अ‍ॅन्ड्रॉईड आणि त्यांचे काही उपयोगी अ‍ॅप्लिकेशन्स..!!

Submitted by उदयन.. on 8 October, 2011 - 06:54

अ‍ॅन्ड्रॉईड बद्दल बरेच काही छान चांगल्यागोष्टी आहेत
मी सुध्दा अ‍ॅन्ड्रॉईड फोन घेतला.. सुरुवातीला अतिशय कंटाळा आलेला काय ही ब्याद गळ्यात आहे म्हणुन पण जेव्हा त्यात इंटरनेट चालु करुन घेतले आणि मार्केट मधुन एक एक अप्लिकेशन्स डाउनलोड केले मग काही चांगला वाटला... फार उपयोगी काही app. आहेत
त्यातले काही खालील प्रमाने.. :

super security beta 1.23 ;- हा अँटीवायरस प्रोग्राम आहे... स्कॅन करतो..मेलवेअर, हायरिस्क app. कोणती आहेत हे सुध्दा सांगतो..तसेच त्यात एक स्ट्राँगबॉक्स म्हणुन आहे त्यात आपन पासवर्ड वापरुन आपले फोटो विडिओ एसएमएस साठवु शकतो..मुख्य म्हणजे जे काही आपण यात टाकले ते बाहेर गॅलरीत दिसत नाही.. Happy
आणि जो पासवर्ड असतो तो आपल्या इमेल वर मेल म्हणुन येतो..म्हणजे विसरलात तरी प्रोब्लेम नाही.. Happy

Android assistant :- app. अनइन्स्टोल करणे.. फोन मेमरी मोकळी करणे. cache cleaner Volume control इत्यादी यात सहज पणे करता येते file manager सुध्दा यात आहे जो आपल्याला फोन मधे उपलब्ध नसतो..

sms blocker :- हा अत्यंत उपयोगी app. आहे... आपल्याला नको असलेले नंबरांवरुन जे मेसेज येतात त्यांचा नंबर यात टाकला की आपल्याला त्यावरुन मेसेज येतच नाहीत हा app. ते ब्लॉक करुन टाकतो

m-indicator :- आपल्याला लोकल्स ट्रेन किती वाजता ची आहे हे कळण्यासाठी उपयोगी आहे..त्याच बरोबर यात बस चे नंबर सुध्दा आहे त्याचे रस्ते सुध्दा कळतात.. मेगा ब्लॉक्स ची माहीती मेसेज वरुन आपल्याला कळते..

camscanner :- कागद पत्रांचे पीडीफ मधे रुपांतर यात करु शकतात... जर आपल्या कडे स्कॅनर नाही तर आपण कागद समोर ठेउन त्याच्या या app. ने फोटो काढायचा आणि तो मस्त पैकी साफसुफ करुन हा पीडीफ स्वरुपात आपल्या समोर ठेवतो.. अतिशय स्पष्ट लिहिलेले दिसते यातुन..

flashlight :- आपल्या मोबाइल चा टोर्च म्हणुन उपयोग करण्यासाठी हा app. वापरात येतो.. लाइट कमी जास्त करन्याची सुध्दा सोय आहे यात.

Net Counter - नेट वापरताना किती डेटा वापर होतो याची नोंद मिळते.

Battery Doctor - कोणत्या अ‍ॅप साठी बॅटरी जास्त वापरली जाते हे कळते. त्यानुसार ते अ‍ॅप बंद करता येतात. पर्यायाने बॅटरी लाईफ वाढवता येते.

ES File Explorer - file/folder management साठी उत्तम.

Go Launcher - सुंदर UI Themes. ह्याच्या स्वतःच्या Themes छान आहेत. एक iPhone सारखी Theme पण आहे.

GPS Essentials - GPS Tracking साठी

Indian Rail - Online inquiry / train timings / seat availability साठी

Offline Dictionary - ह्यात Dictionary बरोबर language translation पण आहे - ते सुद्धा offline. पण मोठ्या-मोठ्या database files एकदा(च) download कराव्या लागतात.

LBE Privacy Guard - हा firewall चे काम करतो. [पण ह्यासाठी root access हवा.]

Photo Tools by hcpl: विविध छायाचित्रणासंबंधी गणकयंत्रे

PhotoFunia: छायाचित्रणासाठी व नंतर प्रोसेसिंग साठी लागणार्‍या करामती...

