प्रेरणा- http://www.maayboli.com/node/56756
प्रेषक-नेहमीचेच अति-उत्साही
आयुष्यातील पहिला धागा कधी काढला आठवत नाही. आयुष्यातील शेवटचा वाह्यातपणा कधी केला आठवत नाही. पण आठवेल तसे सांगतो. काही एकट्याचे पराक्रम आहेत, तर बरेचसे मित्रांच्या टोळक्याने केलेले..
या वयात आपले फंडे वेगळेच असतात. धागा काढणे (जिलब्या पाडणे ) हे गैरकृत्य कमी आणि धाडसाचे काम जास्त वाटते. अंगात किडा असणे आणि डेअरींग असणे हे समानार्थी शब्द समजले जातात. तेव्हाचे कधीचेतरी हे किस्से. आज सहज विषय निघाला म्हणून उगाळले गेले, म्हटले लिहून संकलित करूया..
सुरुवात गेल्या वर्षीपासून करूया. वय वर्ष साधारण २५-३० असावे.. त्या वयातही आम्ही एवढे वस्ताद होतो की वाचकाना मी कोण आहे याचा अजिबात पत्ता लागू न देता अनेक शतकी धागे काढले .बघता बघता माबोवर फेमस झालो माझ्या गर्लफ्रेन्ड मुळे मला अनेक विषयांवर मटेरियल मिळत गेले आणि मी भराभर धागे काढत गेलो
पुढे मग मोठा ग्रूप बनला. अर्थात, सारेच या कलेत माहीर नव्हते, पण मोहीम फत्ते नेण्यास गरज सर्वांचीच होती.
पुढे माबो प्रकाशकांच्या अन वाचकांच्या लक्षात येऊ लागले, आमच्यावर लक्ष ठेवले जाऊ लागले, आणि ही धमाल संपली!
माझ्या वाईट सवयीच्या धाग्यावरुन मला सर्वानी ठोकले आणि त्यानन्तर मी भरमसाठ धागे काढणे बन्द केले...
एकंदरीत आजवरच्या सर्वच प्रकरणात, कुठे पकडलो गेलोय, कुठे मार पडलाय, कुठे मानहानी झालीय असे कधीच घडले नाही हे एक कौतुकास्पद!
त्यामुळे कधी कधी वाटते की मी ईंजिनीअर झालो नसतो तरी एखादा छोटामोठा धागालेखक बनत आपले आणि आपल्या बायकापोरांचे पोट भरलेच असते.
तर हे एक माझे झाले, आता तुम्हाला कोणाला ईथे लिहून हलके व्हायचे असेल तर व्हा बिनधास्त.
कसली भिती वाटत असल्यास सर्वांसाठी एक कॉमन डिस्क्लेमर टाकतो.
डिस्क्लेमर - या लेखात वा प्रतिसादांत, आलेले वा येणारे, बहुतांश वा सर्वच, किस्से वा कथा, काल्पनिक वा आतिशयोक्तीपुर्ण, असण्याची दाट शक्यता असून एखादी घटना खरी आहे आहे याचा सबळ पुरावा असेल तरच आक्षेप उचला. अन्यथा जय हिंद, जय महाराष्ट्र!
तुमचाच
तोच तो
..................................................................................................
वैधानिक इशारा - उगाचच्या उगाच फालतू भरमसाठ बिनडोक धागे काढून (अर्तात जिलब्या पाडून ) आपल्याला ऑफिसात काही काम नसते असे भासवणे व माबोची बॅन्डविड्थ आणि ऑफिसचे इन्टरनेट यान्चा अपव्यय करणे हे चुकीचे ॑व अनैतिक आहे... !
