अ‍ॅन्ड्रॉईड आणि त्यांचे काही उपयोगी अ‍ॅप्लिकेशन्स..!!

Submitted by उदयन.. on 8 October, 2011 - 06:54

अ‍ॅन्ड्रॉईड बद्दल बरेच काही छान चांगल्यागोष्टी आहेत
मी सुध्दा अ‍ॅन्ड्रॉईड फोन घेतला.. सुरुवातीला अतिशय कंटाळा आलेला काय ही ब्याद गळ्यात आहे म्हणुन पण जेव्हा त्यात इंटरनेट चालु करुन घेतले आणि मार्केट मधुन एक एक अप्लिकेशन्स डाउनलोड केले मग काही चांगला वाटला... फार उपयोगी काही app. आहेत
त्यातले काही खालील प्रमाने.. :

super security beta 1.23 ;- हा अँटीवायरस प्रोग्राम आहे... स्कॅन करतो..मेलवेअर, हायरिस्क app. कोणती आहेत हे सुध्दा सांगतो..तसेच त्यात एक स्ट्राँगबॉक्स म्हणुन आहे त्यात आपन पासवर्ड वापरुन आपले फोटो विडिओ एसएमएस साठवु शकतो..मुख्य म्हणजे जे काही आपण यात टाकले ते बाहेर गॅलरीत दिसत नाही.. Happy
आणि जो पासवर्ड असतो तो आपल्या इमेल वर मेल म्हणुन येतो..म्हणजे विसरलात तरी प्रोब्लेम नाही.. Happy

Android assistant :- app. अनइन्स्टोल करणे.. फोन मेमरी मोकळी करणे. cache cleaner Volume control इत्यादी यात सहज पणे करता येते file manager सुध्दा यात आहे जो आपल्याला फोन मधे उपलब्ध नसतो..

sms blocker :- हा अत्यंत उपयोगी app. आहे... आपल्याला नको असलेले नंबरांवरुन जे मेसेज येतात त्यांचा नंबर यात टाकला की आपल्याला त्यावरुन मेसेज येतच नाहीत हा app. ते ब्लॉक करुन टाकतो

m-indicator :- आपल्याला लोकल्स ट्रेन किती वाजता ची आहे हे कळण्यासाठी उपयोगी आहे..त्याच बरोबर यात बस चे नंबर सुध्दा आहे त्याचे रस्ते सुध्दा कळतात.. मेगा ब्लॉक्स ची माहीती मेसेज वरुन आपल्याला कळते..

camscanner :- कागद पत्रांचे पीडीफ मधे रुपांतर यात करु शकतात... जर आपल्या कडे स्कॅनर नाही तर आपण कागद समोर ठेउन त्याच्या या app. ने फोटो काढायचा आणि तो मस्त पैकी साफसुफ करुन हा पीडीफ स्वरुपात आपल्या समोर ठेवतो.. अतिशय स्पष्ट लिहिलेले दिसते यातुन..

flashlight :- आपल्या मोबाइल चा टोर्च म्हणुन उपयोग करण्यासाठी हा app. वापरात येतो.. लाइट कमी जास्त करन्याची सुध्दा सोय आहे यात.

Net Counter - नेट वापरताना किती डेटा वापर होतो याची नोंद मिळते.

Battery Doctor - कोणत्या अ‍ॅप साठी बॅटरी जास्त वापरली जाते हे कळते. त्यानुसार ते अ‍ॅप बंद करता येतात. पर्यायाने बॅटरी लाईफ वाढवता येते.

ES File Explorer - file/folder management साठी उत्तम.

Go Launcher - सुंदर UI Themes. ह्याच्या स्वतःच्या Themes छान आहेत. एक iPhone सारखी Theme पण आहे.

GPS Essentials - GPS Tracking साठी

Indian Rail - Online inquiry / train timings / seat availability साठी

Offline Dictionary - ह्यात Dictionary बरोबर language translation पण आहे - ते सुद्धा offline. पण मोठ्या-मोठ्या database files एकदा(च) download कराव्या लागतात.

LBE Privacy Guard - हा firewall चे काम करतो. [पण ह्यासाठी root access हवा.]

Photo Tools by hcpl: विविध छायाचित्रणासंबंधी गणकयंत्रे

PhotoFunia: छायाचित्रणासाठी व नंतर प्रोसेसिंग साठी लागणार्‍या करामती...

