कांदा-मुळा भाजी...

Submitted by प्रमोद देव on 9 January, 2016 - 10:11

संत सावतामाळी ह्यांच्या 'कांदा-मुळा भाजी' ह्या अभंगाला लावलेली माझी चाल ऐका.
https://www.youtube.com/watch?v=AnekezkVZLU

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कांदा मुळा भाजी आवडलं.
चाल-क Lol

वादक कोण आहेत ? छान वाटतंय गीत ऐकायला.

एसआरडी
तुम्ही दिलेल्या लिंकवर क्लिकल्यावर पुढे काहीच होत नाही. बघणार का ?

एसारडी, मी ऐकलेय ते गीत..ज्ञानेश्वर मेश्रामच्या आवाजात..त्याची चालही खूपच छान आहे आणि तो गातोही छान.

कैपोछे, अहो वादक म्हणून कुणी माणूस नाहीये..मला स्वत:ला वेडंवाकडं गाण्याव्यतिरिक्त संगीतातलं दुसरं काही अवगत नाहीये....वादन तर अजिबात येत नाही....ती संगणकाची कमाल आहे.
महाजालावरून आणि माझ्या काही संगीत क्षेत्रातील मित्रांकडून मी काही ’तालतुकडे’ मिळवलेत...तालतुकडे म्हणजे विविध तालांचे एकेक आवर्तन....ऑडेसिटीसारख्या, ध्वनीमुद्रण आणि संपादन करता येऊ शकेल अशा प्रणालीद्वारे हे सगळं शक्य झालंय...एका तालतुकड्याची हवी तेवढी आवर्तनं आपण ह्या प्रणालीद्वारे घडवू शकतो....मी तेच करतो....तसंच तानपुर्‍याचेही आहे.
हे जे तालतुकडे मला मिळालेत, त्याचे मूळ वादक हे निश्चितच त्यात तरबेज आहेत आणि त्याचाच फायदा मला होतोय....त्या तालवादनामुळेच श्रवणाचा आनंद वाढलेला आहे...माझ्या गाण्यातली कमी त्यामुळे भरून निघत असते.

एसारडी आणि कैपोछे, प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.

जाता जाता...’चाल’क बद्दल Proud
मी केवळ चाल लावतो म्हणून ’चाल’क! इतक्या क्षुल्लक गोष्टीसाठी मला, स्वत:ला संगीतकार वगैरे म्हणवून घेणं मला शोभणार नाही असं मला प्रामाणिकपणे वाटतं..म्हणून.