ऊठ बाई तु जागी हो,...

Submitted by vishal maske on 28 November, 2015 - 23:20

~!!! उठ बाई तु जागी हो,... !!!~

का वैचारिक प्रगतीची
अजुनही दिरंगाई आहेस
समाजही सांगतो आहे
की बाई तु बाई आहेस

बाईला समानता देणं
गलिच्छ मानलं जातंय
तुझं बाई पण आजही
का तुच्छ मानलं जातंय

का बाईकडे पाहताना
समाज झालाय आंधळा
बाईविना खरं तर हा
समाज होईल पांगळा

आजही नाकारलं जातं
बाई तुझ्या स्वातंत्र्याला
आजही बंदी आहे तुझ्या
त्या मंदीरातील प्रवेशाला

घरा-घरात बसली आहेस
थोडसं बाहेर येऊन बघ
प्रश्न आहे तुझ्या हक्काचा
सावित्रीची लेक होऊन जग

बाई तु समानतेचा लढा दे
पुरोगामित्वात सहभागी हो
दुसर्‍यांची वाट पाहूच नको
आता ऊठ बाई तु जागी हो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

* कविता आवडल्यास नाव न काढता शेअर करण्यास परवानगी.

* व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक मिनीट,
मुक्तस्त्रोत शब्दखुणांत ?
मुक्तस्त्रोत म्हणजे नक्की काय आहे असे तुम्हाला वाटते?
त्याचा कवितेशी काहीही संबंध नाही.

उगाच आमचे नाव खराब करु नका. मुक्तस्त्रोत शब्दखुणांमधुन काढुन टाका.

मुक्तस्त्रोत शब्दाच्या चुकीच्या वापराचा निषेध.

प्रिय विशाल,

आपणास प्रेमळ सल्ला,
स्वतःचे अज्ञान जे आपण आधीच सार्वजनीक केले आहेत, ते शब्दखुणांमधे जाउन ताबडतोब सुधारावेत...

स्पॉक
माझं घोर अज्ञान दूर करावं ही नम्र विनंती.
कृपा करून मुक्तस्त्रोत म्हणजे काय ते समजावून सांगाल का ?

स्पॉक तुम्हीच दिलेली लिंक ओपन करून वाचुन समजुन घ्या,
तुम्हाला समजत नसेल तर दुसर्‍या कोणाला दाखवा,

नक्कीच समजुन सांगतील

धन्यवाद माहीतीबद्दल.

डालो करताना अनेकदा ओपन सोर्स सॉफ्टवेअर अशी संज्ञा पहायला मिळते.

मुक्तस्त्रोत शब्दामुळे कथा, कविता, चारोळी , मुक्तछंद इ. इ. यात कुठेही न बसणारं मुक्तक असावं असा समज होतो चटकन. मुक्तस्त्रोत हे ओपन सोर्सचंच भाषांतर आहे हे लक्षात यायला संगणक क्षेत्राशी संबंधित नसलेल्यां साठी जरा कठीण आहे.

कवीने का वापरलंय त्याबद्दल नो कमेण्ट्स !

विशाल मीच दिलेली लिंक ओपन करून वाचुन समजुन घ्या,
तुम्हाला समजत नसेल तर दुसर्‍या कोणाला दाखवा,

संगणक प्रणालीसाठी आणि हार्डवेअर साठी मुक्तस्त्रोत आहे.

कथा, कविता, चित्र, आयकॉन्स, लेख ईं. साठी क्रियेटिव्ह कॉमन्स आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Creative_Commons_license

दोन वेगळ्या गोष्टी आहेत. दोन्हींत खुप फरक आहे.
नीट विचारले तर कोणीही नक्कीच समजावुन सांगतील.

जेव्हा केव्हा एकादी रचना ओपन सोर्स डीक्लेअर केली जाते, तेव्हा ती कुणीही वापरू शकतो, मॉडिफाय करू शकतो अशी ब्लँकेट परमिशन दिलेली असते.
कविला आपली कविता प्रताधिकारमुक्त ठेवायची आहे, इतकाच सिंपल अर्थ त्यातून निघतो आहे.
मुक्तछंद ऐवजी मुक्तस्रोत शब्द वापरलाय अशी समजूत करून इथे पिंगा घालणार्‍यांना वादिहाशु.

धागाकर्त्याने चुकून मुक्तस्त्रोत हा शब्द - मुक्तछंदला पर्याय म्हणुन वापरलेला नाही,
हे त्याच्या सर्व प्रतिक्रियांवरुन कळून येत आहे.

"रचने"चे अनेक प्रकार आहेत. त्यातील सॉफ्ट्ट्वेअर आणि हार्डॅवेअर साठी ओपन सोर्स परवाने आहेत. त्यात "प्रोग्रामींग सोर्स कोड" संदर्भाने स्पष्ट उल्लेख आहेत.

इतर रचना जसे की कवीता ई. साठी क्रियेटिव कॉमन्स आहे. त्यात या दुस-या पद्धचीत्या रचने संदर्भाने अटी आहेत.

मुक्तस्त्रोत हा शब्द मराठीत प्रचलित असल्यास प्रश्नच नाही. पारिभाषिक संज्ञा या वापरूनच रूढ होतात असं मिलिंद भांडारकर म्हणतात.

बाई तु समानतेचा लढा दे
पुरोगामित्वात सहभागी हो
दुसर्‍यांची वाट पाहूच नको
आता ऊठ बाई तु जागी हो-----

ह्या ओळी आवडल्या पण तसे होणे हे शक्य वाटत नाही.खुद्द इंदिरा गांधि ह्या धर्मसत्तेपुढे झुकल्याचे उदाहरण आहे.धर्मसत्तेने दिलेले दुय्यमत्व झुगारणे हाच पर्याय आहे .परंतु लढा देण्यापेक्षा आहे तीच व्यवस्था स्विकारणे हे दुर्दैवाने होत आहे.