सरसोंका साग.. एक सौम्य व्हर्जन

Submitted by दिनेश. on 17 January, 2016 - 01:40
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष्क्ष्क्ष्क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
क्ष
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
माझेच प्रयोग.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पंजाबात पहिल्यांदा गेलेलो तेव्हां एकदा आवडीने ही डिश (त्याच जाहीरातीचा परिणाम म्हणून ) मागवलेली. पण उग्र वास आणि चव यामुळे दुसरी डिश मागवावी लागली. हा उग्र वास मोहरीच्या तेलाचा कि भाजीचा ?

कापोचे, भाजीलाच हा वास असतो. म्हणून मी कांदा, कॉर्न व क्रीम वापरलेय. पंजाबातल्या कडक हिवाळ्यात ही भाजी खाऊ शकतो, मुंबईत मात्र खाववणार नाही.

अहा! ही भाजी अफलातून लागते.पण मक्केकी रोटीबरोबर.
आमची पंजाबीण ही भाजी आणि मकईकी रोटी करून आम्हा बरेच जणांना दरवर्षी देते.देव तिचे भले करो.

दिनेशदा, ही भाजी मुंबईतील खाद्यगृहात अजून पाहण्यात आली नाही. पंजाबचे अनेक खाद्य पदार्थ मिळतात परंतु ही भाजी फक्त हिंदी चित्रपटांमुळे माहित आहे.

फोटो आणि पाककृती नेहमीप्रमाणे मस्त!

लग्नाआधी जेवणाचा डबा एका पंजाबी काकूंकडून घेत असू तेव्हा अनेकदा ही भाजी खाल्लेली आहे. त्या आवश्यक तो सर्व खटाटोप करून ही भाजी करत असत.

फार छान चव असते!

दिनेशदा, उत्तराबद्दल आभार.
कांदा, कॉर्न आणि क्रीम मुळे वास कमी होतो का ? करून पाहीन नक्की.

छान दिसतेय! मलाही उग्र वासामुळे फारशी आवडत नाही पण उग्रपणा कमी होण्याकरिता बथुआ/ पालक घालतात. आमच्या इथे हल्दीरामकडे ह्या सिझनमध्ये मिळते... मक्के की रोटी सरसोंका साग त्याबरोबर लोणच पापड गुळ विथ मक्खन अशी थाळी असते ..

छान लागते ही भाजी लखनऊला असताना हिवाळ्यात बर्‍याच वेळा केली जायची.

सध्या मार्केट मधे आहे ही भाजी करुन बघणार.

छान फोटो!
मी नेहमी करते ही भाजी थंडीत. प्रेशरपॅनमधे झटपट होते. मोहरीच्या पानांच्या निम्मे पालकची पाने घेते. तेल-तुप तापले एक छोटा कांदा चिरुन, जोडीला १ चमचा आलं-लसूण पेस्ट, पालक-मोहरीची पाने. थोडे परतून पाणी घालून झाकण लावून शिजवून घेते. मिक्सरमधे ही भाजी, थोडा गरम मसाला, तिखट, थोडे दूध आणि १ चमचा कॉर्नफ्लोअर घालून फिरवायचे. चवी प्रमाणे मीठ.

आभार सर्वांचे,

दीमा तो रिमोटही साहित्याचाच भाग.. खाताना थंडी निर्माण करावी लागते, म्हणून.

आपल्याकडे, गावरान राईचे पिक घेतात, पण त्याचा पाला नाही दिसत खाण्यात. कदाचित तो पाला जास्त उग्र असेल.

सरसों दा साग ते मक्के दी रोटी.. घरका मक्खन और लस्सी... आहाहा... लहानपणी पंजाबी मैत्रीणींकडे थंडी च्या दिवसातल्या या मेन्यूवर बरेचदा ताव मारलेलाय.. जस्ट ऑस्सम!!
पालक्,बथुआ मुळे या भाजीचा उग्रपणा कमी होतो,शिवाय चव ही वाढते..

