अष्टविनायक दर्शन : श्री महागणपती

Submitted by पल्ली on 1 September, 2009 - 01:57

ranjangaon_0.jpgश्री महागणपती- रांजणगाव, जि. पुणे.

मार्ग- नगर रस्त्यावर पुण्यापासुन सुमारे ५० कि.मी., उरळी स्थानकापासून सुमारे १६ कि. मी.

यात्रा- भाद्रपद शु. चतुर्थी.

मूर्ती- मंदिरात दिसते ती भोगमूर्ती. ही प्रसन्न व मनोहर आहे. ऋद्धी-सिद्धी समवेत मूळ मूर्ती विधर्मीयांच्या आक्रमणाच्या भीती मुळे तळघरात दडवलेली आहे. महागणपती हा ८, १० किंवा १२ भुजांचा असतो. तशीच काहीतरी तळघरातली मूर्ती असावी. तिला १० सोंडी व २० हात असल्याचे सांगतात.

मंदीर- पूर्वाभिमुख. दिशासाधन आहे. मोठा सभामंडप.

इतिहास- सभामंडप इंदूरचे सरदार किबे यांनी बांधला. पवार व शिंदे या सरदारांनी ओवर्‍या बांधल्या. गाभारा श्रीमंत माधवराव पेशवे यांनी बांधला. होळकर व चंद्रचूड यांनी इनामे दिली. भोरकरांचीही एक खास नेमणूक होती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users