Submitted by वैवकु रीटर्न्स on 27 October, 2015 - 09:11
अशी जादूगरी होणार आहे का
व्यथेची बासरी होणार आहे का
दिव्याचे 'ध्यान' आनंदात का आहे
दिवाळी साजरी होणार आहे का
अशी का रात्रभर ही गस्त डोळ्यांची
स्मृतींची तस्करी होणार आहे का
कुण्या शहरामधे दंगल सुरू आहे
तसे माझ्या घरी होणार आहे का
जगाची गाय मारू पाहते आहे
मनाची दादरी होणार आहे का
मला आयुष्यही उरकायचे आहे
तुझे आतातरी होणार आहे का
पुरे झाले उखाणे विठ्ठलावरचे
तुझ्याने शायरी होणार आहे का
~नएकु
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पहिले तीनही शेर जबरदस्त...खूप
पहिले तीनही शेर जबरदस्त...खूप आवडले!
_/\_
_/\_
वा तस्करी छान छान
वा
तस्करी छान छान
पुरे झाले उखाणे
पुरे झाले उखाणे विठ्ठलावरचे
तुझ्याने शायरी होणार आहे का ........
........ रुक्मीणीशी पंगा घेणार आहे का ?
अशी का रात्रभर ही गस्त
अशी का रात्रभर ही गस्त डोळ्यांची
स्मृतींची तस्करी होणार आहे का
क्या बात !!!
इतरही शेर आवडले