कुठल्याही गोष्टीची सुरुवात करण्याचा आमचा उत्साह वाखाणण्याजोगा असतो. मग ते व्यायाम करणं असो, एखाद्या विषयावर वाचन असो, डायटिंग असो, घर स्वच्छ ठेवण्याचा उपक्रम असो. त्यातून त्या उपक्रमाला पैसे घालायचे असतील तर मग उत्साह अधिकच असतो. कुठलीही गोष्ट नुस्तीच न करण्यापेक्षा ती पैसे भरून नाही केली की कसं बरं वाटतं.
'आमचे येथे कशाचीही 'सुरुवात' करून मिळेल, म्हणजेच कशाचाही 'श्रीगणेशा' करून मिळेल, पुढचे तुमचे तुम्ही बघा' - अशी आमची फॅमिली टॅग लाईनच ठरेल!
म्हणजे कसं - टेनिस क्लासेस - असा बोर्ड दिसला की आम्हाला सर्वांना उत्साह येतो - हा - आता टेनिस शिकायचं. डोळ्यासमोर बोरीस बेकर पासून विलियम बहिणींपर्यंत समस्त मंडळी दिसून जातात आणि लवकरच 'संपूर्ण कुटुंबियांना ग्रँड स्लॅम' अशी वर्ल्ड रेकॉर्ड न्यूज होणार अशी स्वप्न डोळ्यासमोर तरळू लागतात. त्या धुंदीत आम्ही तत्काळ त्या क्लासला अॅडमिशन घेऊन मोकळे होतो. आता असं वर्ल्ड रेकॉर्ड टेनिस खेळायचं म्हणजे तशी तयारी नको जोरदार? मग तत्काळ समस्त मंडळींना टेनिस रॅकेटस, शूज अशी खरेदी होते. हो! साध्या-सुध्या दर्जाच्या रॅकेटस, शूज हे उद्याच्या स्टेफी ग्राफ, आन्द्रे आगासींना शोभत नाहीत हे लक्षात घेऊन तशीच खरेदी होते. पुढला आठवडाभर मग टेनिस क्लासेस, प्रॅक्टिस यांची धामधूम उडते. घरामध्ये स्पोर्ट्स चॅनेलवर टेनिस मॅचेस बघणे वगैरे चालते. अचानक आठवड्यात एकाला ऑफिसचे बरेच काम निघते, दुसर्याचा पाय दुखावतो, तिसर्याला त्याचा जन्म टेनिसकरिता झालेला नसून दुसर्या एखाद्या गोष्टीकरिता झाला असल्याचा दृष्टांत होतो तर चौथीला विलियम बहिणींच्या पोटावर पाय का आणा असा कनवाळू विचार मनात येतो. टेनिसचं भूत उतरतं. रॅकेटस - असू देत खेळू नंतर परत म्हणून गराजच्या पोटमाळ्यावर जमा होतात.
गराज अश्या असंख्य गोष्टींनी भरलेलं आहे. स्केट बोर्ड, स्केटस, टेनिस-सॉकर-रनिंग असे निरनिराळे शूज, स्किईंगचे स्कीज, शूज, हेल्मेटस, सायकली, त्यांची हेल्मेटं, बेसबॉल- क्रिकेट बॅटस, त्याचं इतर साहित्य...काही काही म्हणता कमी नाही. सगळ्या श्रीगणेशांचे पुरावे तिथे 'खेळी-मेळी'ने नांदतायत.
