अष्टविनायक दर्शन : श्री विघ्नहर

Submitted by पल्ली on 31 August, 2009 - 01:30

ozar_0.jpgश्री विघ्नहर- ओझर, जि. पुणे.

मार्ग- पुणे-नारायणगाव रस्ता. जुन्नर रस्त्यावर ओझरचा फाटा, तिथून ८ कि.मी. कुकडी नदीच्या काठी.

यात्रा- भाद्रपद शु. चतुर्थी व माघ शु. चतुर्थी.

मूर्ती- पूर्वाभिमुख. गाभार्‍यासमोर ओळीने ३ सभामंडप. गाभार्‍यात चारी बाजूंना कोनाड्यात पंचायतनातल्या इतर चार मूर्ती. दीपमाला सुबद्ध, सुंदर.

इतिहास- हे मंदिर १८व्या शतकाच्या अखेरीस बांधले गेले असे म्हणतात. चिमाजी आप्पाने वसई जिंकल्यावर मंदिरावर सोन्याचा कळस चढवला. थोड्याच वर्षांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. श्रीमंत बाजीराव पेशवे या विघ्नहराचे अनन्य भक्त होते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users