ज ब रा ट
ज ब रा ट
लेख वाचून टीव्हीवरच्या
लेख वाचून टीव्हीवरच्या टेलीशॉपिंगसारखे -
" मैं पेहले अपने ओरिजिनल आयडीसे धागा निकालता था | लेकिन उसपे कोई प्रतिसाद नही आता था | इसलिये मैं काफी उदास और अकेला रहता था | फिर मुझे मिला ये एक डु-आयडी | इसकी वजह से अब मेरे धागे पे बहुत प्रतिसाद आते हैं | प्रतिसादों की कमी बिल्कुल महसूस नही होती है | मन में शक्ती का अहसास होता है | आजकल मैं बहुत जिलबीयां पाडता हूं और फिर भी थकता नही हूं | आप भी आजही ट्राय किजीये और आनंद पाईये - बिल्कुल नया डु-आयडी! "
- ह्या स्टाईलची प्रतिमा डोळ्यासमोर आली.
लई भारी!!
लई भारी!!
त्या त्याची लिखाणाची स्टाईल
त्या त्याची लिखाणाची स्टाईल मस्तच.की तुम्ही, तोच तो?
(No subject)
हा हा.. मस्तच राव.. माझ्या
हा हा.. मस्तच राव.. माझ्या लेखाचा पार शोले करून टाकलात.. सही जमलंय
ऑरकुट वरील कामगिरी, यापूर्वी
ऑरकुट वरील कामगिरी, यापूर्वी वेगळ्या आय डी ने केलेले लिखाण हे आणखी काही मुद्दे घ्या.
झकास आहे विडंबन!
झकास आहे विडंबन!
ऋ जिलब्या पाडतो? छे,त्याचा
ऋ जिलब्या पाडतो?
छे,त्याचा बदामी हलवा असतो.फक्त आताच्या चोरीच्या धाग्यात गर्लफ्रेंड्स आणि बदामचोरी याचा उल्लेख आला नाही कारण गर्लफ्रेंड्स मायबोली वाचत असाव्यात.
छान.... विडम्बन आवडले..
छान.... विडम्बन आवडले..
(No subject)
मस्त जमलयं.
मस्त जमलयं.
नाही जमले विडंबन.
नाही जमले विडंबन.
मस्त
मस्त
छाने. तरी पुई,
छाने. तरी पुई, सुप्पर्र्स्स्ट्टार्र, गेरुआ खान वैगेरे अॅड करा.
विडंबन आवडले
विडंबन आवडले
नो मोअर कॉमेण्ट्स...
नो मोअर कॉमेण्ट्स...
धन्यवाद प्रतिसादक हो यावरुन
धन्यवाद प्रतिसादक हो
यावरुन ऋन्म्याभाउ काहितरी बोध घेतील अशी (वायफळ) अपेक्षा !
UffCourse !! भाग -२ मध्ये
UffCourse !!
भाग -२ मध्ये विडंबन आणखी मजेशीर होईल अशी वाक्ये लेखात पेरेन,
किंवा दुसर्याच दिवशी ईतर कोणाला संधी न देता मीच त्याचे विडंबन करेन
तडाखा ॠन्मेश
तडाखा ॠन्मेश
निगरगट्ट शब्द बरोबरे का?
निगरगट्ट शब्द बरोबरे का?
अरे मुला ____/\____
अरे मुला ____/\____
उडन खटोला व
उडन खटोला व भास्कराचार्य....
महान धागा रादर विडंबन आणि कमेंट
सस्मि, निगरगट्ट सोबतच पडलं
सस्मि, निगरगट्ट सोबतच पडलं तरी नाक वर, पालथा घडा हे शब्द पण बरोबरच्चेत
उडन खटोला व
उडन खटोला व भास्कराचार्य....
महान धागा रादर विडंबन आणि कमेंट हाहा>>> +११११
दुसर्याच दिवशी ईतर कोणाला
दुसर्याच दिवशी ईतर कोणाला संधी न देता मीच त्याचे विडंबन करेन
>>
जे बात !!
आमचा एक ऋन्मेष अश्या शंभर
आमचा एक ऋन्मेष अश्या शंभर विडंबनकारांना पुरून उरेल!
भारी जमलंय विडंबन!!!
भारी जमलंय विडंबन!!!
लय भारी!
लय भारी!
पडलं तरी नाक वर, पालथा
पडलं तरी नाक वर, पालथा घडा>>>>>>>>>>> +१
आमचा एक ऋन्मेष अश्या शंभर विडंबनकारांना पुरून उरेल!>>>>>
Pages