"स्वार्थी सहजीवन"

Submitted by भरत गोडांबे on 23 October, 2015 - 14:59

स्वार्थी सहजीवन"
आपटयाचं झाड ज्यांनी पाहिलं असेल त्यांच्या एक लक्षात आलं असेल कि या झाडावर मुंग्या खूप असतात अगदी लहान पासून ते मोठया डोंगळे सगळेच. पण त्या झाडावर ते नक्की काय करत असतात याचा उलगडा बऱ्याच जणांना होत नाही नि एक साधी गोष्ट म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, पण निसर्गातील अनेक सहजीवानांपैकी एका स्वार्थी सहजीवनाचं ते एक उत्तम उदाहरण आहे ते देखील "एफीड आणि मुंगी" या दोन किटकातील. एफीड म्हणजे मावा नि "Aphid- Ant Relationship" म्हणून ते ओळखलं जात.
एफीड म्हणजेच मावा नावाचा एक लहान कीटक आपटयाच्या कोवळ्या फांदयांमधून अन्नद्रव्ये शोषून घेतात नि त्यातील काही भाग शर्करेच्या रुपात बाहेर टाकतात. हयाच आयत्या मिळणाऱ्या शर्करेवर या मुंग्या येतात. माव्यापासून आयतेच अन्न त्यांना उपलब्ध होते; त्यामुळे या सगळ्या मुंग्या या एफीडची खूप काळजी घेतात, त्यांना जपतात. कोणताही धोका/ संकट एफीड पर्यंत पोहचू देत नाहीत. जर कोणत्याही किटकाने एफीडवर हल्ला करण्याचा प्रयत्न केलाच तर मुंग्या त्यावर तुटून पडतात. पण तुम्ही म्हणाल हि तर सामान्य गोष्ट झाली किंबहुना सृष्टीचा साधा नियम "आपल्या अन्नदात्याच रक्षण करणे". खरी गंमत तर ऐका … वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे कि एफीड उडून जावू नयेत नि मिळणाऱ्या रसदित खंड पडू नये म्हणून मुंग्या एफिडचे पंख कातरून टाकतात नि पुन्हा नवीन पंख येणार नाहीत याची देखील विशेष काळजी घेतात.
आपल्या अन्नदात्याची काळजी घेण्याची नि त्याच्यापासून मिळणारी अन्नाची रसद कायमस्वरूपी मिळावी म्हणून मुंग्यांनी लढविलेली हि शक्कल पहिली कि थक्क व्हायला होतं.
तुम्ही पण या अजब करणीचं नक्की निरीक्षण करा.

PicsArt_10-20-06.00.44.jpg (57.83 KB)
PicsArt_10-20-06.00.44.jpg

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख.. केनयात बाभूळ आणि मुंग्या यांचेही अनोखे सहजीवन बघायला मिळते. माझाच लेख आहे मायबोलीवर.

>>>>बदामाच्या झाडावर पण खुप मुंगळे असतात त्या मागचे कारण काय असावे?<<<<
तेच असेल किंवा खालील.

माझ्या वाचनात (की टिव्हीवर बघितलं) असं आलं होतं, की असली लहान झाडे / रोपटे यांच्या वर मावे किंवा तसले इतर किटक लागले, जी पाने कुतरडतात, तर ती रोपटी टिकत नाहीत.
म्हणुन काही झाडांमध्ये उत्क्रांती झाली आणि ते सरळ शर्करा मिश्रीत द्रव्य सोडतात जेणे करुन मुंग्या येतील. या मुंग्या मग त्या झाडांना संरक्षण देण्याचा प्रयत्न करतात.
मुंग्या छोटी मोठी वारुळं तयार करतात. वारुळाची माती ही झाडांना खुप पोषक असते.

यात मावे / मुंग्यांच्या मैत्रीबद्दल काही सांगितलं नव्हतं.

म्हणजे एकीकडे काही झाडांवर (जिथे माव्यांशिव्याय शर्करा मिळते) मुंग्या माव्यांना येऊ देत नाहीत, तर इतर झाडांवर जिथे माव्यांमुळे शर्करा मिळते, तिथे मुंग्या माव्यांना संरक्षण देतात, आणि त्या त्यांचे पंख कातरुन टाकतात, ते उडुन जाऊ नये म्हणुन ! एवढं इंटिलिजन्स मुंग्यामध्ये निर्माण झालं ही कमालीची गोष्ट आहे.

