वोडका जेलो शॉट्स!!!

Submitted by वर्षू. on 17 January, 2016 - 11:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

वोडका शॉट बरोबर किन्वा सलाद - सुपर संडे ब्रंच
http://www.maayboli.com/node/57239

हे वोडका शॉट्स करायला अगदी सोपे आहेत, होम पार्टीज करता काहीतरी अ‍ॅडिशनल गम्मत..

१) ३,३ औंस ची ३ जेलो पॅकेट्स. मी Jell-O ब्रँड ची शुगर फ्री जेली वापरलीये. स्ट्रॉबेरी फ्लेवर मधे. तुम्ही आपल्या आवडी ची फ्लेवर घेऊ शकता.
२) २ १/२ कप वोडका ( मी ग्रे गूस ओरिजिनल वापरलीये)
३) ३ १/३ कप पाणी

क्रमवार पाककृती: 

१) भांड्यात पाणी उकळायला ठेवा. उकळी फुटल्यावर गॅस बंद करा
२) आता जेलो क्रिस्टल्स मिसळून नीट विरघळवून घ्या. तीन चार मिनिटे तसेच ठेवा.
३) आता थंड वोडका अ‍ॅड करा.
४) शॉट साईझ प्लास्टिक कप्स मधे ओता.
५) फ्रिज मधे सेट करायला ठेवा. ( फ्रीझर मधे नाही)
घरी पार्टी असेल तर एंटरंस ला सर्व करा. एकेक ग्लास उचलून सरळ तोंडात स्क्वीझ करून गट्टम करता येतात.
कालच प्रयोग केलाय.. Happy अगदी कधी ही अल्कोहोल न घेणार्‍यांनीही दोन दोन ,तीन तीन शॉट्स एंजॉय केले Lol

'दाखवायच्या' काचेच्या स्टँड मधे सर्व करा.. Happy

पुढच्या वेळेकरता तयारी

वेगवेगळ्या फ्लेवर आणी रंगाच्या बनवता येतील..

वाढणी/प्रमाण: 
जितनी मर्जी जी!!!
अधिक टिपा: 

यापूर्वी, मी मैत्रीणी च्या रेस्टोरेंट मधे ट्राय केले ते तिने डिसपोझेबल इंजेक्शन सीरींज( नीडल बिना हाँ.. Wink ) मधे बनवलेले होते. डायरेक्ट एकेकाच्या तोंडात ती स्वतःच सर्व करत होती. पोलियो ड्रॉप्स ची आठवण आली होती मला..उगीचच.. Happy
इथे ऑन लाईन ऑर्डर करता आल्या असत्या सीरींजेस..पण वेळ नव्हता पुरेसा.. म्हणून प्लास्टिक कप्स वर भागवलं..

माहितीचा स्रोत: 
मैत्रीणी च्या आधिक टिपांसकट नेट ची मदत
आहार: 
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lahanpani mala ekane Gangajal mhanje acid as sangitalel
>>>>

अजय देवगणचा गंगाजला चित्रपट बघ.
चित्रपटही मस्त आहे आणि तो असे का म्हणाला हे देखील समजेल.

Pages