ग्रीन मसाला पेस्ट करता साहित्य
१ टेबलस्पून मुळांसकट चिरलेली कोथिंबीर
१ टेबलस्पून धने
१/२ टेबलस्पून जिरे
१ १/२ टेबलस्पून चिरलेले गालांगल
१/४ कप लसणाच्या कळ्या
एक छोटा तुकडा आलं
थोडेसे काफिर लाईम zest.( मी काफिर लाईम ची १/४ टी स्पून पावडर वापरलीये)
३, ४ टेबलस्पून लेमनग्रास्,चिरून
१/२ टी स्पून काळे मिरे
मीठ- चवीनुसार
१/२ कप चिरलेले लहान कांदे ( शॅलट्स) इथे मिळाले नाही म्हणून नॉर्मल कांदेच घेतलेत - २ मीडियम आकाराचे
१०,१२ तिखट हिरव्या मिरच्या
मूठभर स्वीट किंवा थाय बेसिल लीव्ज
मूठभर काफिर लाईम ची पाने
१ कॅन कोकोनट मिल्क , ( मी ChaoKoh ब्रँड चा कॅन वापरलाय)
मांसाहारी ग्रीन करी करता, एक पाउंड बोनलेस चिकन घेऊन , ३,४ सें मी लांबीचे पातळ तुकडे चिरून घ्यावे.
शाकाहारी करी करता स्लाईस्ड पांढरे मशरूम्स्,स्नो पीज( धागे काढलेले), उभे दोन भागात चिरलेले बेबी कॉर्न्स, ब्रोकोली ( लहान फ्लोरेट्स मधे चिरुन) , सोलून उभे चार तुकड्यात चिरलेला एखादा बटाटा .
कृती
ग्रीन पेस्ट करता काळे मिरे,धने आणी जिरे भाजून घ्यावे. मग सगळे जिन्नस( काफिर लाईम ची पाने आणी बेसिल लीव्ज सोडून) एकत्र करून ग्राईंडर वर अतिशय बारीक वाटावे.
आता ज्या पातेल्यात किंवा कढई मधे करी करायची असेल ती गॅस वर ठेवून तीत एक टेबलस्पून तेल गरम करा.
मसाला पेस्ट टाकून परता. सुवास सुटला कि चिकन चे तुकडे किंवा सर्व भाज्या टाकून थोडा वेळ परता.
चिकन च्या तुकड्यांचा रंग पिवळसर झाला कि कोकोनट मिल्क चा कॅन आणी कॅन च्या दीडपट पाणी एकत्र करून घाला. उकळी आल्यावर काफिर लाईम लीव्ज आणी स्वीट बेसिल लीव्ज घाला.
गॅस मंद करा. कढई वर झाकण ठेवून चिकन / भाज्या शिजवा.
ही करी स्टीम्ड राईस बरोबर सर्व करा
तो आल्या सारखा दिसणारा लाल तुकडा गालंगल चा आहे, आणी ती लांब पानांची कोथिंबीर आहे. थायलँड मधे हीच कोथिंबीर वापरतात. पण भारतात बहुतेक आपलीच कोथिंबीर वापरावी लागेल.
आजकाल भारतात काफिर लाईम, काफिर लाईम ची पाने, गालंगल्,लेमन ग्रास इ. वस्तू , सहज मिळतात.
करी मधली पानं बघून घरातले मेंब्रं काचकुच करत असल्याने सरळ काढून टाकली..
एंड प्रॉडक्ट.. चिकन आहे तळाशी.. 
काफिर लाईम ऐवजी , भारतीय लिंबू अजिबात वापरू नये!!
फ्लेवरफुल करी करता कोथिंबीर तिच्या काड्या, रूट्स सकट वापरावी !!
भारी रेसिपी. धन्यवाद. ग्रीन
भारी रेसिपी. धन्यवाद.
ग्रीन करी खूप आवडते, पण कधी कृती शोधून करायचं धैर्य केलं न्हवतं. आता हे घटक शोधून आणून करून बघेन. फोटोमध्ये मस्त क्रीमी थिक दिसत्येय आणि तशीच आवडते. आधी एकदा वरची पेस्ट आणून करीन आणि मग झेपली की साग्रसंगीत.
वरच्या पेस्टमध्ये हव्या त्या
वरच्या पेस्टमध्ये हव्या त्या भाज्या आणि नारळाचं दूध मस्ट आहे.
साती अगा मस्त पिस्ता कलर
साती
अगा मस्त पिस्ता कलर आलाय करीला.. कोको.मिल्क मुळे लाईट होतो हिरवा कलर..
सायो.. यप..दॅट्स ट्रू

अमितव.. मी कधीच रेडीमेड पेस्ट वापरली नाहीये.. पण चांगलीच होत असेल.. पण मला स्क्रॅच पासून आवडते करायला.. यलो करी पण छान होते. रेड इज नॉट माय फेव.
