कार इंश्योरन्स कुठला घ्यावा?

Submitted by योकु on 26 October, 2015 - 16:00

भरपूर इंश्योरन्स कंपन्या बाजारात आहेत. प्रत्येकाची काहीतरी खासीयत आणि प्रत्येक कंपनीची जाहीरातबाजी.
तर, कारचा (पर्सनल व्हेइकल) इंश्योरन्स पुढल्या महिन्यात रिन्यू करावयाचा आहे. खाली दिलेला धागा + अजून बाकी साईट्स चाळून झाल्या आहेत. पण तरीही कनफूजन आहेच. Wink
- कुठल्या कंपनीचा करावा? शक्यतो हॅसल फ्री अन क्लिअर गाइडन्स मिळावयाची अपेक्षा. तसेच सर्वीसबाबतीतही.
- गाडी हायपोथिकेशन वर असल्यास झिरो डेप्रिसिएशन घेणं आवश्यक असतं का? (तसाही मी तो करेन पण एक माहीती म्हणून)
- अजून काय काय अ‍ॅड-ऑन घ्यावे?
- एनसीबी बोनस, Voluntary Discount याबद्दलही माहीती
- प्रिमिअम अमांउंट मध्ये किती % घासाघीस करता येईल?
- इथल्या लोकांचे बरे-वाईट अनुभव खरेदी करतांनाचे, सर्वीसेसबाबतचे, क्लेम करायची गरज असतानांचे इ...

यानिमित्तानी बाकी चर्चेकरता हा धागा.

टीम-बीएचपी ची ऑटो-इंश्योरन्स ची लिंक इथे आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी Tata AIG आणि ICICI Lombard हे दोन्ही वापरले आहेत.
क्लेम ला कसलाही त्रास झाला नाही, दोन्ही कंपंन्यांकडुन स्मूथ झाले.
Volks Wagen च्या सर्व्हिस सेंटरला आधी Cash free टाय अप नव्हते ICICI Lombard चे. तेव्हा एकदा आधी workshop ला पूर्ण रक्कम द्यावी लागली, पण ICICI कडुन चेक ४ दिवसात आला.

तरी सुद्धा इन्श्युरन्स कंपनीचे आपल्याला सोयीच्या असलेल्या सर्व्हिस सेंटर्स मध्ये टाय अप आहे की नाही आणि cash free क्लेम करता येतो की नाही याची चौकशी करुन घ्यावी.
Voluntary Discount बद्दल माहिती नाही, पण No Claim Bonus मिळतो, पुढल्या वर्षी त्याच कंपनी कडुन इन्श्युरन्स Renew करताना, डिस्काउंटच्या रुपात.

तुम्ही विचारलेल्या इतर तांत्रिक बाबींची फारशी माहिती नाही.

मापृ, धन्यवाद माहीतीबद्दल. माझा आताचा जो इंश्योरन्स आहे तो ICICI Lombard चाच आहे. पण रिन्यू करतांना त्या कॉलसेंटर वाल्यानी १५के+ रक्कम सांगीतली + यंव, त्यंव फिचर्स मिळतील असंही सांगीतल. मला ती रक्कम जास्त वाटली, म्हणून मग बाकी साईट्स पाहिल्या, अन बरच बार्गेन करता येइल हे लक्षात आलं. म्हणून मग इथे विचारलं...

इन्श्युरन्स शक्यतो ऑन लाईन केल्यास, १०% सुट मिळते.
अर्थात त्या आधी कुठले फिचर्स घ्यावे / घेउ नये हे बघायला हवे. पण मला त्याची पूर्ण माहिती नाही.

बघु या कोणी तरी पुरवीलच माहिती.

- गाडी हायपोथिकेशन वर असल्यास झिरो डेप्रिसिएशन घेणं आवश्यक असतं का? (तसाही मी तो करेन पण एक माहीती म्हणून) >>
नाही... zero dep (की debt ?) हे optional add-on आहे. ते hypothecation वर अवलंबून नाही.

No-claim bonus साठी त्याच कंपनीकडे renew करण्याची गरज नाही. मी २/३ कंपन्यांचा वापरला, आणि प्रत्येक कंपनीने नो क्लेम बोनस दिला.

बजाज आणि आयसीआयसीआय सध्या खुप चालत आहेत. टाटा एआयजीवगैरे पण ऐकले आहे. जुन्या गाडीला बजाजचे इंश्योरन्स होते. पण ते वापरायची गरजच पडली नाही Happy

आजकाल रोडसाईड असिस्ट खूप कार वेंडर्स देतात. काही इन्शुरन्स कंपनी द्यायच्या (मी बजाजच्या पोलिसीमध्ये वाचले होते) त्यामुळे तो ऑप्शन घेतले नाही तरी चालेल. त्यात गाडी पिकअप पासून नंतरचे सगळे खर्च धरले जात. आता कार वेंडर्स ही सुविधा द्यायला लागलेत. आणि, काही इन्शुरन्स कंपनी बेसिक पोलिसीमध्येच देतात. तेव्हा हे कसे आहे ते बघा.

दुसरे काही ऑप्शन जर वापर जास्त असेल तर उपयोगी पडतात म्हणजे हॉटेल स्टे जर गाडी गावाबाहेर बंद पडली तर ती सुधारेपर्यंत, जास्त दिवस लागणार असेल तर आल्टरनेट कार किंवा डेली कन्व्हेयंस आदी, पण हे सगळे पैसे देऊन विकत घ्यावे लागते Wink

झिरो डेप घ्यावाच असे माझे मत आहे. गाडीतले हेडलाईट्स सिस्टम, रबरपार्टस, बम्पर आदी आजकाल बरेच महाग असतात (जर मारुती नसेल तर) त्यामुळे त्यात ५०% पण जास्ती पडू शकते. सो असलेल बर.

नो क्लेम बोनस तुमच्या पोलिसी डॉक्युमेंटनुसार ठरतो. जर आधीच्या पोलिसीवर ० असेल (ते पोलिसी डॉक्युमेंट वर लिहिले असते) तर आता रिन्यू करतांना २०% मिळेल. आणि तो इन्शुरन्स कंपनी चेंज केली तरी असतो. दर वर्षी तो वाढत जातो, अपटू ५० % Happy

व्होलोंटरी डीडक्शन म्हणजे क्लेमच्या वेळी तुम्ही किती खर्च करू शकाल. तो क्लेमच्या रकमेतून कमी करून देतात. त्याचा उपयोग प्रीमिअम कमी करण्यासाठी करतात.

पण शेवटी डीलर आणि कंपनीचा टायअप असेल तर तेही महत्वाचे, कारण शेवटी हा भारत आहे आणि कनेक्शन्स असतील तर सगळी कामे फटाफट होतात Proud

लर आणि कंपनीचा टायअप असेल तर तेही महत्वाचे, कारण शेवटी हा भारत आहे आणि कनेक्शन्स असतील तर सगळी कामे फटाफट होतात फिदीफिदी >> +१

गेली ५ वर्षे वरिल criteria पाळत आल्यामु़ळे चांगला अनुभव आहे. बाकी इन्शुअर करताना जेव्हढे फिचर वाढवशील तेव्हढा प्रिमियम तगडा असेल.