सकारात्मक दृष्टिकोन

Submitted by नीलम बुचडे on 3 November, 2015 - 08:25

नमस्कार मायबोलीकर
सकारात्मक दृष्टिकोन व त्याचे परिणाम सिद्ध करणारा आणखी एक प्रयोग मी टीव्ही वर बघितला..
तो असा....
दोन माणसांना वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो द्यायला सांगितले. त्यापैकी एकाला एकदम
दुःखी चेहरा तर दुसऱ्याला आनंदी, हसरा चेहरा करायला सांगितले..
याच पोजमध्ये त्यांना २ मिनिटे स्थिर रहायला सांगितले.
फोटो काढल्यानंतर त्यांना ५० डॉलर्स बक्षीस दिले गेले. यानंतर त्यांना एक जुगाराचा खेळ खेळण्याची अॉफर देण्यात आली. त्यात जिंकल्यास १०० डॉलर मिळतील असे सांगण्यात आले.
त्यापैकी ज्याने आनंदी पोजमध्ये फोटो दिले त्याने पटकन होकार दिला व तो जिंकला सुद्धा..
तर ज्यांनी दुःखी पोजमध्ये फोटो दिलेला त्यांनी मात्र जुगार खेळायला नकार दिला.
म्हणजेच त्यांच्या मध्ये जिंकण्याचा आत्मविश्वास नव्हता..
आनंदी पोजमध्ये काहीवेळ राहिल्या मुळे आत्मविश्वास व सकारात्मक दृष्टिकोन यामध्ये वृद्धी होते.. हे सिद्ध झाले.
आनंदी राहण्यामुळे मेंदूत एक विशिष्ट संप्रेरक स्रवते.. ज्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो. आत्मविश्वास ही वाढतो.
आणखी एक ...

नकारात्मक दृष्टिकोन असण्याचा एक फायदा म्हणजे व्यक्ती एखादा वाईट परिणाम सहन करण्यासाठी मानसिकरित्या तयार असते...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या ओळखीत दोन्ही प्रकारचे लोक आहेत.
काही अत्यंत नकारात्मक, सगळ्यात काहीतरी चूक किंवा वाईट बघणार.
कधी कधी एखाद्या घटनेत चांगले, सकारात्मक काहीच दिसत नाही,
पण नकारात्मक वृत्तीचे लोक बडबड करून, कुणाला तरी नावे ठेवून आजूबाजूला असणार्‍यांचा मूड खराब करतात.
सकारात्मक विचाराचे लोक अश्या वेळी फक्त गप्प बसतात, विषय वाढवत नाहीत. मला त्यांच्या कंपनीत बरे वाटते

सहमत

>>>> नकारात्मक दृष्टिकोन असण्याचा एक फायदा म्हणजे व्यक्ती एखादा वाईट परिणाम सहन करण्यासाठी मानसिकरित्या तयार असते... <<<<
एकंदरित नि:ष्कर्श मान्य आहेतच, पण तुमच्या पोस्टमधिल हे वाक्य मी सर्वात महत्वाचे व "सकारात्मक" मानतो. Proud

सकारात्मकता व नकारात्मकता मानवी मनात उद्भवतच असते, तिच्यावरच ताबा मिळवणे आवश्यक असते. हे सगळे स्वतः करता करणे तर होतेच, पण दुसर्‍याचे मनातही गरजेप्रमाणे वरील दोनही भावनांचे रोपण करुन प्रोत्साहन देणारा अधिक पुढील पायरीवरचा, तो ही समाजधारणेत गरजेचा असतो. मनात वरिल दोनही भावनांचा सुयोग्य तोल रहावा म्हणुन तर "श्रद्धा" हे टुल (हत्यार हो) केवळ मानवास प्राप्त आहे असे आपण म्हणू शकतो.
अन त्यामुळेच, शत्रुराष्ट्रास नेस्तनाबुद करण्यास्/केल्यावर्/करायचे आधीही, त्या त्या जनसमुहाचे "श्रद्धास्थानांवरच घाला" घातला जातो, त्याची अगणीत ऐतिहासिक व वर्तमानकालिक उदाहरणे देता येतिल.
कोण व्यक्ति किती सकारात्मक/नकारात्मक आहे हे कुम्डली तसेच हस्तरेषांवरुन ठळकपणे समजुन येते असा माझा अनुभव आहे. (अर्थात त्या समजुन येण्याकरता अपरिमित अभ्यास असावा लागतो)

अतिशय गहन व गुंतागुंतीचा विषय आहे. सध्या इतकेच.

