कलेजी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 2 December, 2015 - 02:40
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पाव किलो कलेजी
२ मोठे कांदे चिरून
४-५ लसुण पाकळ्या ठेचून
२ चमचे आल-लसुण पेस्ट
अर्धा लिंबाचा रस (नसला तरी चालेल)
पाव चमचा हिंग
१ चमचा हळद
२ चमचे मसाला किंवा १ चमचा लाल तिखट
१ चमचा गरम मसाला
२ मोठे चमचे तेल
थोडीशी कोथिंबीर चिरून
चवीनुसार मिठ

क्रमवार पाककृती: 

प्रथम कलेजी कापून स्वच्छ धुवून घ्यावी. त्याला आल-लसुण पेस्ट आणि लिंबाचा रस लावून ठेवावा. भांड्यात तेल गरम करून त्यावर लसूण पाकळ्यांची फोडणी देऊन कांदा बदामी रंग येईपर्यंत तळावा. त्यात हिंग, हळद, मसाला घालून कलेजी परतवावी. आता भांड्यावर झाकण ठेवून त्यावर पाणी ठेऊन वाफेवर मिडीयम गॅसवर कलेजी शिजू द्यावी. मधून मधून परतावी. शिजल्यावर मिठ व गरम मसाला व कोथिंबीर घालून पुन्हा एक वाफ येऊ द्यावी व परतवून गॅस बंद करावा. झाली कलेजी तय्यार.

वाढणी/प्रमाण: 
४ जणांसाठी
अधिक टिपा: 

रश्यामधल्या कलेजी पेक्षा अशी कलेजी जास्त रुचकर लागते. कलेजी फ्राय ही अधीक रुचकर लागते.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भ्रमर चिकनची कलेजी तशी सॉफ्ट असते. पण जास्तच सॉफ्ट हवी असेल तर शिजताना पाणी घालायचे. कुकर मध्ये शिजवायची असेल तर जास्त नको ठेऊ. कारण कलेजी लवकर शिजते. आणि फ्राय करणार असशील तर डायरेक्ट फ्राय केलेली जास्त चविष्ट लागेल. हवे तर वरून झाकण ठेव फ्राय करताना.

प्रिया, गुलबकावली धन्यवाद.

डीजे. कलेजीला हळद, हिंग, मिठ, मसाला थोडा लिंबाचा रस, आल- लसूण पेस्ट लावून घ्यायच. मग तवा चांगला तापवून त्यावर तुकड्या फ्राय करतो त्याप्रमाणे कलेजी तळायची. पण ही तळ्ताना थोडी सावधानता पण बाळगायची. कारण मध्येच फट फट होऊन थोड तेल उडत.

त्यावर तुकड्या फ्राय करतो त्याप्रमाणे
<<
१. तुकड्या म्हंजे इथे जागूतैंच्या भाषेत माश्याच्या तुकड्या.

२. लिव्हरमधे काही लिगामेंट्स असतात, अर्थात चावायला कठीण असे धाग्यासारखे भाग. ते काढून टाकता आले तर चांगले.

३. कलेजी खाणे सबके बस की बात नही होती. खास करून गावराणी, उर्फ फ्री रेंज. चव उग्र असते

४. लिव्हरमधे न्युट्रिएंट्स स्टोअर होतात, तशीच टॉक्सिन्सही. त्यामुळेच फ्रीरेंज अ‍ॅडल्ट प्राण्याची कलेजी टाळावी. पाळीव, पोल्ट्री/गोटफार्मवाल्या प्राण्याचं लिव्हर मात्र नक्कीच हाणावं.

डीजे. कलेजीला हळद, हिंग, मिठ, मसाला थोडा लिंबाचा रस, आल- लसूण पेस्ट लावून घ्यायच. मग तवा चांगला तापवून त्यावर तुकड्या फ्राय करतो त्याप्रमाणे कलेजी तळायची. पण ही तळ्ताना थोडी सावधानता पण बाळगायची. कारण मध्येच फट फट होऊन थोड तेल उडत.>> वॉव.. सोपी दिसते.. उद्याच करुन बघणार. थँक यु जागुकाकी Bw

जागू काकी झाल आता जागूजी Lol नुसत जागू चालेल >> Proud

असु द्या हो... मला तेवढीच आठवण येते माझ्या काकीची.. तिच्या हातच्या एकसे बढकर एक चवदार भाज्यांनी मन त्रुप्त झालं आणि तिच्यामुळेच मी स्वयपाक घरात प्रयोगावर प्रयोग करुन बर्‍यापैकी पारंगत झालो.

तुमच्या माशांच्या आणि इतर नॉन्व्हेज डिशेसच्या रेसिपीजमुळे माझ्या स्वयपाकाला चार चांद लागले.. म्हणुन मला तुम्हालापण काकीच म्हणावसं वाटलं.. ते काकी 'आतुन' आलं..! Bw

फेरफटका नाही ओ. पण मी स्वतःहुन कस सांगणार मला मोठी करा आणि ताई म्हणा. Lol

ते काकी 'आतुन' आलं..
मनापासून धन्यवाद.

ब्लॅककॅट - बटाट्याच्या काचर्‍या जशा तशा कलेजीच्या समजा .

Pages