कलेजी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 2 December, 2015 - 02:40
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पाव किलो कलेजी
२ मोठे कांदे चिरून
४-५ लसुण पाकळ्या ठेचून
२ चमचे आल-लसुण पेस्ट
अर्धा लिंबाचा रस (नसला तरी चालेल)
पाव चमचा हिंग
१ चमचा हळद
२ चमचे मसाला किंवा १ चमचा लाल तिखट
१ चमचा गरम मसाला
२ मोठे चमचे तेल
थोडीशी कोथिंबीर चिरून
चवीनुसार मिठ

क्रमवार पाककृती: 

प्रथम कलेजी कापून स्वच्छ धुवून घ्यावी. त्याला आल-लसुण पेस्ट आणि लिंबाचा रस लावून ठेवावा. भांड्यात तेल गरम करून त्यावर लसूण पाकळ्यांची फोडणी देऊन कांदा बदामी रंग येईपर्यंत तळावा. त्यात हिंग, हळद, मसाला घालून कलेजी परतवावी. आता भांड्यावर झाकण ठेवून त्यावर पाणी ठेऊन वाफेवर मिडीयम गॅसवर कलेजी शिजू द्यावी. मधून मधून परतावी. शिजल्यावर मिठ व गरम मसाला व कोथिंबीर घालून पुन्हा एक वाफ येऊ द्यावी व परतवून गॅस बंद करावा. झाली कलेजी तय्यार.

वाढणी/प्रमाण: 
४ जणांसाठी
अधिक टिपा: 

रश्यामधल्या कलेजी पेक्षा अशी कलेजी जास्त रुचकर लागते. कलेजी फ्राय ही अधीक रुचकर लागते.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त दिसत्ये. ही बोकडाची कलेजी आहे ना? चुलीत भाजलेल्या कलेजीची रेसिपी टाका ना, जागू किंवा स्वाती.

बरं झालं दक्षिणाने विचारला प्रश्न. मलाही तोच प्रश्न पडला होता. Happy
छान माहिती दीमा. यातले काहीही माहित नव्हते.

धन्यवाद जागू.

ह्या : ह्या: ह्या:
मला तं बाप्पा वाटले की कलेजी लईच फॅट्टी असेल . त्यामुळे ती टाळतच होतो. माझ्या कलेजीतही फ्याट हय असे डागदर म्हणीत हुता ( मुडदा बशिवला त्या डागदराचा !) .. कलेजी खायला हर्कत नाय आसं दीड डाक्तराच्या म्हणण्यानुसार दिसते. चिकन माझ्या दातात अडकते आन लई तरास हुतो. म्हंजी असं का सायबाच्या पुढ्यात बस्लं तरी ' म्या हितं दातात हय बर्का " असं ते शिंचं चिकन सार्की आटवण काढून देतं. मुडदा बशिवाला त्या चिकनचाही. त्या परीस कलेजी बरीच बरी . क्वॉय?

जागूताई, तुझ्या इतर मांसाहारी रेसिपीन्सारखीच ही सुद्धा एकदम मस्त आहे. प्लीज वरती कलेजी फ्राय आणि चुलीवरच्या कलेजीची रेसिपी पण अपडेट कर ना!

माझ्या कलेजीतही फ्याट हय असे डागदर म्हणीत हुता ( मुडदा बशिवला त्या डागदराचा !)
<<
हे बरंय.
स्वतः अरबट चरबट खाऊन पिऊन स्वतःचं लिव्हर खराब करायचं, अन ते लिव्हर खराब झालंय हे डॉक्टरने तुमच्या लक्षात आणून दिलं, की डागदराचा मुडदा काय? 62.gif

डागदरा, मी अजिबात पीत नाही रे बाबा. खातो. तेही जास्त नाही. वेळीअवेळी.रात्रीच्या जेवनाने माझा घात केला आहे असे ( दुसरा ) डागदर म्हणितला:(

सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.

आता फोटोसकटच टाकेन नंतर रेसिपी.

<<दिमाच्या राजकारण सोडुन सगळ्या पोष्टी खुप चांगल्या असत्यात असं एक निरिक्षण.. डोळा मारा>>
मला तर त्यांच्या सगळ्याच पोस्ट्स खूप आवडतात Happy

जागूताई, त्या भजी च्या पाककृती च्या प्रतिसादातला फाऊल रद्द आणी तुम्हाला एक फ्री हिट! कसलं दणदणीत रेसिपी हो! लागा 'कलेज'वा कटार!

बोकडाची (आणि अजून एका वादग्रस्त प्राण्याची) कलेजी खाल्ली आहे. चिकनची नाहीच. वास आणि चव दोन्ही फारच उग्र असतात पण एकदा टेस्ट डेव्हलप झाली की मज्जा.