>>>> नकारात्मक दृष्टिकोन असण्याचा एक फायदा म्हणजे व्यक्ती एखादा वाईट परिणाम सहन करण्यासाठी मानसिकरित्या तयार असते... <<<<
एकंदरित नि:ष्कर्श मान्य आहेतच, पण तुमच्या पोस्टमधिल हे वाक्य मी सर्वात महत्वाचे व "सकारात्मक" मानतो. + १

limbutimbu
सहमत.. सकारात्मक व नकारात्मक दोन्ही महत्त्वाचे आहेत..
तुमच्या अनुभवांच्या व मतांच्या प्रतिक्षेत...

ज्याने आनंदी पोजमध्ये फोटो दिले त्याने पटकन होकार दिला व तो जिंकला सुद्धा..

खेळ जुगाराचा असेल तर त्यातील जिंकणे सकारात्मकतेशी काही संबंध राखून नसते. Happy

बाकी सकारात्मकता इफेक्टबद्दल +१

<<<खेळ जुगाराचा असेल तर त्यातील जिंकणे सकारात्मकतेशी काही संबंध राखून नसते>>>

हीच तर गंमत आहे. अगदी जुगार सुद्धा सकारात्मक विचार मनात ठेऊन खेळला तर चांगलेच रिझल्ट मिळतात. यात शंका नाही.

नाणे टॉस करून १००० वेळा टाकले तर सर्वसाधाराणपणे ५० टक्के वेळा छापा आणि ५० टक्के वेळा काटा यायला पाहिजे अशी आपली धारणा असते. पण जर मनात ठेवले की, छापाच यायला पाहिजे; तर कमीत कमी ७० टक्के वेळा छापा येईल. करून पहा! Happy

पण जर मनात ठेवले की, छापाच यायला पाहिजे; तर कमीत कमी ७० टक्के वेळा छापा येईल.
>>>
जर या प्रयोगात एकाच वेळी दोघांना आमंत्रण दिले. एकाने छापा आणि एकाने काटा सकारात्मकरीत्या मनात धरले तर ..
सकारात्मकता असावी, पण सकारात्मकतेवर अंधश्रद्धा नसावी एवढाच माझा मुद्दा Happy

असं मुळीच नाहीये
>>
एका अर्थी तुमचे ही बरोबर आहे.
सकारात्मक लोकंच जुगारात हरतात. जिंकू जिंकू या आशेवर खेळत राहतात.

इथे जुगार म्हणजे धंद्यात घेतलेली रिस्क असे नाहीये हा, तसेच पत्त्यांचा खेळही नाही जिथे स्किल लागते, तर तो जो निव्वळ प्रोबेबिलिटीवर अवलंबून असतो.

>>>>>> पण सकारात्मकतेवर अंधश्रद्धा नसावी एवढाच माझा मुद्दा <<<<<
दर ठिकाणी अंधश्रद्धा विषयक "भित्या" दाखविल्याच पाहिजेत का ऋन्मेषा?

तर ज्यांनी दुःखी पोजमध्ये फोटो दिलेला त्यांनी मात्र जुगार खेळायला नकार दिला.>>>

बरे झाले नकार दिला जुगार खेळणे चांगले नाही व्यसन लागते.
जुगारा मुळेच तर महाभारत घडले.

सकारात्मक लोकं कधीच हरत नाहीत >> हा सकारात्मकपणा आवडला Happy

तसेही शाहरूखखान म्हणून गेलाय, हमारी जिंदगी भी इन फिल्मो की तरह होती है. अगर एण्ड तक सबकुछ ठिक ना हो, तो समझो ये दि एण्ड नही है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त Happy

सकारात्मक लोकं कधीच हरत नाहीत
माझ्या मते, ते सुद्धा हरतात, अगदी इतरांच्या सारखेच व तितकेच वेळा.
फक्त काय आहे, सकारात्मक असल्याने ते हरल्याचे बोलतच नाहीत. फक्त जिंकले तरच सांगतात.

नि तेच बरे ना! रडगाणे ऐकायला कुणालाच आवडत नाही.

इतकी वर्षे मी पण असा रडगाणे गाणारा, चुकाच शोधणारा होतो.

गेली दोन तीन वर्षे कसोशीने प्रयत्न करून नेहेमी सर्व काही उत्तम आहे, काही अडचणी, दु:खे नाहीत, सर्वकाही ठीक आहे असे सांगायला सुरुवात केली. मा़झ्या मनालाच बरे वाटू लागले नि ज्या काय अडचणी होत्या त्यांचा बाऊ न करता जमेल तश्या नि तितक्या सोडवल्या. पण तक्रार करणे नाही.

विचार करता आजकाल दु:ख एकच - ब्रिज खेळताना स्वतःच्या चुकीमुळे हरणे, पण त्यावरहि तोडगा म्हणून जो काय एखादा डाव चांगला झाला त्याची आठवण काढून समाधान मानणे (गर्व नव्हे) नि हरण्याबद्दल न बोलणे.

आपोआप कर्मण्ये एवाधिकारस्ते (मला अवग्रह लिहीता येत नाही) याचा अर्थ कळू लागला.