App 2 SD (move app to SD);- आपले फोन मधले अ‍ॅप्लिकेशन्स मेमरी कार्ड मधे जमा करते त्या मुळे फोन मेमरी फ्री राहते आणि जास्त जागा मोकळी राहाते

Photo Art - Color Effects = मस्त आहे हे.....अ‍ॅप्लिकेशन...एक विशिष्ट रंग कायम ठेवुन बाकीचे रंग रंगविरहित करता येतात फोटो मधले

पॉवरलाईन : २ (चकटफू व्हर्जन) किंवा अधिक (१.५ $ला) गोष्टी आडवी रेघ वापरून दाखवते. जसे की बॅटरी, सीपीयू वर्कलोड वगैरे. साधे, अवाजवी जागा न व्यापणारे असे अ‍ॅप आहे.

fm radio india :- नावाचे एक छान अ‍ॅप आहे ऑनलाइन रेडिओ ऐकण्यासाठी. भरपूर चॅनेल्स आहेत रेडिओची त्यावर. एक मराठी गाण्यांचेही चॅनेल आहे. मला आवडलं अ‍ॅप. ट्राय करून पहा

Stuck on Earth :- भटक्यांसाठी बेस्ट अ‍ॅप....यात तूम्हि तूमची ट्रीप प्लॅन करु शकतात....तिठल्या ठिकाणांचे लोकांनी काढलेले फोटो पाहू शकतात आणि बरच काही....

TripAdvisor :-हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, फ्लईट्स, Things to do in city...

AppLock :- हे लॉक अ‍ॅप्लिकेशन आहे......यात तुम्ही हवे ते अ‍ॅप्लिकेशन, मेस्सेज, जीमेल व्हॉट्सप्प आणि इतर अ‍ॅप्लिकेशन लॉक करु शकतात... यात पासवर्ड ची सुविधा आहे..... अ‍ॅप्लिकेशन ओपन करताना पासवर्ड ची गरज लागते .

Distance calculator:- आपण किती चाललो याचा हिशोब ठेवणारे अ‍ॅप्लिकेशन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो सक्रिय. viber डालो करायला लावलंय.

मानव, व्हॉट्सॅप कॉलच्या व्हॉल्यूमसाठी सेटिंग दिसले नाही. आता कॉल सुरु झाल्यावर व्हॉल्यूम चेक करेन. तेवढाच प्रॉब्लेम असेल तर काही हरकत नाही Happy

वेगळे सेटिंग नसते, ते अ‍ॅप्लिकेशन सुरु असेल तेव्हा मेन व्हॉल्युम बटन्स ने कमी जास्त करायचे.
म्हणजे व्हॉट्स अ‍ॅप कॉल सुरु असताना करावे लागेल.

अर्थात इतर प्रॉब्लेम सुद्धा असू शकतो, व्हॉट्स अ‍ॅप चे लेटेस्ट व्हर्जन / रिइन्स्टॉल करणे इत्यादि, जसे सक्रियने सांगितलेय.

बाफ वर आलाय म्हणून पहिल्या पासूनचे सर्व प्रतिसाद वाचून काढले

अमित मोरेंच्या पोस्ट मध्ये हे सापडल

<<<< FREEdi YouTube Downloader - यू ट्यूब वरील व्हीडिओ,
व्हीडिओ म्हणुन किंवा MP3 म्हणून डाऊनलोड करण्यासाठी..~>>>>>> हे कोणी वापरल आहे का app
मला एक्चुअली फोनवरुन यू ट्यूब वीडियो वगैरे डाउनलोड करायचे असतात . पीसीवर वगैरे कंटाळाच येतो. घरी जाऊन पुन्हा पीसीला कनेक्ट व्ह्यायच म्हणजे शिक्षा वाटते
तर अस कोणते app असेल तर सांगा

एक दोन आहेत ते मेलवेअर मोबाईल मधे टाकतात. मधेच मोबाईलवर जाहीराती यायला सुरुवात होते. त्यापेक्षा युट्युबवरचे व्हिडीओ कंम्पुटरवरून डाऊनलोअड करावे

युट्युबवरचे व्हिडीओ कंम्पुटरवरून डाऊनलोअड करा>>>> सक्रिय , <<<< पीसीवर वगैरेकंटाळाच येतो. घरी जाऊन
पुन्हा पीसीला कनेक्ट व्ह्यायच म्हणजे शिक्षा वाटत>>>> हे वाचा बर

थॅंक्स अश्विनी पण ते app आहे का ? की साइट आहे

मानव, तुम्ही म्हटलं तसं व्हॉट्सॅप कॉल सुरु झाल्यावर आपोआप व्हॉल्यूम अगदी कमी (जवळजवळ म्यूटच) होवून जात होता. आत्ता हक्काच्या भावावर प्रयोग करत शेवटी प्रॉब्लेमचा पत्ता लागला. त्याच्याशी बोलता बोलता आधी स्पिकरवर टाकून पाहिलं तर ऐकू यायला लागलं. मग व्हॉल्यूम पाहिला आणि प्रश्न सुटला.

सक्रिय आणि मानव, दोघांनाही धन्यवाद Happy

Pages