कलेजी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 2 December, 2015 - 02:40
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पाव किलो कलेजी
२ मोठे कांदे चिरून
४-५ लसुण पाकळ्या ठेचून
२ चमचे आल-लसुण पेस्ट
अर्धा लिंबाचा रस (नसला तरी चालेल)
पाव चमचा हिंग
१ चमचा हळद
२ चमचे मसाला किंवा १ चमचा लाल तिखट
१ चमचा गरम मसाला
२ मोठे चमचे तेल
थोडीशी कोथिंबीर चिरून
चवीनुसार मिठ

क्रमवार पाककृती: 

प्रथम कलेजी कापून स्वच्छ धुवून घ्यावी. त्याला आल-लसुण पेस्ट आणि लिंबाचा रस लावून ठेवावा. भांड्यात तेल गरम करून त्यावर लसूण पाकळ्यांची फोडणी देऊन कांदा बदामी रंग येईपर्यंत तळावा. त्यात हिंग, हळद, मसाला घालून कलेजी परतवावी. आता भांड्यावर झाकण ठेवून त्यावर पाणी ठेऊन वाफेवर मिडीयम गॅसवर कलेजी शिजू द्यावी. मधून मधून परतावी. शिजल्यावर मिठ व गरम मसाला व कोथिंबीर घालून पुन्हा एक वाफ येऊ द्यावी व परतवून गॅस बंद करावा. झाली कलेजी तय्यार.

वाढणी/प्रमाण: 
४ जणांसाठी
अधिक टिपा: 

रश्यामधल्या कलेजी पेक्षा अशी कलेजी जास्त रुचकर लागते. कलेजी फ्राय ही अधीक रुचकर लागते.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती यम्म्म्मीईईई Happy अहहाहाहा...
मस्तच.. हिरव्या वाटणाची पन छान लागते कलेजी.

कलेजीची चव उग्र वाटते त्यामुळे विशेष आवडत नाही. रश्श्यातलीच खाऊन पाहिलीय.
पण ही वरची डिश फारच तोंपासु दिसतेय Happy

मस्त रेसिपी.. अगदी अहाहा! Happy

चुलीत भाजलेली तर जास्तच. >> साती, काय आठवण काढलीस गं. ती चव कधीच विसरली जाणार नाही. Happy

काय हे जागु? इतक्या दिवसांनी पाकृ टाकलीस? Sad
असो, पण कलेजी म्हणजे नक्की कुणाची? कोंबडीची असते का? Uhoh (एभाप्र) का बकरीची?
ओरिगिनल कलेजी चा फोटो का नाही टाकलास?

पाकृ सुंदर आहे, फायनल डिश पण छान दिसते आहे.
पण हा प्रकार बकरीचा असेल तर मी कधी खाईन असे वाटत नाही.

माश्याला कलेजी असते काय? Proud

नेमके आधी वाचणार्‍यात आम्ही शाकाहारीच फर्स्ट असतो >>> +१ Proud

नेहमी पडणारा प्रश्न...
कलेजा - हृदय (ती पाहताच बाला कलेजा खलास झाला)
कलेजी - यकृत
बरोबर???

आम्च्या घरी कांदालसूण न वापरता (पूर्वी देवीच्या नैवेद्यासाठी करायचे त्या रेसिपीने) आलं, वाटलेले जिरे आणि मिरपूड इ. घालून कलेजी करतात. तपशील विचारून इथे टाकेन. पण इथेही खूप कमी जणांना ती पाकृ माहित आहे. खाणार्‍यांच्या मते अत्यंत चविष्ट लागते.

माझ्या नॉनव्हेज रेसिपीजच्या वाचकांतील सर्व शाकाहारी मायबोलीकरांचे आधी धन्यवाद. Happy

ममो, अनिरुद्ध, रश्मी, निधी, आशुतोष, जाई, अवनी धन्यवाद.

अंकु, वरदा नक्की द्या तुमच्या रेसिपीज इथे.

साती चुलीत भाजलेल्याची आठवण येऊन तोपासु झाले. ती पण खुप चविष्ट लाग्ते.

अगो लिंबु पिळल्याने उग्र वास जातो. आणि त्याहून नुसती फ्राय केली तर नाही वास येत.

दक्षे आम्ही कलेजी बोकडाची आणि कोंबडीची आणतो. बोकडाची जरा हेवी असते पण कोंबडीची हलकी असते असे माझे मत हा.

बाकी औषधासाठी घुशीची काळजी खातात हे मी ऐकुन आहे. Lol

माशाला पण कलेजी असते. मोठ्या माशांची दिसून येते. काही जण खातातही. मी अजुन खाल्ली नाही.

अश्वे तुझ्या प्रश्नाच्या बाबत मी पण साशंक आहे. पण हे ऋदयच असावे यकृत चिवट असते बहुदा.

असो, पण कलेजी म्हणजे नक्की कुणाची? कोंबडीची असते का? अ ओ, आता काय करायचं (एभाप्र) का बकरीची?
ओरिगिनल कलेजी चा फोटो का नाही टाकलास?

