फॅमिली क्रॉनिकल्स १ : लग्नाचा वाढदिवस - आमचं सेलिब्रेशन!

Submitted by रायगड on 28 December, 2015 - 20:49

ही आहे घर-घर की कहानी. माझ्या, तुमच्या कोणाच्या ही घराघरात घडणारे हे किस्से. केवळ पात्रांची नावं, तपशिल बदलले जातात पण किस्से थोड्या-फार फरकाने कुठेही घडणारे!
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आज आमच्या लग्नाचा वाढदिवस! दरवर्षीच अजून एक वर्ष आपण एकमेकांबरोबर कसं काय घालवलं ह्या विचारानी आम्हालाच आश्चर्य वाटतं.

तर सकाळी सकाळी त्याला त्याच्या बहिणीचा का कोणाचा व्हॉटस अप आला वाटतं कारण त्याने घोषणा केली,
"१२ बरं का!"
"१२? काय १२ वाजले? एवढा वेळ झोपले मी आज?" तसा रविवार असल्याने घाई नव्हती पण १२?
"अगं, लग्नाचा १२ वा वादि आहे आज!", तो.
"अरे वा! कोणाच्या?",मी!
"अगं कोणाच्या काय, आपल्या!"
"अरे १२ वा नाही काय मग, तेरावा! १३ वर्ष सहन करत्ये तुला मी, विसरेन का?"
"अगं, १३ वर्ष लग्नाला झाली म्हणजे १२ वा वादि!"

मग पहिले संयत चर्चा, मग बाचा-बाची, मग थोडी जोरदार आतषबाजी अश्या चढ्या क्रमाने सकाळ आणि वदि ची सुरुवात योग्य मार्गानेच झाली. कोणीसेसे म्हटलेच आहे ना थोडेसे वाद-विवाद चांगल्या नात्याला पोषकच! आमचं नातं त्या हिशोबाने बरंच पोषक झालंय.

या आतषबाजीने मुलं उत्सुकतेपोटी धावत आली.

"काय झालं?"
"अरे आज आमची लग्नाची अ‍ॅनिव्हर्सरी आहे ना, त्याच्या शुभेच्छा देतोय एक-मेकांना"
"Oh cool!We are so glad you guys got married because then we were born." त्यांचा एक वेगळाच narcissist view! "Lets go out for celebration."

हे मात्र त्यांचं मला पटलंच. एकाएकी anniversary celebration हे कर्तव्या पार पाडण्याची जबाबदारी शिरी घेतल्यासारखी मी तडक बेडमधून बाहेर आले.

कर्म-धर्मसंयोगाने रेस्टॉरंटला जात असताना वाटेत त्याला एक पाटी दिसली - Divorce in $99!

"ओह ,वॉव! अरे अमेझिंग डील आहे. $99 मध्ये डिव्होर्स!...एवढं चांगलं डील परत मिळणार नाही, घेऊन ठेऊया!"
कोणी डील मध्ये विष वाटत असलं तरी मला खात्री आहे हा माणूस घेऊन ठेऊया म्हणेल.
"Buy one get one free आहे का ते विचारलं पाहिजे.मग कोणाबरोबर तरी $99 अर्धे-अर्धे करू, $४९.५० मध्ये डीव्होर्स, फारच अमेझिंग डील!"
"भलती स्वप्न बघू नकोस...ह्या जन्मात काय पुढली सात जन्म पण तुला सोडणार नाहीये. आताशा मी वटपौर्णिमा पण चालू केल्ये. मला तुझा त्रास सहन करावा लागला तरी चालेल पण तुला आनंद मिळू देणार नाही!"

मागून "Oh, you guys are thinking of taking a divorce? just like Steve's parents? How cool, we get to stay one week at dad's house and one week at mom's house" असे काहीसे संवाद ऐकू येऊ लागल्याने मी त्या विषयाला फार पुढे नेलं नाही.

जेवणानंतर नवा स्टार-वॉर्स बघायला जायचं असं गाडीतल्या back-benchers नी परस्पर ठरवून टाकलं आणि पुढच्या चक्रधरानेही तो प्लॅन उचलून धरला. आता घरात युद्ध कमी होतात का की हे पैसे देऊन अजून एक युद्ध बघायला जावं? मूळात मी शांतताप्रिय असल्याने मी तत्परतेने माझा शॉपिंगचा प्लॅन मांडला. कुठेसेसे काय-कायसे सेल्स लागलेत याची वर्णनं ऐकवली. त्यामुळे boys vs girls अशी तट पडून तिघं boys स्टार-वॉर्सला आणि एक girl शॉपिंगला अशी विभागणी झाली. ही तर फारच आनंदाची गोष्ट! नाहीतरी कधीकाळी चुकून ही boys gang शॉपिंगला आली तर लंबगोलाकार चेहरे करून फिरत असतात. नको ते शॉपिंग, चला घरी जाऊ आणि टि. व्ही. ला डोळे चिकटवून बसा एकदाचे असं होऊन जातं.