तर परवा असाच एक नविन फतवा निघाला - स्नो मध्ये स्नो शूईंगला जाण्याचा. अर्थातच श्रीगणेशा हा स्नो शू खरेदी करण्याने झाला. ही एक पायातल्या शूजवर चढवायची फतकलं. ती घालून फताक-फताक करत बर्फात चालायचं. समस्त कुटुंबियांना स्नो -शूज, बर्फात घालायचे हातमोजे, स्नो-पँटस, टोप्या यांची खरेदी झाली. आता उद्या जायचं. सकाळी-सकाळे चांगले नवाला उठलो. मस्त न्हा-धोके, खा-पी के ११ ला बाहेर पडायला घेणार तेव्हा पायातल्या शूज वर ती स्नो-शूजची फतकलं बसतायत का याची पहाणी चालू झाली. यात एका कुमारांच्या बूटांवर ती फतकलं बसली पण दुसर्याच्या बुटांवर ती अडकेनात. मग प्रथम कुमारावर, मग फतकलांवर, मग बूटांवर मग क्रमाने घरातल्या प्रत्येक मेंम्ब्राने उरलेल्या मेंम्ब्रांवर अशी चीडचीड करून झाली. हाती (किंबहुना पायी) काही लागले नाही. मग कुमारांना बूट बदलून दुसरे बूट घालण्याचा एक सल्ला पुढे आला. तो रोजचे शाळेचे बूट घेऊन आला. सहज म्हणून ते उलटे केले तर त्याला रुपयाएवढं भोक - सोलमध्ये. परत एकदा कुमारावर भडिमार....हे कसे झाले अश्या प्रश्नांचा. आता कसे झाले याचे उत्तर तर त्याच्या कडे नव्हते पण - that explains why I feel so cold everyday after the recess in the school- हे त्याचे स्वतःचे स्वतःला explanation!
आता बाहेर पडून त्याला बूट घेणं आलं. मधल्या काळात दुसर्या कुमाराने स्वतःचे जॅकेट शाळेतच नीट ठेऊन येण्याचा उपद्व्याप केलाय अशी एक ताजी बातमी हाती आली. पहिल्यांचं जॅकेट तर शाळेत हरवलंच होतं. त्यामुळे दोन नविन जॅकेटस घेण्याचा अजून एक उपक्रम हाती घेण्यात आला. बाहेर पडून दुकानं धुंडाळून, दोन्ही कुमार, सेनिअर मेंम्ब्र - सर्वांना पसंत पडतील अशी जॅकेटस खरेदी करेपर्यंत १ वाजला. मग अर्थातच सर्वांना भूका लागल्या. त्या शमवण्याच्या कार्यक्रमात २-२.३० वाजून आता आज काही जाण्यात अर्थ नाही असा निष्कर्ष काढून मंडळी घरी परतली. स्नो-शूईंगच्या कार्यक्रमाचा असा जंगी श्रीगणेशा झाला!
हरकत नाही! कालच एक नविन चित्रकलेचा क्लास दिसलाय. श्रीगणेशा करायला हवा!
हाहाहा! एकदम खुसखुशीत!
हाहाहा! एकदम खुसखुशीत! अभ्यासाचा श्रीगणेशा हा नेहमी काहीतरी नवीन विकत आणून व्हायचा हे आठवले!
(No subject)
गराज अश्या असंख्य गोष्टींनी
गराज अश्या असंख्य गोष्टींनी भरलेलं आहे. स्केट बोर्ड, स्केटस, टेनिस-सॉकर-रनिंग असे निरनिराळे शूज, स्किईंगचे स्कीज, शूज, हेल्मेटस, सायकली, त्यांची हेल्मेटं, बेसबॉल- क्रिकेट बॅटस, त्याचं इतर साहित्य...काही काही म्हणता कमी नाही. सगळ्या श्रीगणेशांचे पुरावे तिथे 'खेळी-मेळी'ने नांदतायत.
>> हे सर्व इबे वर विकून टाकावे. डीक्लटर होईल. व खरीच खेळणारे साहित्य वापरून टाकतील.
पुढील वेळेस एकाच व्यक्तीला एकच ट्रायल पुरते काही ते आणावे. म्हणजे कमी खर्च होईल. पण वाढत्या वयात मुलांना नवीन ट्राय करू वाटते. तेव्हा त्यांना सर्व दिले पाहिजे हे आहेच.
मुंबईकर जसे मे च्या लास्ट वीक मध्ये छत्री, रेनकोट चप्पल आणून ठेवतात तसे स्नो सीझन च्या आधी ही खरेदी करता आली तर बरे पडेल की.