बरी आठवण केलीस, करायलच पाहिजे
बरी आठवण केलीस, करायलच पाहिजे
मस्त एकदम! पण पाककलेतला
मस्त एकदम! पण पाककलेतला एकंदरीत उत्साह बघता कितपत करून बघेन माहिती नाही. रेडीमेड पेस्ट च्या करीज केल्यात कधी-कधी पण एकदम शॉर्ट कट म्हणजे थाय रेस्टॉरंट गाठायचं सरळ...तेच करतो बहुदा!
पण थाय फ्राय-राय (फ्राईड राईस) केलाय का कधी घरी? तो एकदा करून बघितला पण रेस्टॉरंट सारखी चव नाही आली.
हो गं लिहिता लिहिताच लक्षात
हो गं लिहिता लिहिताच लक्षात आलं होतं की आमची पण सोय हाय......आधी काही तरी सामिषच असणारसं मनात धरून भराभरा वाचल्यालं........
उत्तमच! शंका १ - गालंगल,
उत्तमच!
शंका १ - गालंगल, काफिर लाईम हे काय असते?
शंका २ - लेमन ग्रास खाल्ल्याने त्रास होत नाही का?
शंका ३ - वसाबी पेस्ट वापरली जाऊ शकते का?
शंका ४ - हे सगळे करत बसण्यापेक्षा तुमच्याकडे जेवायला येता येते का?
@ बेफी. शंका ४= हो शंका
@ बेफी.
शंका ४= हो
शंका ३=नाही-नाही-नाही.. जॅप जिन्नस थाय जेवणात चालणार नाहीत अजिबात
शंका २= नाही... इट्स वेरी हेल्दी.. न्यूट्रिशिअस,anti-inflammatory , antioxidant या क्वालिटीज आहेत लेमन ग्रास च्या.
शंका १ = गालांगल, हे आल्या च्या फॅमिलीतील रूट आहे. खूप जास्त स्ट्राँग आणी आल्यापेक्षा वेगळी फ्लेवर आणी तुरट आहे चवी ला.
हे काफिर लाईम. kaffir
हे काफिर लाईम. kaffir lime
या लिंबाचा जातीधर्माशी काही संबंध नाहीये..
या लिंबा च्या पानांचा आणी रिंड चा उपयोग मोस्टली सर्व साऊथ ईस्ट एशियन जेवणांत केला जातो. तिकडल्या फ्लेवरफुल करीज मधे इट्स अ मस्ट!!
जबरीच. वर्षू - लेमन ग्रास
जबरीच.
वर्षू - लेमन ग्रास कन्झ्यूम करतात हे माहीत होते, पण आम्ही ते चहामध्ये उकळतो. थाई करीमध्ये ते असते हेही माहीत होते पण मला वाटायचे की फ्लेवरपुरते वापरून गाळून टाकतात. त्याच्या मेडिसिनल प्रॉपर्टीजही माहीत होत्या पण भीती अशी वाटत होती की इतका धारदार पदार्थ असतो
कोवळे रूट्स च्युएबल असतात..
कोवळे रूट्स च्युएबल असतात.. सहज वाटले जातात खलात ही.
भारतीय गवती चहा चा फ्लेवर थोडा वेगळाय..
हा मीच काढलेला फोटो आहे.. थाय मार्केट मधे विकायला असलेल्या लेमन ग्रास च्या जुडीचा
ओके धन्स
ओके धन्स
यप्प, ग्रीन करी टेस्ट्स बेटर
यप्प, ग्रीन करी टेस्ट्स बेटर दॅन रेड फॉर मी टू, आणि व्हेज जास्त आवडते का कोण जाणे.
पाली हिल भाजीमार्केटमध्ये ऑसम ताजे ingredients मिळतात. हल्ली नाही गेलो पण आधी बेंगलोर - चेन्नईहुन परत येताना तीन चार तास फ्लाईट स्टॉपओव्हर असायचा तेव्हा जायचो खूपदा.
वर्षु, थाय रेड करीमध्ये ओल्या
वर्षु, थाय रेड करीमध्ये ओल्या लाल मिर्च्या आणी शेन्गदाणे वापरतात ना? एका फुड शो मध्ये बघीतले होते. करणारी बाई थायलन्डचीच होती. नारळ पण वापरला होता तिने.
अमेय मला ही ग्रीन करी वेज
अमेय मला ही ग्रीन करी वेज जास्त आवडते,, माहीत नाही का..
रश्मी.. नो आयडिया.. आवडत नाही म्हणून फाइंड आऊट ही नाही केलं.. त्यापेक्षा मास्समान करी (massaman curry) जास्त छान लागते.
Pages