छान रेसिपी... अनेक हॉटेलातल्या मेन्यूवर दिसतो. पुर्वी आमच्याकडे पण आणत असत. आता आम्ही सर्व शाकाहारी झालोत !

दीमांनी सांगितलेला फ्वा ग्रा, माझ्या फ्रेंच मित्रात फार लोकप्रिय होता. मुद्दाम वेगळा चारा चारून त्या पक्ष्याच्या कलेजीला सूज आणतात.

पाककृतींचा विभाग सार्वजनिक का करतात ? Angry

कृपया पाककृतींचा विभाग सार्वजनिक करू नये. ऑफिसमधे एक तर लक्ष लागत नाही वर डब्यात रोज चमचमित यायला आम्ही अंबानी नाही आहोत. Sad
Light 1

मुद्दाम वेगळा चारा चारून त्या पक्ष्याच्या कलेजीला सूज आणतात.

>>
हे फारच अमानुष आणि क्रूर आहे. हा धागाच क्रूर आहे

जयंत Lol

रुप्स, नंदिनी, दिनेशदा धन्यवाद.

भ्रमर मी टाकेन काही दिवसांनी कलेजी फ्राय. अगदी सोपी आहे. आत्ता सांगते. नंतर फोटो सकट देईन.

कलेजी धुवून तिला मिठ, मसाला, हळद, हिंग लावायच. थोडा लिंबाचा रस लावायचा म्हणजे वास निघून जाईल.
मग तव्यावर तेलात थोड्या हव्या असल्यास लसुण पाकळ्या ठेचून टाकायच्या. नंतर त्यावर कलेजी मंद गॅसवर तळायची. मंद ह्यासाठी की ती जरा तडतडून तेल उडते.

हे फारच अमानुष आणि क्रूर आहे. हा धागाच क्रूर आहे .>>>>+१
वाचताना पण कसेतरी होतय.>>>>>>>>>>>>>>> खरंच. कधी करायला वेळ मिळेल आणि कधी खाइन तोपर्यंत कसंतरीच होणारेय. रविवारी जमवायला पाहिजे. Happy

हे फारच अमानुष आणि क्रूर आहे. हा धागाच क्रूर आहे
<<
फ्वाग्रा बद्दल बरोबर आहे, त्यामुळेच त्या खाद्यपदार्थावर भारतात बंदी आहे.

धागा क्रूर म्हणणार्‍यांना मांसाहार क्रूर/वाईट वगैरे वाटतोय का? तसं असेल, तर इथून कलटी मारा. आम्ही काय खातो, याच्या पंचायती करायची गरज नाही.

शाकाहारातल्या क्रौर्याच्या अन घाणीच्या गमती सांगितल्या, तर उलट्या येतील तुम्हाला, अन वायूभक्षण करून रहावे लागेल.

तेव्हा प्लीजच. क्रूर वगैरे म्हणू नका.

म्हणायचाच असला तर सस्मित यांनी म्हटलाय तसा क्रूर म्हणा. Wink थँक्यू.

मी कलेजीला लहानपणी चॉकलेट बोलायचो Happy
आणि अर्थातच आवडीने खायचो.
आताही आवडतेच पण लहानपणीची क्रेज कमी झाली आहे.
कलेजी = कलेजा = हृदय / यकृत ऐकून मजा आली. मी शाळेत सायन्स वायन्स करायच्या आधीही मला कलेजी म्हणजे लिवर समजले होते याचा मग अभिमानही वाटला.
फ्राय असो वा रस्श्यातील दोन्ही आवडतात. पण घरी जास्त रश्यातील होते. आमचा रस्सा भारी असतो. मालवणी मसाले जिंदाबाद.
बरेचदा चिकनमटणबरोबरच रस्स्यात असते. कधी कधी खीम्यामध्ये कलेजीचे बारीक बारीक तुकडे करून एकत्र करतो. पावाबरोबर किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर भारी लागते.
कोंबडीचीही काही वाईट नाही पण मला छोट्याची जास्त आवडते. Happy

ऋन्मेष आता चॉकलेटला कलेजी बोलून टाका. Lol मालवणी मसाले मलाही आवडतात.

तेव्हा प्लीजच. क्रूर वगैरे म्हणू नका.

म्हणायचाच असला तर सस्मित यांनी म्हटलाय तसा क्रूर म्हणा. डोळा मारा थँक्यू.

धन्यवाद दिमा.

श्री, सस्मिता धन्यवाद.

कालच करुन पाहिली. (मीच केली). घरचे खुष. आता कलेजी फ्राय पण करुन पाहिन Happy

कलेजीला कुकरमधे एकदा वाफवुन घेउन मग बनवली तर ती सॉफ्ट होईल का?

Pages