प्रेरणा- http://www.maayboli.com/node/56756
प्रेषक-नेहमीचेच अति-उत्साही
आयुष्यातील पहिला धागा कधी काढला आठवत नाही. आयुष्यातील शेवटचा वाह्यातपणा कधी केला आठवत नाही. पण आठवेल तसे सांगतो. काही एकट्याचे पराक्रम आहेत, तर बरेचसे मित्रांच्या टोळक्याने केलेले..
या वयात आपले फंडे वेगळेच असतात. धागा काढणे (जिलब्या पाडणे ) हे गैरकृत्य कमी आणि धाडसाचे काम जास्त वाटते. अंगात किडा असणे आणि डेअरींग असणे हे समानार्थी शब्द समजले जातात. तेव्हाचे कधीचेतरी हे किस्से. आज सहज विषय निघाला म्हणून उगाळले गेले, म्हटले लिहून संकलित करूया..
सुरुवात गेल्या वर्षीपासून करूया. वय वर्ष साधारण २५-३० असावे.. त्या वयातही आम्ही एवढे वस्ताद होतो की वाचकाना मी कोण आहे याचा अजिबात पत्ता लागू न देता अनेक शतकी धागे काढले .बघता बघता माबोवर फेमस झालो माझ्या गर्लफ्रेन्ड मुळे मला अनेक विषयांवर मटेरियल मिळत गेले आणि मी भराभर धागे काढत गेलो
पुढे मग मोठा ग्रूप बनला. अर्थात, सारेच या कलेत माहीर नव्हते, पण मोहीम फत्ते नेण्यास गरज सर्वांचीच होती.
पुढे माबो प्रकाशकांच्या अन वाचकांच्या लक्षात येऊ लागले, आमच्यावर लक्ष ठेवले जाऊ लागले, आणि ही धमाल संपली!
माझ्या वाईट सवयीच्या धाग्यावरुन मला सर्वानी ठोकले आणि त्यानन्तर मी भरमसाठ धागे काढणे बन्द केले...
एकंदरीत आजवरच्या सर्वच प्रकरणात, कुठे पकडलो गेलोय, कुठे मार पडलाय, कुठे मानहानी झालीय असे कधीच घडले नाही हे एक कौतुकास्पद!
त्यामुळे कधी कधी वाटते की मी ईंजिनीअर झालो नसतो तरी एखादा छोटामोठा धागालेखक बनत आपले आणि आपल्या बायकापोरांचे पोट भरलेच असते.
तर हे एक माझे झाले, आता तुम्हाला कोणाला ईथे लिहून हलके व्हायचे असेल तर व्हा बिनधास्त.
कसली भिती वाटत असल्यास सर्वांसाठी एक कॉमन डिस्क्लेमर टाकतो.
डिस्क्लेमर - या लेखात वा प्रतिसादांत, आलेले वा येणारे, बहुतांश वा सर्वच, किस्से वा कथा, काल्पनिक वा आतिशयोक्तीपुर्ण, असण्याची दाट शक्यता असून एखादी घटना खरी आहे आहे याचा सबळ पुरावा असेल तरच आक्षेप उचला. अन्यथा जय हिंद, जय महाराष्ट्र!
तुमचाच
तोच तो
..................................................................................................
वैधानिक इशारा - उगाचच्या उगाच फालतू भरमसाठ बिनडोक धागे काढून (अर्तात जिलब्या पाडून ) आपल्याला ऑफिसात काही काम नसते असे भासवणे व माबोची बॅन्डविड्थ आणि ऑफिसचे इन्टरनेट यान्चा अपव्यय करणे हे चुकीचे ॑व अनैतिक आहे... !
व्हयं, मागणी तशी पुरवठा..
व्हयं, मागणी तशी पुरवठा.. माबोवरचे विडंबनकार वाढले तर मला त्यांना कच्चा माल पुरवायला आणखी कंबर कसावी लागेल .. पण जे माझ्या लेखाला प्रसिद्धी देतात त्यांच्यासाठी कायपण कुठेपण !
Pages