कथा २

Submitted by Abhishek Sawant on 8 December, 2015 - 13:35

कथा २
Trip चे फिक्स झाल्यानंतर तिघांनाही खूप एक्साईटमेंट वाटत होती कारण बय्राच दिवसानंतर त्यांची कोणतीतरी trip प्लॅन झाली होती .सगळे प्लॅनिंग झाल्यानंतर तिघेही बाहेर त्यांच्या नेहमीच्या अड्ड्यावर चहा पिण्यासाठी गेले. आज अमोलपण भलताच खुश दिसत होता त्याला बेटिंग मध्ये खूप फायदा झाला होता म्हणून आजचे सिगारेट आणि चहाचे बिल त्यानेच दिले. फक्कड असा गरम वाफाळलेला चहा आणि सोबत सिगारेट असे समीकरण जुळून आल्याने आकाश आणि अमोलला पण मस्त वाटत होते. चहा पिऊन झाल्यानंतर हे त्रिकुट जयची बाईक घेउन मेकॅनिक कडे गेले, लांबचा प्रवास असल्याने गाडीची काही किरकोळ कामे होती ती करुन घेणे आवश्यक होते., गाडी condition मध्ये आहे याची खात्री करुन ते होस्टेलला परतले आणि ऊद्या सकाळी शार्प ७ ला येण्याचे मान्य करुन आकाश त्याच्या रुमला गेला.
दुसर्‍या दिवशी ठरल्याप्रमाणे आकाश आणि जय तयार झाले पण नेहमीप्रमाणे अमोल अजून तयार झाला नव्हता, दोघांनीही अमोलला शिव्यांची लाखोली वाहिली त्यांच्या शिव्या आणि बोलणे ऐकतच अमोल पण तयार झाला. त्यांनी मोजकेच कपडे सोबत घेतले होते. पुन्हा एकदा जयने सगळ्या वस्तू चेक केल्या. गाडीचे डॉकुमेंट्स, सगळ्यांचे लायसन्स, सन ग्लासेस. कॅप, मोबाईलचे हेडफोन, चार्जर वैगेरे वैगेरे. थंडी होती म्हणून जकेट्स सुद्धा त्यांनी बरोबर घेतले होते. हे सगळे जय पुन्हा पुन्हा चेक करत होता शेवटी अमोल ने वैतागुन “ चल बे साल्या तिथे तुला काय पोरगी बघायला चाललो नाही “ असे म्हणाल्या नंतर जय सरळ बॅग घेऊन खाली आला. सकाळी ७ वाजता अंघोळ करुन तयार होण्याची त्यांची कित्येक दिवसातून ही पहिलीच वेळ होती नाहीतर ते सरळ दुपारी १ –२ ला वैगेरे ऊठुन जेवायलाच खाली यायचे.
हॉस्टेल मधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी सरळ आपला मोर्चा चहाच्या त्यांच्या दररोजच्या ठिकणाकडे वळवला चहा सिगारेट झाल्यानंतर स्वारी बदामीकडे निघाली. विजापूर मधून बाहेर पडेपर्यंत अमोल गाडी चलवणार असे ठरलेले कारण कोणत्या ठिकाणी ट्रॅफीक पोलिस असतो हे अमोलला पक्क माहिती होतं. सगळ्यात शेवटला जय बसला होता म्हणजे पोलिस दिसला की त्याला लगेच उतरता येईल थोड पुढे चालत जाऊन तो परत गाडीवर बसायचा. असे त्यांना फकत २-३ वेळेला करायला लागले. सिटी मधुन बाहेर पड्ल्यानंतर काही भिती नव्हती.
शहरातुन बाहेर पडताना एक भली मोठी कमान होती , ती कमान पास झाल्यानंतर जय ने गाडी चालवायला घेतली सकाळची वेळ असल्याने फारसी वर्दळ नव्हती, जयने गाडीला वेग़ दिला. तिघानिही कानात हेड्फोन घातले आणि त्यांचा थ्रिलींग प्रवास चालू झाला.