हे हे. अस आमच्या घरात पण
हे हे. अस आमच्या घरात पण होत.
रायगड.....कुठे पुरातन काळात
रायगड.....कुठे पुरातन काळात नेऊन सोड्लंस बघ! सग्गळं आठवलं....मस्तच!
भाग १ ची लिन्क दे ना इथे.
थोरांनी म्हणलंच आहे. For
थोरांनी म्हणलंच आहे. For everything else, there is master card !
(No subject)
अमा, हे सगळे केले तर ती
अमा, हे सगळे केले तर ती लिहीणार कशावर ???
आधीच दर्जेदार विनोदी लेखन दुर्मीळ झाले आहे ना....
खुसखुशीत लेख...
भारीच लिहिलयं. that explains
भारीच लिहिलयं.
that explains why I feel so cold everyday after the recess in the school >>> हे भारी होतं.
सुप्पर्केउप्प्र!
सुप्पर्केउप्प्र!
मानुषी, ही घे लिंक : फॅमिली
मानुषी, ही घे लिंक : फॅमिली क्रोनिकल्स १ : लग्नाचा वाढदिवस - आमचं सेलिब्रेशन!
हाहाहा.. श्रीगणेशा..
हाहाहा.. श्रीगणेशा.. भारीये..
माझ्या भावाने जिम जॉइन करताना अगदी तावातावाने बार्गेन करून बारा ऐवजी तेरा महिन्यां ची डील मिळवली होती. जिम ला साजेसे कपडे, शूज ची उत्साहाने खरेदी केली होती.. मात्र १२+१ महीन्यांत.. मुश्किलीने तीनच दिवस जिम मधे दिसला असेल.. त्याचीच आठवण आली हा लेख वाचून..
मात्र १२+१ महीन्यांत..
मात्र १२+१ महीन्यांत.. मुश्किलीने तीनच दिवस जिम मधे दिसला असेल.. >>> अल्टिमेट!!!
मी साधारण तीन वर्षांपूर्वी
मी साधारण तीन वर्षांपूर्वी चित्रकलेच्या प्रांतात माझी तलवार गाजवायची ठरवलं. एक सर बिर ठरवले. ते आठवड्यातून एकदा दोन तासाकरता यायला देखिल लागले. सरांच्या मागोमाग कॅन्व्हासचं एक सगळ्यात मोठ्ठ्या साईजचं पॅड, सर्व प्रकारचे ब्रश, रंग, टर्पेंटाईन आणि लिन्सीड तेलाच्या बाटल्या आणि कहर म्हणजे लग्गेच एक इझेल पण आणलं. (आता ते लपवून ठेवलंय कपाटावर एकदम मागच्या बाजूला कारण ते दिसलं की नवरा खवळतो. )
अशा जंगी तयारीनिशी चित्रकला सुरू झाली आणि - बरोब्बर ओळखलंत - आठवड्यातून केवळ दोन तास माझा कुंचला एका कॅनव्हासवर रंग भरू लागला. सर नाही तर पेंटिंग नाही असा बाणा. त्यामुळे साधारण सहा महिन्यांनी एक चित्रं बनलं. पुढचं काही सांगायला हवंच आहे का?
धन्यवाद लोक्स! अमा, हे सगळे
धन्यवाद लोक्स!
अमा, हे सगळे केले तर ती लिहीणार कशावर ??? >>
मात्र १२+१ महीन्यांत.. मुश्किलीने तीनच दिवस जिम मधे दिसला असेल. >>
आता ते लपवून ठेवलंय कपाटावर एकदम मागच्या बाजूला कारण ते दिसलं की नवरा खवळतो. >>:G
अमा, ह्म्म्म... ईबे वर विकू म्हणता? देशाची प्रायमरी ईकॉणॉमी आम्ही चालवतो...आता सेकंडरी पण चालवू म्हणता? मध्यंतरी पार कोसळलेली अमेरिकन ईकॉनॉमी आमच्यासारख्यांमुळे परत वर आली हे विसरून चालणार नाही!
