नमन तुजसी श्री गौरीसुता - श्री. रघुनंदन पणशीकर

Submitted by संयोजक on 29 August, 2009 - 02:56

गीत/संगीत: उपासक (मनोज ताम्हनकर)
स्वर: श्री. रघुनंदन पणशीकर


सौजन्यः मनोज ताम्हनकर (उपासक)
अधिक माहिती साठी जय हेरंब पहा.
ही ध्वनीफीत मायबोली खरेदी विभागात उपलब्ध आहे.

विशेष सूचना:
"जय हेरंब" या मालिकेत एकूण नऊ गाणी असून तुम्हाला मायबोली गणेशोत्सवात रोज एक अशी सर्व गाणी ऐकायला मिळतील. प्रत्येक गाणं वेगळ्या रागात आणि तालात बांधलेलं आहे. तुम्हाला सर्व गाण्यांचा ताल आणि राग ओळखून संयोजकांना ईमेल करून कळवायचा आहे. सर्व अचूक उत्तरे देणा-यातील एका भाग्यवान स्पर्धकास उपासक एक ध्वनीफीत बक्षीस देणार आहेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हॅट्स ऑफ, मनोज. इतक्या वेगळ्या तालात गाणं बांधलत. हिंमत आहे... मनापासून दाद देते. प्रचलित ताल्-राग ह्यांना वळसा घालून वेगळी वाट चालणं सोप्पं नाही. लोकांना आवडतं तेच देण्यातच गुंतलेले आजचे संगीतकार, लोकांचा कान काही वेगळ्या अनुभुतीसाठी तयार करीतच नाहीत... ही माझी तक्रार आज मागे घेते.... आनंदाने मागे घेतेय.
पुन्हा एकदा, इतक्या समर्थं गायक्/गायिकांना घेऊन काढलेली ही सिडी नुस्ती संग्रही ठेवण्याची गोष्टं नाही... इतरांना ऐकवण्यासारखी, भेट देण्यासारखी चीज आहे. अभिनंदन.

मनापासून धन्यवाद दाद!
मा बो वर असे दर्दी, जाणकार श्रोते लाभले याचा अतिशय आनंद होतोय मला.

आशा करतो की लोकांना हे फारसं वेगळं वाटू नये. म्हणजे काहीतरी वेगळं असं वाटलं तरी हरकत नाही. पण तरीही आवडावं! म्हणजे लोकांना आवडेल असंच काम मलाही कराचंय. पण प्रयत्न असा आहे की वेगळं असलं तरी ते आवडावं... ताल कुठलाही का असेना!

प्रयत्न आहे की शब्दांचा रचनेतून हा ताल सहज (natural) वाटला पाहिजे. गायक श्री. रघुनंदन पणशीकर, सं संयोजक अजय यांच्याकडून मला तशी दाद मिळाली होती. आशा आहे की आवडेल रसिकांना!

अतिशय सुंदर रचना. परत परत ऐकते आहे. इतकी सुरेख रचना तितक्याच समर्थ गायकाने गायली त्यामुळे खरंच चीज झालं असं मनापासून वाटलं Happy