हायवे ला लागून त्यांना आता तासभर झाला होता तिघेही बसून बसून कंटाळले होते एका हॉटेलवर थांबून त्यांनी नाश्टा केला. थोडे पाय मोकळे झाल्यानंतर त्याना बरे वाटू लागले. तिथल्याच एका पान टपरीतुन अमोलने मावा घेतला आणि तोंडात टाकून त्याने गाडी स्टार्ट केली, रस्तावर आता रहदारी वाढली होती तरिही अमोल ८० ते ९० च्या स्पीडने चालवत होता त्यातच आकाशने “ अरे पुढ्च्या स्कोर्पीओ मध्ये माल बसलाय “असा शेरा करुन त्याच्यातल्या जॉन अब्राहमला जागे केले होते, जय आपला जीव मुठीत धरुन मागे बसला होता. मध्येच थांबुन कुठे रस्त्यावर बसून हिरो स्टाईल मध्ये फोटो काढ, कुठे चालत्या बाईक वर सेल्फी काढ फेसबुक वर अपडेट कर असे करत असताना त्यांना वेळेचे भान कोणालाच नव्हते. जयला तर हे एक स्वप्नासारखे वाटत तो विचार करु लागला जग किती भारी आहे, आपले आयुष्य किती सुंदर आहे, त्याला तर “मंझील से बेहतर लगने लगे है ये रास्तें” हे गाणं आणि त्याचा अर्थ खुपच खरा वाटायला लागला. त्याच्यासाठी प्रवास म्हणजे नवसंजीवनी होती. ते तिघेही दिल चाहता है चित्रपटाच्या नायकांप्रमाणे त्यांचा प्रवास आणि मैत्री ऐंजॉय करु लागले होते.
कोलार या सुमारे ४ ते ५ किमी लांब असलेल्या पुलावर आल्यानंतर त्यानी गाडी थांबवली, अलमट्टी धरणाच्या बॅक वॉटर वर बांधलेला हा पुल याची भव्यता बघुन तिघेही भांबावुन गेले. अलमट्टी धारणाने नदिचे पाणी अडवल्यामुळे नदिला समुद्रासारखे रुप प्राप्त झाले होते. पुलावर थोडे थांबुन ते पूढ्च्या रस्त्याला लागले. कसेबसे ते दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत अर्धा पल्ला गाठलेले होते. अमोल ने एक पंजाबी धाबा बघून गाडी थांबवली. तिघेही आत जाऊन हात पाय धुवुन फ्रेश झाले आणि त्यांनी पराठा आणि काजू मसाला अशी ऑर्डर दिली, जेवणावर यथेच्छ ताव मारून झाला तसे ते परत निघाले.
सुमारे ५.३० ते ६ च्या दरम्यान ते बदामी मध्ये पोहोचले तिथेच एका हॉटेल मध्ये चहा नाश्टा वैगेरे झाल्यानंतर ते बदामी मधील पौराणिक केव्ह्स बघन्यासाठी गेले, बदामी शहर तसे मोठे नव्हते पण पर्यटना मुळे तिथे फारस्या सुविधा ऊपलब्द होत्या. तिथल्या गुहा बघुन आल्यानंतर तिघानिही एक स्वस्त लॉज शोधला आणि एक रुम भाड्याने घेतली. लॉज तसा जूनाच होता, रंग उडालेली दोन मजली लॉजची वास्तू शहरापासून थोडीशी लांब असल्याने भूतबंगला टाईप दिसत होती. लॉजच्या बहुतेक खोल्यांमध्ये कोणी रहातच नव्हते, हे तिघे आणि लॉज मध्ये काम करणारी माणसे पकडून १० ते १२जन त्या लॉजमध्ये होते बाजुलाच एक छोटेखानि हॉटेल होते. हा लॉज अमोलने शोधला होता त्याला शहराच्या गोंगाटापासुन दुर रहायचे होते आणि इथे पैसे खुपच कमी जाणार होते म्हणून त्याने हा लॉज निवडला आकाश अश्या लॉजवर रहायला लागल्याने नाराज होता जयला तर कोठेपण राहिले तरी चालले असते...
क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users