दिनेशदा, ही भाजी मुंबईतील खाद्यगृहात अजून पाहण्यात आली नाही. पंजाबचे अनेक खाद्य पदार्थ मिळतात परंतु ही भाजी फक्त हिंदी चित्रपटांमुळे माहित आहे.
>>>>

सर्वच ठिकाणी नाही, पण मिळते काही ठिकाणी.
पण बहुतांश ठिकाणी टिनमधील असते, तसे ते सांगतात.
मी हे `मकई दी रोटी आणि सरसो दा साग' कॉम्बो एकापेक्षा जास्त वेळा खाल्लेय म्हणजे मला आवडलेय असे बोलू शकतो. पण मला भाजीपेक्षा मकई दी रोटी जास्त आवडते. नुसती खायलाही मस्त.

नागपूरला शिवजी भोजनालय आहे राणी झांसी चौकात तिथे मक्याची भाकरी आणि आलूपालक चापून चोपून खाल्लंय. त्यामुळे मक्केदी रोटी हा प्रकार आवडीचा आहे.

देवकी, भाजी बनवायला सोपी आहे पण एकदा चव तरी माहित असायला पाहीजे.

सुंदर दिसतेय. क्रीममुळे चवीला खरंच सौम्य होईलसे वाटते.
सिनेमात ऐकून जेवढी ग्लॅमरस वाटली होती तेवढी प्रत्यक्षात नाही आवडली. उग्र असते. मकई की रोटीही विशेष नाही आवडली. आमच्या भागात उत्तर भारतीय जास्त असल्याने करडई, अंबाडीपेक्षा सरसोच मिळते हल्ली !

मक्केदी रोटी और सरसोदा साग फक्त सिनेमातच ऐकलयं , पण एकदा हे काँम्बो ट्राय करायला पाहीजे.
मस्त रेसिपी.

चिरलेली मोहरी, पालक/बथुआ,मेथी ,हिरव्या मिरच्या एकत्र कुकरला लावायची.नंतर रवीने घोटून घ्यायची.त्यात १चमचा मक्याचे पीठ घालायचे.तेलावर कांदा,चिरलेले आले,लसूण घालून त्यात भाजी घालायची .थोडंस तिखट टाकावे.भाजी तयार झाली की बटर त्यात घालावे.

सुंदर. फोटोपण छान.

डोंबिवलीजवळ 'कुशला' हॉटेलमध्ये मिळते या दिवसात. भन्नाट चव. आम्हाला आवडते सगळ्यांना. जायला हवं तिथे खायला.

Sorry Dineshda pan ashee improvised recipe tumachyakadun Naveen baaf mhanun ajibaatach apekshit navhatee. Aadheech astitvaat asalelya original recipe madhye (tumhee pan liheeliye ase tumhee var namud kele aahe) kinva yukti suchva baaf var takalee asatee Taree chalale asate ase maze vai mat!

Ashach prakare canned/prepacked bhajyana ekada tadaka devun aapalya chaveechya improvised bhajya sagalyach mast hotat.

Me Swati2 yanee lihilelya paddhateene karate.

दिनेशदा फोटो मस्त.
मी ही नेहमी करते ही भाजी थंडीत, पण पालक घालून.
मुंबईत काही रेस्टॉरंट मधे मिळते ही भाजी. भाईंदर ला हाय वे वर दारा का ढाबा मधे चविष्ट मिळते ही भाजी.

अर्बन तडका मध्ये मिळते ह्या सीझन मध्ये. लोहरी स्पेशल मेन्यू म्हणून बरीच जाहिरात झालेली असते व इतरही हाटेलांतून ह्यावेळीस मिळते. मी मूड आला की दोन मक्के दी रोटी सरसो का साग खाउन एक गिद्दा पाउन येते. घरी बनवायची भानगड नाही. रोटीवर पांढरे लोणी पाहिजेच मात्र.

ह्यात कॉर्न, क्रीम घालणे म्हणजे मूळ फ्लेवर पासून दूर जाणे आहे. अर्थात तसे टायटल मध्येच आहे.
आपल्या चितळ्यांनी आळू चे फतफते असे डबाबंद विकले तर किती लोक्स घेतील?

