गोड मठरी

Submitted by सुलेखा on 9 November, 2015 - 06:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मठरी हा पदार्थ उत्तर भारतातला .मठरी खारी व गोड दोन्ही प्रकारे करतात.
खारी मठरी करताना रवा व मैदा सम प्रमाणात किंवा फक्त मैदा घेवुन त्यात मीठ,ओवा,तीळ्,भरडलेले काळे मिरे,गरम तेलाचे मोहन घालुन लागेल तसे पाणी घालुन पिठ भिजवतात. ह्या पिठाच्या लहान लहान मठरी लाटुन तेलात तळतात.
गोड मठरी साठीचे साहित्य :-
४वाटी मैदा व १ वाटी बारीक रवा.
[ह्याचे प्रमाण ४:१ आहे.म्हणजे ४ वाटी मैदा तर १ वाटी बारीक रवा.किंवा १ वाटी मैदा तर १/४ वाटी बारीक रवा घ्यावा.]
मोहना साठी तूप .[१ वाटी मैदा असेल तर १ टेबलस्पून घट्ट तूप घ्या.]
चिमुटभर मीठ
१/४ वाटी पाणी
१ वाटी साखर
३ टेबल स्पून तीळ
मठरी तळण्यासाठी तेल.

क्रमवार पाककृती: 

एका पातेलीत साखर व पाणी घालुन गॅसवर ठेवा.चमच्याने साखर पाणी ढवळत रहा. पाणी गरम झाले कि गॅस बंद करुन त्यात तूप घाला व साखर विरघळेपर्यंत चमच्याने ढवळा.
मैदा,रवा,मीठ व १ चमचा तीळ एकत्र करा.
साखर.पाणी ,तूपाच्या कोंबट मिश्रणात हे पिठ पुरीसारखे घट्ट भिजवा.
१५ मिनिटे हे पिठ मुरू द्या.
पिठाचे चार भाग करा.व एक मोठी जाड पोळी लाटा.
लहान वाटीच्या सहाय्याने लहान लहान मठरी चा गोलाकार कापा.
या प्रत्येक गोल मठरीवर चुटकीभर तीळ पसरवा .त्यावर वाटीच्या तळाने दाबा.म्हणजे मठरीवर तीळ चिकटतील.
आता सुरी/काट्याने प्रत्येक मठरी वर ४-५ वेळा खोचुन घ्या.म्हणजे तळताना मठरी फुगणार नाही.
कढईत तेल तापायला ठेवा.तेलसाधारण तापले कि गॅस कमीकरुन मंद आचेवर किंचित गुलाबी रंग येईपर्यंत मठरी तळा.
तळलेल्या मठरी तील तेल झार्‍याने छान निथळुन घ्या.व टिशु पेपर वर सर्व तळलेल्या मठरी पसरुन ठेवा.
मठरी थंड झाल्या कि डब्यात भरुन ठेवा.
टिपः- या प्रमाणात बेताच्या गोड मठरी तयार होतात. साखरेचे प्रमाण आवडीनुसार कमी - जास्त घ्यावे.
ह्या मठरी खुसखुशीत होतात.बिस्किटां सारखी चव असते.
मैदा जितका घेऊ त्या प्रमाणा नुसार रवा,मोहनाचे तूप व साखर घ्यावी.
पाणी प्रमाणानुसार घ्या . पण साखरेत पाणी घालताना त्यातील फक्त अर्धा भाग पाणी घाला .पिठ भिजवताना लागले तर हे उरलेले पाणी लागेल तसे वापरा.

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

OK tai Happy

गोड मठरी असते हे माहिती नव्ह्तं. खारी आणि मेथी घातलेली खाल्ली आहे. गोड मठरी शंकरपाळ्यांसारखी लागते का?

तुम्ही आजकाल फार अनियमीत झालात हां Happy

गोड मठरया केल्या. छान झाल्या चविला. पीठ भिजवताना थोड़ी गड़बड़ झाली. १ कप मैदा आणि पाव् कप रव्याला पाँव वाटी पाणी +१ वाटी साखर खुप जास्त झाले. खिरिसारखे दिसायला लागले. मग अजुन १ वाटी मैदा घालून पीठ भिजवले. गरम पाण्यात भिजवुन घेतल्यामुळे नंतर खुप घट्ट झाले. टुकड़े करून फुप्रोमध्ये चमचाभर पाणी घालून फिरवुन थोड़े मऊ केले आणि लातून मठरया मन्दाग्निवर तळल्या. थंड झाल्यावर मस्त खुटखुटित लागताहेत.

चव् शंकरपालीसारखी आहे थोड़ी. ती थोड़ी खुसखुशीत होते, ही खुटखुटित आहे. आता ऑथेंटिक चव माहीत नाही, पण जे बनले ते आवड़ले खायला

मग अजुन १ वाटी मैदा घालून पीठ भिजवले >> इथे पाणी म्हणायचं का साधनातै?
मी क्न्फ्युज झालेय.. जास्तीच पाणी घालु शक्तो ना?

नाही. नाही. साखर आणि पाणि एकत्र करुन गरम केले की ते पाणि जरा जास्तच होते. त्यात १ कप मैदा घातल्यावर पातळ ख्रिरीसारखे झाले सगळे. मग त्यात थोडे थोडे पिठ घालुन घट्ट केले.

१ कप मैद्याच्या थोड्याशाच मठ-या करायच्या असतील तर साखरेत चमचाभर पाणी घालुन पातळ कर. पाव वाटी खुप होते.

इथे ४ वाटी मैदा व १वाटी रवा या प्रमाणानुसार बाकी साहित्य दिले आहे .. त्यानुसार योग्य बदल करुन वर लिहीत आहे.ह्या मठरी खुट्खुटीत व खुसखुशीत होतात. कडकण्या नसतात.