांमधे जाम फेमस असते. Happy

गजानन.. Lol Lol ...
यप .. मलापण इंजेक्शन पाहिलंकी असंच होतं.. पण जेलो शॉट इज गुड.. Happy

भारी लागतात हे शॉट्स . Wink
पोलियो ड्रॉप्स ची आठवण आली होती >>> तोंडात रांगोळी घातल्यासारखं वाटतं Proud

झोपा आणि झोपु द्या गं मुलींनो. मला आता टेम्प्ट नका करु. Wink मी जबरी वोडका फॅन आहे + घरात जेली पॅकेट्स आहेत + 'अ‍ॅबसोल्युट' ची ३/४ बॉटल आहेच. एकच गोष्ट ब्याड आहे कि आज रविवार असल्यामुळे उद्या सकाळच्या ऑफिसचे वेध लागले आहेत.

ग्रीन होता तो कैरी होता बहुतेक आणि लाल आहे तो स्ट्रॉबेरी.
दोन्ही बहुतेक वेकफिल्ड.
दोन वर्षांपूर्वीचे फोटो आहेत त्यामुळे नक्की ब्रॅण्ड लक्षात नाही.

रिया, तू काय करून बघणारेस? व्होडका ही दारू असते.

नी..अगा रीया अ‍ॅडल्ट हाये..आता.. काय?? हो ना गं, री.. Happy

ओह कैरी फ्लेवर? वॉव.. मला वाटलं मिंट फ्लेवर असेल.. हीही.. पण मिंट फ्लेवर जेली बघितली नाही कुठे..

ज्यांना मिंट फ्लेवर आवडते ते मिंट लिकर वापरून पान शॉट्स बनवू शकतात.. उस्की रेस्पी थोडी अल्लग है.नो जेलो.

वॉव, मस्तं, मस्तं!
" डायरेक्ट एकेकाच्या तोंडात ती स्वतःच सर्व करत होती. पोलियो ड्रॉप्स ची आठवण आली होती मला..उगीचच.. "....:D अल्टिमेट प्रकार आहे हा....

मस्त! विएनातल्या एका रेस्तॉंमधे टेस्टट्युब मधे असे शॉटस् सर्व्ह केले होते, त्याची आठवण आली Happy

जे काही आहे ते छान दिसतंय.

'दाखवायच्या' : परमिशन घेतली का?
इंजेक्शनच्या सीरिंज? धन्य.

Mi karun baghen lihilay.
Konaasathi banavanarey te nahi lihilay he lakshat ghya Lol

हाव ना! करून खाईन म्हटलिये का ती?

शिव शिव.

या माबोवरच्या पाशवी शक्ती चक्क दारूच्या रेस्प्या टाकून त्यावर चर्चा बिर्चा कर्तात बा!

जगातील सोंस्क्रूतीरक्षकांनो!!

धावा!!

Nee ghar pe bhi laungi.
Kisake ghar pe run nahi bolya Hai ye yad rakhana Lol

व्होडका म्हणजे दारुच ना?

हा धागा वाचुन झाल्यावर गंगाजल छिडकते आता लॅपटॉप वर आणि पुन्हा इकडे फिरकणार पण नाही.

नी Rofl रीया Lol

दीमा.. विसर्ला का.. तुमच्याच रिक्वेस्टीवरून डीटेल्ड रेस्पी टाकलीये.. Lol

@ भरत.. 'दाखवायच्या' या शब्दा करता परमिशन घ्यायची होती?? दीमांकडून कि काय?? Happy

दिनेश, इंजेक्शन बद्दल अगदी अगदी.. नुस्ता शब्द लिहिला , उच्चारला तरी दंड दुखतोयसासा भास होतो मला.. ईक्स!!! बट हे प्रकरण वेगळं है!!! Happy

सकुरा.. होप यू आर किडिंग!!! धागा वाचण्या ऐवजी फक्त टायटल वाचलं असतं तरी कळ्ळं असतं..सेव युअर लॅपटॉप प्लीज..च!!!

होप यू आर किडिंग!!! <<< हो ... आले की परत वाचायला..

दीमा, ते गोमुत्र आणि गंगाजल मधला फरक कळत नाही..नेमके कुठल्या वेळेस काय वापरायचे ते अभ्यास वाढवायला लागणार.

Pages