Submitted by सुप्रिया जाधव. on 25 December, 2015 - 10:58
असावा दोष अपुल्या कुंडलीचा
मिळाला जन्म हा ताटातुटीचा
मनाला मागणे सुचण्याअगोदर
उडाला केस माझ्या पापणीचा
भरारा धूळ जर डोळ्यात गेली
असर होईल का रे फुंकरीचा
दिले बदल्यात आहे मन मनाच्या
ठरावा गौण मुद्दा ऐपतीचा
तुझ्या नशिबातले अपसूक मिळते
पुरवठा होत नसतो मागणीचा
प्रकाशाला तुझ्या आधार माझा
जरी मी क्षुद्र आहे कण धुळीचा
विदारक सत्य रेखाटून जाते
गुन्हा अक्षम्य घडतो लेखणीचा
तुझ्या हव्यास ना तारांगणाचा
मला दे चन्द्र माझ्या वाटणीचा
सुप्रिया
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरेख गझल! 'आपसुक' शब्दात लय
सुरेख गझल!
'आपसुक' शब्दात लय चुकत आहे. अपसूक असे करायला लागेल बहुधा!
शुभेच्छा!
केवळ अप्रतिम....
केवळ अप्रतिम....
>>>विदारक सत्य रेखाटून
>>>विदारक सत्य रेखाटून जाते
गुन्हा अक्षम्य घडतो लेखणीचा>>>क्या बात!
तुझ्या हव्यास ना तारांगणाचा
मला दे चन्द्र माझ्या वाटणीचा>>>खास!
वाह सुप्रिया … सुंदर
वाह सुप्रिया … सुंदर गझल
सर्वच शेर आवडले
सुंदर गझल…
सुंदर गझल…
सुंदर, हृदयस्पर्शी.
सुंदर, हृदयस्पर्शी. नेहमीप्रमाणे.
_/\_
_/\_
आभार सगळ्यांचे ! दुरुस्ती
आभार सगळ्यांचे !
दुरुस्ती केलीय धन्यवाद बेफीजी !
सुप्रिया
शेवटचे दोन सर्वात छान
शेवटचे दोन सर्वात छान