मामे.. ईझल... धूळ्बीळ
मामे.. ईझल... धूळ्बीळ झटकून ठेव बै, लेकीला कामी येईल नक्की...
रायगड..इकॉनॉमी बद्दल.. अगदी अगदी!!!
ओह...हम्म्म....भाग पहिला
ओह...हम्म्म....भाग पहिला वाचलाय की. तोही मस्तच!
(No subject)
येस्स!! खुप छान वाटलं वाचुन.
येस्स!! खुप छान वाटलं वाचुन. लिहिलय मस्तच आणि फक्त मीच आरंभशुर नाहीये हे पण कळलं म्हणुन पण आवडलंच
मामी सारखंच मी लेकीला घातलेलें चित्रकलेच्या क्लासला. शनि-रवी फक्त. मग शनि-रवी आईकडे जायच.. पिकनिकला जायंच,पहुणेपाहुने, आपण कोणाकडे पाहुणे इइ करणांनी दांड्या व्हायच्या. आता शनि-रवी बंद करुन सोम-बुध चालुये.
हे पण मस्त. देशाची प्रायमरी
हे पण मस्त.
देशाची प्रायमरी ईकॉणॉमी आम्ही चालवतो...आता सेकंडरी पण चालवू म्हणता? >> हे आवडलच. मग टर्शियरी चालव, गराज सेल. शेवटी वॅल्यू व्हिलेज.
मस्तं सीरीज आहे ही. आत्ताच
मस्तं सीरीज आहे ही. आत्ताच पहिला भागही वाचला. खूप छान झाले आहेत दोन्ही भाग.
पाणी, पाणी ..... पाणी आलंय
पाणी, पाणी ..... पाणी आलंय डोळ्यात हे वाचून. ते एखाद्या गोष्टीशी कनेक्ट होणं का काय म्हणतात ना, तसं झालय माझं. रस्त्यात असतातच ईतक्या नयनरम्य जाहिराती की असं घडतच, म्हणून सध्या मी होतकरू (होतं .... करू!) झालोय.
केवळ अप्रतिम लिहीलय. (एकदा ह्या विषयावर आपल्याशी चर्चा करायची आहे :))
भन्नाट !
भन्नाट !
हा पण भाग मस्त!
हा पण भाग मस्त!
मामीचा बाणा पण
मामीचा बाणा पण
मस्तं! आमच्याच घरची गोष्ट
मस्तं!
आमच्याच घरची गोष्ट वाटतेय.
आमच्याकडे पण आमच्या दोन सायकली, मुलांचे कराटेचे युनिफॉर्म्स, विविध रंगांच्या लोकरी असे काहीबाही इथेतिथे लपवलेले असते.
युनिव्हर्सल फेनॉमेनॉन ! छानच
युनिव्हर्सल फेनॉमेनॉन ! छानच मांडलाय !!
शाळेत असताना मीं व माझ्या मित्राने खास शरीसौष्ठवासाठी [ 'बॉडी कमवायला' !] व्यायामशाळेत नांव घातलं होतं.; तीन महिन्यांनंतर शरिरातल्या कोणत्याही स्नायूवर कसलाही ताण पडूं न देतां, फक्त दोन कांठ्यांवर तोल संभाळून चालण्यात सराईत होवून आम्ही व्यायामशाळेला राम राम ठोकला होता !!
येस्स!! खुप छान वाटलं वाचुन.
येस्स!! खुप छान वाटलं वाचुन. लिहिलय मस्तच आणि फक्त मीच आरंभशुर नाहीये हे पण कळलं म्हणुन पण आवडलंच स्मित >> +१
लोकरीसाठी सातीला ++ अजून अस काय काय बरच आहे आणि चालूच आहे
(No subject)
भारी लिहिलंय. जागतिक आरंभशूर
भारी लिहिलंय.
जागतिक आरंभशूर संघटनेचा एक आजन्म सदस्य
Pages