आभार परत,

अमा,
भाग्यश्रीच्या रॅपर वर पालक, अळू पातळ भाजी असे उत्पादन नोंदवलेले दिसते. कटाची आमटीही असते पण एकदाही ते उत्पादन मला दुकानात दिसलेले नाही.

अळूचे फदफदेच का, वालाचे बिरडे, मटकीची उसळ, भरली वांगी अशी अनेक उत्पादने टीनमधे विकता येतील. भारतात नाही, पण भारताबाहेर नक्कीच वाव आहे त्यांना. कुणी उद्योग करायला हवा हा. गुजराथी ऊंधीयू आणि पात्रा पण मिळतात टीनमधे. आणि त्याची चवही चांगली असते.

वत्सला,

नोटेड.. नवीन पाककृती करतच असतो मी पण आता मायबोलीवर लिहायचा उत्साह कमी झालाय. आणि युक्तीच्या बाफवरही क्वचितच लिहितो मी.... कारण तिथेही माझ्या उद्धार होतच असतो..

अहाहा.... मस्त रेसिपी दिनेशदा!

दिल्लीतल्या थन्डीत कितीवेळेस ही भाजी केली होती. आम्ही सौम्य करण्यासाठी यात एक जुडी पालक टाकायचो.
ही भाजी आदल्या दिवशी केली असेल तर दुसर्‍या दिवशी खायला अजुन मजा येते.
दिल्लीच्या आय आय टी च्या कॅन्टीनलापण ही मकई दी रोटीसोबत खाल्ली कित्येकदा. डेहराडुनला एका महाराष्ट्रीयन कडे नाचणीच्या भाकरीसोबत खाल्ली होती,
पण मकई दी रोटी हवीच.

मस्त रेस्पी..
सबकुछ तयार.. गरम केल कि झाल Happy
कधीच खाल्लेली नै .. चित्रपटांमुळे माहितीये बस.. करेल कि नै कुणास ठाऊक..
इथल्या लोकांच्या प्रतिक्रिया बघुन करेल अस वाटत नै पण चव नक्की बघेल चान्स मिळाला तर Happy

पण आता मायबोलीवर लिहायचा उत्साह कमी झालाय.

<<

असं करून कसं चालेल? हितचिंतक प्रत्येकाला असतात. आपण हत्यार ठेवलं, की त्यांची जीत होते, हे लक्षात घ्या.

नव्या दमाने लिहीत चला. तुमच्या निगुतीने केलेल्या पाकृ पाहून इन्स्पिरेशन घेऊन मी डेरिंग करतो किचकट रेस्प्या करायची. लिहीत जा तुम्ही.

घरात 'सर्व पालेभाज्या खाणे' हा एक कडक नियम होता. त्यामुळे नको नको त्या भाज्या खाव्या लागलेल्या आहेत. शेपू म्हणू नका, करडई, भारंगी, चंदनबटवा, सुरणपाला, काही म्हणू नका, या भाज्या केल्या जात आणि खाव्या लागत. मुळ्याचा पाला, हरभर्‍याचा कोवळा पाला, शेवग्याचा कोवळा पाला, घोळ, फोडशी या सर्व भाज्या खाल्ल्या गेल्या आहेत. मोहरीही त्यात आलीच. मात्र ती पंजाबी पद्धतीची नव्हे. इतर भाज्यांसारखीच, काहीतरी डाळदाणे वगैरे भंजन कडधान्य वगैरे घालून. उग्र आणि तिखट मिरमिरीत लागे. तशा बहुतेक पालेभाज्या उग्र वासाच्या आणि तुरट चवीच्या असतात. गूळ, तेल, कांदा वगैरे घालून त्यांची चव बदलायची असे आपले पाकशास्त्र. मुळ्याच्या कोवळ्या पाल्याचा, शेपूचा वास ज्याने सहन केला तो जगातली कुठलीही पाककृती खाऊ शकेल.

Pages