आमची माती ..... आमची कलाकॄती

Submitted by विनार्च on 12 December, 2015 - 14:28

"हाती आलेल्या मातीचा पुरेपूर वापर करणे" हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आम्ही सहामाही परीक्षा...दिवाळी ..शाळा असल्या मोहमायेत न गुंतता बजावला याचाच पुरावा सादर करत आहोत Wink

बुद्ध ....
IMG_20151031_194012.jpg

आमचा ऑल टाइम फेव्हरेट .. डायनो
IMG_20151105_190756.jpg

टिकी हेड पेनस्डॅन्ड
IMG_20151212_174152-001.jpg

याच्या नशिबी रंग होते Wink
IMG_20151212_174248.jpg

हे गुग्गूम पेनस्डॅन्ड..... बंगालीमध्ये घुबडाला गुग्गूम म्हणतात असं कुठेसं वाचल होत , तेंव्हा पासून आम्ही गुग्गूमच म्हणतो Proud
IMG_20151111_164452.jpg

दिवाळीत गिफ्ट मिळालेल्या जिरो निमो च्या पुस्तकांचा राखणदार ...
IMG_20151111_164303.jpg

हा दिवसभर वापरलेली ज्वेलरी सांभाळणारा "डकी"
IMG_20151111_164410.jpg

हा आईसाठी केलेला ज्वेलरीबॉक्स ..
IMG_20151212_173903.jpgIMG_20151212_173802.jpg

आईला पक्के ओळखत असल्याने केलेली अरेंजमेंट..... अब वो कौन पूरा ढ्क्कन उठाये Wink
IMG_20151212_173710.jpg

खजिन्याचा संदूक
IMG_20151212_173349.jpgIMG_20151212_173503.jpg

आत सुवर्णमुद्राही आहेत हो..... मनात पाप असेल तर त्यांची माती होते Wink
IMG_20151212_173605.jpg

हे बाबाच बर्थडे गिफ्ट ...त्याचे छोटे छोटे इलेक्ट्रॉनीक कंपोनन्ट ठेवायला ..
IMG_20151212_174005.jpg

भातुकली खेळायला कधी मजा नाही आली पण बनवायला खूप मज्जा आली Happy
IMG_20151121_231811.jpgIMG_20151121_232005.jpg

दिवाळीच्या सुट्टीत, ह्या सगळ्यांच एक छोटूस प्रदर्शन भरवल होत ..माझ्या फेंड्ससाठी Happy
IMG_20151121_232230.jpg

त्या बुक्ससाठी स्टँडही आम्हीच बनवून रंगवलाय...तो बाहेर डोकावणारा ड्रॅगन आमचा बुकमार्क आहे..किती पुस्तक वाचून झाली ते दाखवतो तो . Happy
IMG_20151212_174028.jpg

तुम्हीही नक्की सांगा हा ...कश्या वाटल्या माझ्या कलाकॄती Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा!! किती सुंदर बनवलय.
भातुकली एकदमच भारी आहे.
जिरो निमो च्या पुस्तकांचा राखणदार ... तो हि फार सुरेख
आणि सगळे पेनस्टॅन्ड पण फार आवडले Happy

हायला काय गुणी पोर आहे ग तुझी.:स्मित: माझ्या मुलीला हे दाखवले तर वेडीच होईल आश्चर्याने. मस्त घडवलेत!

भातुकलीचा सेट, गुग्गुम आवडले, लय भारी.

छानच

एकच नंबर...
ती संदूक आधी मला कोस्टर्स स्टॅण्ड सारखी वाटली. म्हणजे संदूकीच्या आकाराचा कोस्टर्स स्टॅण्ड विथ कोस्टर्स असं.

सुंदरच.. गुग्गुम सारख्या वस्तूत तर उत्तम कल्पनाशक्ती दिसतेय. तिच्या कलेतील प्रगतीला आम्ही साक्षीदार आहोत याचा खुप आनंद होतोय.

विनार्च, वा फार सुरेख. मी ह्या दिवाळीला घरी पणत्या रंगवल्या. तू तो धागा पहा आणि पुढील वर्षी तुझ्या कन्येला रंग आणि पणत्या रंगवायला सांग ती हौसेने हे काम करेन आणि ह्यातून खूप कलागुण विकसित होतील. मी माझ्या बालपणी रंगांचे आणि मातिचे केवढे तरी उद्योग केले आहेत.

मस्त !!!

गुग्गूम, राखणदार मस्तच..भातुकलीचा सेट भारीये. बुक्सस्टँडचा पण क्लोजअप टाका.

Pages