पाकृ सुंदर आहे, फायनल डिश पण छान दिसते आहे.
पण हा प्रकार बकरीचा असेल तर मी कधी खाईन असे वाटत नाही.

माश्याला कलेजी असते काय? फिदीफिदी
>>>>>

कलेजी म्हणजे हृदय. त्या अर्थाने ती सगळ्यांचीच असते! अगदी माश्यालासुद्धा! Happy तळलेली बांगड्याची कलेजी माझी फेवरीट! पण बाकी माश्यांच्या कालेजीला काही तितकी चव नसते आणि आम्ही छोट्या आकाराचे मासेच सहसा आणतो त्यामुळे भानगडीत पडत नाही.

वरील पाककृतीमध्ये कोंबडीची वापरली आहे. कोंबडीची कलेजी जरा पिठूळ असते. बकर्याची जरा चिवट असते. दोन्हीला फ्राय स्वरूपातच जास्त चव लागते. आम्ही घरी कोंबडीचीच आणतो.

ओरीजनल कलेजीचा फोटो मुद्दाम नाही टाकला. कारण मागच्या अनुभवावरून बर्‍याच जणांना कापाकापी केलेले फोटो पहाताना त्रास होतो.

वाव.... छान खूपच छान.. तोंडाला पानी सुटले.
जागू आम्ही कलेजी आणि फुफ्फुस मिक्स करून ही डिश हिरव्या वाटनात करतो.
(हिरवी मिर्ची, कोथींबीर, लिंबू आणि पुदीना ).
कधी केली तर फोटो टाकेन. तुझे बरोबर आहे की ओरीजनल कलेजीचा फोटो टाकला असता तर इथे खुप जणांना पहाताना त्रास झाला असता.
तू पोस्ट केलेल्या रेसेपी खुपच छान असतात.

माशाला पण कलेजी असते.
<<
हो.

कॉड लिव्हर ऑइल/ शार्क लिव्हर ऑइल फेमस आहे, "अ" जीवनसत्वाचा स्रोत म्हणून.

*

कलेजी म्हणजे लिव्हर हे बरोबर आहे.

कविकल्पनेत कलिजा खलास = दिल दिया म्हणून कलेजी/कलिजा = हृदय हे बरोबर नाही. त्या कल्पनेतही कलिजा = लिव्हरच. फारावर्षांपूर्वी लिव्हरमधे 'मन' असते, अशी समजूत होती, ती बदलून ते हृदयात असते अशी झाली, व शेवटी मेंदू हे मनाचे स्थान झाले.

*

कलेजी/लिव्हर खाण्याबद्दल :

नळी, पायासारखीच, लिव्हर ही डेलिकसी आहे. खास मनापासून नॉनव्हेज खाणारे लिव्हर आधी उडवतात. नवशिक्या नॉनव्हेज खाणार्‍यांनी (एक हाफ बटरचिकन लेगपीस वगैरे Wink ) यापासून दूर रहावे, कारण चव व वास उग्र असते.

(ता.क. हुश्शार दारू पिणारे चखन्याला कलेजीफ्राय खातात, व्हिच इज इक्विव्हॅलंट टू लिव्ह५२. अनेक लिव्हर टॉनिक गोळ्यांत प्राणीज लिव्हरची पावडर वगैरे असते. -दारू पीने से लिवर खराब होताय - बच्चन Wink : रिप्येर इट विथ कलेजी फ्राय. )

लिव्हरमधे अनेक न्यूट्रिएंट्स, व्हिटॅमिन्स इ. स्टोअर्ड असतात, त्यामुळे लिव्हर खाणे फायदेशीर असते, यामुळेच लिव्हर खाणे नॉनव्हेजपटूंना आवडते.

फ्वॉ-ग्रा (Foie gras) नामक अत्यंत महागडा खाद्यपदार्थ हे गूज पक्ष्याचे लिव्हर्/कलेजीच असते, फक्त ते "आजारी" लिव्हर असते, Wink "फॅटी लिव्हर". सुमारे ५०$ प्रति पौंड अशी याची रॉ किंमत आहे, भारतात इंपोर्ट करणे ब्यान आहे.

जसे लिव्हर खाणे मजेचे व उत्तम, त्याचप्रमाणे, लिव्हरमधे अनेकदा धोकादायक केमिकल्सही जमा असू शकतात. प्रदुषीत पाण्यातील माशांचे लिव्हर त्यामुळेच खाऊ नये. पोल्ट्रीफार्म्ड कोंबड्या, गोटफार्म्ड मटन लिव्हर सेफ म्हणता येईल. फ्रीरेंज असेल, तर प्राण्याच्या डाएट व वयावर घातक पदार्थांचे प्रमाण ठरते.

नुसतीच कलेजी फ्राय कधी खाल्ली नाहीये कारण नुसती कलेजी कधी घरी आणली जात नाही. पण चिकनच्या रश्यातली किंवा चिकन फ्राय मधली कलेजी खायला खूप आवडते.
ही रेसेपी नक्की करून बघणार.

Pages