हे सकाळपासून असे प्रेमळ संवाद चालू असताना मात्र जेवताना मी फेसबुकावर "celebrating wedding anniversary, feeling festive" हे अपडेट टाकायला मी विसरले नाही. त्याबाबतीत मी particular आहे. मग एकदा माझ्या फोनने, एकदा त्याच्या फोनने सेल्फीज; त्यातला त्याच्या फोनवर काढलेला आवडल्याने ( त्याच्या फोनवरून माझे फोटोज मस्त बारीक येतात, असं माझं निरेक्षण आहे) तो व्हाटसअ‍ॅपवरून मला पाठवायला लावणे, मग ते फोटोज ड्युली समस्त व्हॉअ‍ॅ गृपवर फॉरवर्ड करणे असं सगळं यथास्तित पार पाडत जेवण उरकलं.

हे व्हॉअ‍ॅ प्रकरण मला फार आवडलय. घरच्या घरी एकमेकांशी बोलायला बरं पडतं ते. मग ती शब्दांची आतषबाजी तेवढी होत नाही. आता घरायल्या ज्युनिअर मंडळींना पण फोन घेतले की झालं. पण मग ते शाळेत घेऊन जाणार आणि सध्याचा शाळेत साधारण ३ दिवसाला एक वस्तू हरवण्याचा वेग बघून तो बेत लांबणीवर आहे. तर ते असो.

जेवल्यानंतर घेतलेल्या कॉफीचा फोटो बघून एका व्हॉअ‍ॅ गृपवर एकजण चिरकली -
"अगं, नुस्ती कॉफी? काय झालं तरी काय तुला?"
"अगं नुस्ती कॉफी कशी घेईन त्यात आहे ना, कल्हुआ! कॉफी आणि आजचा दिवस वाया थोडीच घालवणार मी?"
"हं, मग ठीके. मला वाटलं अ‍ॅनिव्हर्सरी निमित्त सोडलीस की काय!"
"सोडेन ना, पन्नासाव्या अ‍ॅनिव्हर्सरीला सोडणारच आहे."
"कोणाला, नवर्‍याला?", अजून एकीने विचारणा केली.
"त्याला सोडते म्हटल्यावर त्याच्या चेहर्‍यावर अतीव आनंद दिसतो मला. त्याला बरी सोडेन. १३ वर्षात प्रोडक्ट ठाकून- ठोकून तयार केलंय. एव्हढी मेहेनत घेतल्यावर आता या वयात परत दुसरा गाठून कोण ते ठाक-ठुकीचं काम करणार परत? असू देत, तसंही पुलंनी सांगून ठेवलंय. सगळे नवरे सारखेच, दुसरा बरा दिसतोय म्हणून पहिला सोडण्यात काही तथ्य नाही. पदरी पडलं आणि पवित्र झालं, झालं!", मी.

जेवण असं खेळीमेळीत पार पडल्यावर आम्ही आपापल्या मार्गाने निघालो. म्हणजे boys gang स्टार वॉर्स च्या दिशेने आणि girls gang दुकानांच्या दिशेने . “Having fun, shopping with the family, feeling happy” असं फेसबुक स्टेटस अपडेट करायला मी विसरले नाही. हो चारचौघांत असं politically correct च लिहावं. थोडया वेळाने फेसबुक परत उघडून बघते तर त्याचं स्टेटस - “Having fun, watching Star Wars with the family, feeling happy!!!”

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

“having fun, shopping with the family, feeling happy” असं फेसबुक स्टेटस अपडेट करायला मी विसरले नाही. हो चारचौघांत असं politically correct च लिहावं. थोडया वेळाने फेसबुक परत उघडून बघते तर त्याचं स्टेटस - “having fun, watching star wars with the family, feeling happy!!!”>>>

Happy

मस्त Happy
शेवटचं वाक्य पण छान.
आमची दोघांची पण अटळ श्रद्धा आहे की अ‍ॅनीव्हर्सरी च्या ट्रिप मध्ये किंवा त्या दिवशी एक जोरदार भांडण झालं नाही तर लग्नाला दृष्ट लागते.
खरं तर जोरदार भांडण घरी केल्यावर माझे इंटरव्ह्यू पण क्लीयर होतात असा तीनदा अनुभव होता. पण नंतर ओढून ताणून भांडणं उकरायला लागल्यावर त्या अनुभवाला तडा गेला. नकळत मुंगी खाल्ल्यावर राजा बनतं तसं नकळत जोरदार भांडण केल्यावरच इंटरव्हयू पास होत असावा. Happy

मस्त!!

छानच लिहिलंय. Happy

बर्‍याच जणांना/जणींना वाचताना अगदी-अगदी झालं असणार>>>>>>>> १००. Happy आमचीही झाली आताच २३ दिसें. ला ११ वर्ष पुर्ण.

मस्त Happy

एव्हढी मेहेनत घेतल्यावर आता या वयात परत दुसरा गाठून कोण ते ठाक-ठुकीचं काम करणार परत?
>>>
अगदी अगदी.. आणि तुमच्या त्या यांनाही आता पुन्हा कोणी तोडमरोडके आपल्या हिशोबाने ठाकठुक केलेले जमणार नाहीच.. अ‍ॅनिवर्सरीच्या शुभेच्छा Happy

मस्त !
आम्ही तर एका वा दि ला picture बघायला गेलो . बघू जो लागलाय तो . आधीच नेहमिप्रमाणे उशीर . नंतर नाव वाचले
I Hate Love Story

Pages