फक्त काय आहे, सकारात्मक असल्याने ते हरल्याचे बोलतच नाहीत. फक्त जिंकले तरच सांगतात.
>>>>
काही अंशी पटलं नाही. सकारात्मक माणसे हार असो वा जीत त्यातून फक्त आणि फक्त चांगलंच शोधतात आणि त्यामुळे हार पचवून नव्याने जोमाने पुढच्या लढतीला उभे रहातात आणि ती लढत जिंकून दाखवतात.

नकारात्मक माणसे एकदा हरली की त्याक्षणी इतके खोल नैराश्यात जातात की पुढची लढाई देखील अर्धी तिथेच हरतात.
एक प्रसंग लिहिते पुढच्या पोस्टीत.

माझी एक मैत्रिण आहे. एका मुलावर प्रेम होतं, आई वडीलांच्या मनाविरुद्ध जाऊन लग्न केलं, वर्षभरात तो मुलगा अपघातात वारला, त्यातच तिला दिवस गेलेले, बाळाचा जन्म झाला आणि काही दिवसांनी बाळही गेलं तिचं (डिटेल्स लिहित नाही)..सासू सासर्‍यांनी तू एकतर दुसरं लग्न कर किंवा तुझ्या घरी परत जा असं सांगितलं, शिक्षण अर्धवट सोडून हिने लग्न केलेलं त्यामुळे चांगली नोकरी मिळेना.
सहाजिकच या सगळ्या परिस्थीत जितकी खचायला हवी तितकीच ही देखील खचली. दिवसेंदिवस आजारी पडू लागली. आम्ही कॉलेजात होते या काळात. ही माझी शाळा मैत्रीण. कॉलेज संपलं तसं माझे अनेकांशी संपर्क तुटले तसाच हिच्याशी ही तुटला. आता मागच्या २ महिन्यांपुर्वी अचानक चिंचवडमधे रोड क्रॉस करताना दिसली. आधी तिला टाळणार होते (का ते माहीत नाही) पण नंतर मुद्दाम आवाज देऊन थांबवलं आणि मग आम्ही तासभर खुप सार्‍या गप्पा मारल्या.तिच्याशी बोलून मी आणखी पॉजिटिव्हिटी घेऊन बाहेर पडले (माझ्या आयुष्यात घडलेल्या काही प्रसंगानी मला प्रचंड पॉझिटिव्ह आणी श्रद्धाळू बनवलंय.. ते असो).
ती सांगते त्या काही काळात ती स्वतः जेंव्हा आजारी पडली तेंव्हा तीने जोडलेली खुप माणसं तिच्या मदतीला धावून आली आणि हा एक (आपल्यासाठी) फार साधा ( वाटणारा) प्रसंग तिचं आयुष्य बदलवून गेला.
ती या काळात स्वतः वर प्रेम करायला शिकली. लक्षात घ्या स्वतःवर प्रेम करणं आणि स्वार्थी असणं यात फार फरक आहे. जेंव्हा आजारपणातून ती बाहेर आली तेंव्हा तिला पहिल्यापेक्षा खुप हलकं वाटत होतं. कारण शोधण्याचा प्रयत्न केला तेंव्हा तिला जाणवलं की ती रोज एक वाक्य म्हणायची की मी एकटी नाहीये. माझ्या सोबत इतके लोकं आहेत.
ही एकच गोष्ट तिला सगळ्यातून उभं करू शकली.
त्या आजारपणानंतर फार कमी माणसांची तिला फिजिकली मदत झाली असेल पण मानसिक सपोर्ट खुप होता. 'मी एकटी नाहीये' या एका वाक्याने तिला जगण्याचं बळ दिलं.
त्यानंतर तिने मनाला हे सांगायला सुरुवात केली की 'मी ही (एखादी) गोष्ट करू शकतेच'.
खोटं वाटेल पण तुझ्या घरी तू परत जा म्हणणार्‍या तिच्या सासू सासर्‍यांनी तिचं शिक्षण पुर्ण करून घेतलं आणि पुन्हा लग्नही लावून दिलं.
खराडीतल्या एका ऑफिसात ती असिस्टंट मॅनेजर आहे. एक मुलगा झाला आहे.नवर्‍याचं खुप प्रेम आहे 'मी माझ्या आयुष्यात खुप सुखी आहे' हे वाक्य ती त्या भेटीत/ काही तासांत किमान १०० वेळा म्हणाली असेल.

काय बिषाद आहे सुखाची तिच्या आयुष्यापासून दुर रहायची Happy

पॉझिटिव्हिटीचं हे एकच उदाहरण माझ्यामते सगळं काही सांगून जातं.... तुमच्या आयुष्यात जे घडतंय ते तुम्हे एस्वतः घडवत असता हे ही लक्षात ठेवा Happy