मला आवडलेले पुस्तक - भाग १ - पोखिला

Submitted by कविता क्षीरसागर on 30 October, 2015 - 09:44

मला आवडलेले पुस्तक - भाग १ - पोखिला

पोखिला - अपहरणाचे ८१ दिवस

लेखक - डॉ . विलास बर्डेकर

नावापासूनच हे पुस्तक आपल्या मनाची पकड घ्यायला लागते . डॉ . विलास बर्डेकर यांच्या जीवनात
घडलेल्या त्या चित्त थरारक ८१ दिवसांची ही अनुभव मालिका .

फुलपाखरांच्या शोधात अरुणाचल प्रदेशाच्या जंगलात गेलेल्या या संशोधकाला बोडो दहशतवादी,
पत्रकार समजून चुकून पकडतात . त्यांचे अपहरण करतात . आणि तब्बल ८१ दिवस डॉ विलास यांना
या दहशत वाद्यांच्या ताब्यात राहावे लागते .

तेव्हाचे सर्व अनुभव अतिशय ओघवत्या भाषेत त्यांनी या पुस्तकात मांडले आहेत . जरी त्यांना तिथे ओलिस
म्हणून राहावे लागले तरीही ते बोडो लोक कधीही त्यांच्याशी माणुसकी सोडून वागले नाहीत .

स्वतः लेखकही बाणेदार , आत्मसन्मान जपतच तिथे राहिले . उलट त्याच लोकांना काहीतरी चांगल्या गोष्टी
शिकवत राहिले . तिथल्या दहशतवाद्यानाही त्यांनी समजून घेतले . सपन , देबू , नारायण हे दहशतवादी तर
त्यांना अंकल म्हणूनच हाक मारत व आदराने त्यांच्याकडे पाहत . पप्पू आणि शंकर नावाचे दोघे जण हे ही
त्याच्याबरोबर स्थानिक ओलिस होते . यातल्या पप्पू वर तर लेखकाने मुलासारखे प्रेम केले.

ही सर्वच २० , २५ वयाची तरुण मंडळी होती . गरीबी व ब्रेनवाश मुळे अशा मार्गाला लागलेली होती .
पण आता परतीचे दोर कापले गेल्याने त्यांना हेच करणे भाग होते . एवढे असूनही लेखकाने किंवा त्या दहशतवादी
तरुणांनी कोणीच आपली माणुसकी सोडली नाही . हे मला यातले खूप विशेष वाटले .

पोखिला म्हणजे असामी भाषेत फुलपाखरू . ह्या एवढ्या भयानक प्रसंगातही लेखकाने आपले फुलपाखरांवरचे
संशोधन चालूच ठेवले होते आणि गंमत म्हणजे ही तरुण पोरेही या कामात त्यांना छान सहकार्य देत होती . जणू काही
कुठल्या संशोधनाच्या मोहिमेवर आल्यासारखेच त्यांनी हे दिवस हिमतीने व सकारात्मक दृष्टीने व्यतीत केले .
त्यांच्यावरही काही भयानक प्रसंग ओढवले पण त्यांनी आपल्या चांगल्या वर्तणुकीने त्या सर्वावर मात केली .
आणि ही त्यांची सकारात्मकता खरेच शिकण्यासारखी आहे .

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Nice review m'am. Where can I get this book? Sorry for English. Posting from I pad.

या घटनेला जेव्हा एक वर्ष झाले होते तेव्हा मी बर्डेकरांची मुलाखत घेतली होती आणि ते म्हणाले होते, यानंतरही माझ्या मनात कसल्याही कटू भावना नाहीत आणि मी पुन्हा एकदा अरूणाचलमध्ये जायला इच्छुक आहे.

मनातल्या मनात सलाम केला त्या माणसाच्या जिद्दीला...

आता तर महाराष्ट्राच्या वनविभागाचे मुख्य कन्व्हेअर म्हणून त्यांची नेमणूक झालीये नागपूरला

वाचलय पुस्तक. आवडलं. अरुणाचलमधे गेले होते तेव्हा फुलपाखरांच्या झुंडीच्या झुंडी पाहून या पुस्तकाचे आणि लेखकाची फार आठवण झाली होती.

अमा आणि सकुरा …. मी हे पुस्तक वाचनालयातून आणले होते .
पण तुम्हाला हे पुस्तक नक्की बुकगंगा डॉट कॉम वरुन मागवता येइल असे मला वाटते .

प्रतिसादाबद्दल सर्वांची आभारी आहे .

aashuchamp (किती लिहायला अवघड नाव घेतलंय हो तुम्ही)

या लेखकाबद्दल दिलेल्या अतिरिक्त माहितीसाठी धन्यवाद