भरतजी,
तुमच्याकडे माहितीचा खजिना असणार...
त्यात लेखनशैलीही सुर्रेखच .... स्मित
नवीन माहितीच्या प्रतिक्षेत....

मानव, बरोबर असावे.
मी मुंगळ्यांनी उगाच झाडांची हानी होईल म्हणुन मुंग्याची पावडर टाकायची.

भरत,तुमच्याकडील माहितीचा खजिना आणखिन येऊ देत.

सुरेख माहिती भरत Happy
भरत,तुमच्याकडील माहितीचा खजिना आणखिन येऊ देत.>>>>>+१००० Happy

ईंटरेस्टींग माहिती .. चारचौघांना सुनावून शायनिंग मारू शकतो.. आन दो और Happy

खर्रच निसर्ग कमाल आहे .. ते पंख छाटणे, शहाजहान आणि ताजमहाल आठवले पटकन.

निसर्गातील अनेक सहजीवानांपैकी एका स्वार्थी सहजीवनाचं >>> अनेक., आणखी काही चटकन आठवणारी उदाहरणे?

मस्त माहिती, भरत.
यावर पीबीएसच्या नोव्हाचा एक एपिसोड पाहिल्याचे आठवते.
थोडीशी अधिक माहिती:
मुंग्या अफिड्सचे पंख कातरतात - आणि मग एखाद्या झाडावरील न्यूट्रीयंट्स कमी झाले की या मुंग्याच अफिड्सना दुसर्या झाडावर वाहून नेतात ! त्याचबरोबर, या मुंग्या कधीकधी अ‍ॅफिड्सचे अंग "खाजवून" त्याला शर्करा सिक्रीट करण्यास उद्युक्त देखील करतात.

असेच अजून एक सोपे उदाहरण म्हणजे - मधमाशा आणि परागीकरण. झाडे आपल्या फुलांवाटे मध तयार करतात ज्याकडे मधमाशा आकषित होतात आणि परागीकरणास मदत करतात.
त्याचबरोबर क्लिनींग श्रिंप सारखे प्राणी माशांना साफ करून त्यांच्यावरील पॅरासाईट्स काढून टाकण्यास मदत करतात. ह्या साफसफाईच्या वेळी मोठे मासे खुशाल या श्रिंप्सना स्वतःच्या तोंडातदेखील शिरू देतात. (हेच मासे इतर जातीच्या श्रिंप्सना खातात).
अशा प्रकारच्या सर्व नात्यांना सिंबायोटिक रीलेशनशिप्स म्हणतात.

निकीत, तुझी उदाहरणं सिंबायोटिक रीलेशनशिप्स आहेत. पण मूळ लेखात स्वार्थी रीलेशनशिप्स (पंख कातरून) वाचून जास्त गम्मत वाटली मला. Happy

अमरवेल आणि ईतर झाडे, वाळवी आणि ट्रायकोनिंफा, तंबाखू आणि बंबाखु, पाणघोडा आणि (पक्षी: नाव आठवत नाहिये, ह्या चिमण्या त्याच्या विष्ठेवर जगतात आणि ती जागा स्वच्छ ठेवतात).

मुंग्यांना निसर्गतःच काही प्रकारचे इंटेलिजन्स असते, जसे कि shortest path शोधणे. ant colony optimization technic सर्च केले तर अधिक माहिती मिळेल.

भरत, फार छान माहिती मिळाली.

आपल्या शरिरात साखर जास्त आहे की कमी ये पुर्वी लघवीवरुन तपासायचे. मोकळ्या जागी जाऊन सू करायची आणि तासाभरात जर तिथे मुंग्या जमल्यात की समजाव तुमच्यातल साखरेच प्रमाण वाढल. पुर्वी हीच रित होती.

@ पेरु: हो. Ant Colonization Technique, वाचेन.
तसे इन्टेलिजन्स तर सर्व जीवांमध्ये असते.

पण या प्राण्याला पंख येतात, त्या सहाय्याने तो उडतो, तेव्हा ते पंख येउ लागले की कातरुन टाका म्हणजे उडून जाणार नाही, हे इंटिलिजन्स औरच वाटले.

रकाने:
एकपेशीय अमिबा सुद्धा एका प्रकारच्या वनस्पतीला पसंत करतो, दोन असतील तर पैकी एक आवडीची निवडतो. (त्याला मेंदु नाही, पेशीतच इंटिलिजन्स!)

खूप छान माहीती भरत! लेखनशैलीपण खूप छाने.... अजून येऊ देत... प्रतीसादांतनही छान माहिती मिळतेय....