"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक ७

Submitted by संयोजक on 27 August, 2009 - 18:50

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------

"दिव्या दिव्या दीपत्कार"

झब्बू म्हणून कुठल्याही प्रकारच्या दिव्याचे छायाचित्र देऊ शकता. उदा : निरांजन, समई, पणती, टेबल लॅम्प, स्ट्रीट लॅम्प.

zabbu_jyot1.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्म्म्म आज देवाच्या पुजेनंतर फोटो काढले पाहीजेत दिव्यांचे.
श्वासच्या शूटच्या वेळेला वालावलचं लक्ष्मीनारायण मंदीर आहे ना तिथल्या दोन्ही दिपमाळी आम्ही दिव्यांनी सजवल्या होत्या. अक्षरशः दिपमाळेवर चढून पणत्या लावल्या होत्या मी. काय दिसत होतं ते. फोटो आहे त्याचा पण तो मी काढलेला नाही त्यामुळे टाकू शकत नाही.

कालच झकोबाच्या क्यामेर्‍यातुन काढलेला हा फोटो - माझा झब्बू Happy
DSC03431.JPG

(क्यामेरा वापरु दिल्याबद्दल झकोबाला धन्यवाद)
या विषयावर असन्ख्य फोटो माझ्याकडे आहेत, पण ते सगळे हार्डकॉपी या स्वरुपात, तेव्हा इथे भारम्भार झब्बू देणे मला शक्य नाही! Happy

DSC_0056.JPG

STA60056_bd.jpg

शाम-ए-ताज...

"कहानी रौशनी की कभी खत्म नहीं होती, अंधेरा कितना भी गहरा क्यों न हो!"

taj_sunsoft1.jpg

झब्बूमध्ये स्ट्रीट लँप्स असलेला फोटो चालेल की माहित नाही. तुका म्हणे त्यातल्या त्यात....:-)
धन्स!

>झब्बू म्हणून कुठल्याही प्रकारच्या दिव्याचे छायाचित्र देऊ शकता. उदा : निरांजन, समई, पणती, टेबल लॅम्प, स्ट्रीट लॅम्प.

Happy

Light 1

IMG_2034.jpg

लावले रत्नदीप नगरात- २००६ तोक्यो फॉल कलर्स.

मी काढलेला नाही, नव-यानी काढलाय, मी हमाली केली ट्रायपॉड वगैरे लावायची.
चालेल का ?

वरचे सर्व झब्बू लै भारी.

मग मी पण श्वास मधला दिपमाळीचा टाकते. कारण सगळे दिवे तर मीच लावले होते. क्लिकणारं कोणी नव्हतंच. फिल्लमच्या ३५ मिमि फिल्लममधून एक फ्रेम आहे निवडलेली.
shwaas-madhali-deepamaal.jpg

सही आहेत सगळ्यांचे दिवे!
नी, ती दीपमाळ प्रत्यक्ष काय सुरेख दिसत असेल, नाही?

हा माझा गेल्या वर्षीच्या दिवळीचा...DSC00655.JPG

सखीप्रिया, हो अगं आणि तरी हा थोडा उजेड असतानाचा आहे. पूर्ण अंधार पडला तोवर आमचं शूट संपलं होतं आणि आम्ही पणत्या काढत होतो तिथून पण तेव्हा सुद्धा असं मस्त दिसत होतं सगळं. आमच्याबरोबरचा स्टिल फोटोग्राफर होता तो इतका माठ होता आणि तो केवळ नटांचे फोटो तेही फिल्मशी काहीही संबंधित नसलेल्या पोजमधे काढायचा. (उदाहरणार्थ अमृताचा लाजताना फोटो काढला होता तिला पोज द्यायला लावून..) नंतर पब्लिसिटीच्या वेळेला त्यामुळे अ‍ॅक्च्युअल फिल्ममधून एकेक फ्रेम निवडून फोटो जमवले. Happy

अरे तुम्ही लोक ज्योतींचे फोटो इतके मस्त कसे काढू शकता? काय सेटिंग वापरता? मला जमत नाहीये.

मी हा फोटो सोनीचा कुठलातरी साधा पॉईंट अँड शूट कॅमेरा वापरून काढलाय. नक्की सेटिंग आठवत नाही... पण बहुधा फ्लॅश ऑफ करून ऑटो मोडमध्ये, खोलीत पूर्ण अंधार करून काढला होता. नाईट मोड मला फार झेपत नाही. तो कॅमेरा फार दिवस टिकला नाही, पण इतर साध्या कॅमेर्‍यांच्या तुलनेत त्याचे फोटो खूप शार्प यायचे. गेला बिचारा Sad

आहा!!

lights.JPG

Pages