App 2 SD (move app to SD);- आपले फोन मधले अ‍ॅप्लिकेशन्स मेमरी कार्ड मधे जमा करते त्या मुळे फोन मेमरी फ्री राहते आणि जास्त जागा मोकळी राहाते

Photo Art - Color Effects = मस्त आहे हे.....अ‍ॅप्लिकेशन...एक विशिष्ट रंग कायम ठेवुन बाकीचे रंग रंगविरहित करता येतात फोटो मधले

पॉवरलाईन : २ (चकटफू व्हर्जन) किंवा अधिक (१.५ $ला) गोष्टी आडवी रेघ वापरून दाखवते. जसे की बॅटरी, सीपीयू वर्कलोड वगैरे. साधे, अवाजवी जागा न व्यापणारे असे अ‍ॅप आहे.

fm radio india :- नावाचे एक छान अ‍ॅप आहे ऑनलाइन रेडिओ ऐकण्यासाठी. भरपूर चॅनेल्स आहेत रेडिओची त्यावर. एक मराठी गाण्यांचेही चॅनेल आहे. मला आवडलं अ‍ॅप. ट्राय करून पहा

Stuck on Earth :- भटक्यांसाठी बेस्ट अ‍ॅप....यात तूम्हि तूमची ट्रीप प्लॅन करु शकतात....तिठल्या ठिकाणांचे लोकांनी काढलेले फोटो पाहू शकतात आणि बरच काही....

TripAdvisor :-हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, फ्लईट्स, Things to do in city...

AppLock :- हे लॉक अ‍ॅप्लिकेशन आहे......यात तुम्ही हवे ते अ‍ॅप्लिकेशन, मेस्सेज, जीमेल व्हॉट्सप्प आणि इतर अ‍ॅप्लिकेशन लॉक करु शकतात... यात पासवर्ड ची सुविधा आहे..... अ‍ॅप्लिकेशन ओपन करताना पासवर्ड ची गरज लागते .

Distance calculator:- आपण किती चाललो याचा हिशोब ठेवणारे अ‍ॅप्लिकेशन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुमेधाव्ही,
तुमच्या फोन सेटिंग्ज मधे 'अ‍ॅप्स' टॅब मधे गेल्यास ही सोय दिसेल.
सिस्टीम ब्लोटवेअर्स अनइन्स्टॉल करता येत नाहीत, पण हाईड करता येतात.

water your body

नावाचे अत्यंत उपयुक्त अ‍ॅप्लिकेशन आहे.. आपल्या वजन टाकुन आपल्या शरीराला किती पाण्याची गरज आहे ते सांगते तसेच थोड्या थोड्या मिनिटांनी आपल्यला पाणी पिण्याची आठवण करुन देते....

मुतखडा झालेल्यांना फारच चांगले आहे

healthkart plus या अ‍ॅपमधे औषधांची सर्व माहीती, किंमत आणी सबस्टिटूयुट, जेनेरिक नेम वगैरे इतरही माहिती खूप च छान उपलब्ध आहे.

हे पूर्वी लिहून झालेले आहे. धागा वाचला असता तर सापडले असते. तरीही, पुन्हा एकदा,

अँड्रॉइड हे गूगलचे पिल्लू आहे.
यूट्यूब हे गूगलचे दुसरे पिल्लू आहे.
यूट्यूबवर जाऊन ऑनलाईन व्हिडिओ पहाणे गूगलच्या फायद्याचे आहे.
त्यामुळे यूट्यूबवरून व्हिडिओ डाऊनलोड करण्याचे ऑफिशियल अ‍ॅप मिळणार नाही.
अनऑफिशियल, हॅकर्सनी तयार केलेली अ‍ॅप्स आहेत, पण ती तुमच्या जबाबदारीवर शोधणे व वापरणे. त्यायोगे तुमच्या मोबाईलमधे किडे, जंतू इ. आलेत तर आम्ही जबाबदार नाही.

मला सर्वात जास्त आवडलेले अ‍ॅप म्हणजे अ‍ॅपलिकाटो (APPLIQATO) कंपनीचे ऑटोमेटिक कॉल रेकॉर्डर (फ्री).

यात आपण इतर कॉल रेकॉर्डरप्रमाणे कॉल रेकॉर्ड करु शकतोच.
शिवाय काही ठराविक काँटॅक्ट्सचे कॉल रेकॉर्ड होणार नाहीत अशी व्यवस्था करु शकतो जी मला महत्वाची वाटते. Happy
हे कॉल चालु असतांना आवाज थोडा मोठा करुन रेकॉर्ड करते जेणेकरुन सर्व बोलणे व्यवस्थित रेकॉर्ड होईल.
क्लाएंट्सचे कॉल रेकॉर्ड झाल्याने माझ्याकडे तोंडी संभाषणाचे (व्हर्बल कम्युनिकेशन) प्रुफ राहाते.

अन्फॉर्च्युनेटली, माझ्या नवर्‍याच्या फोनवर हे अ‍ॅप नीट चालत नाहीये. मे बी रॅम कमी असल्याने.
(हे "डिव्हाईस नॉट कंपॅटिबल") असे सांगते. तर आणखी कोणते कॉल रेकॉर्डर अ‍ॅप आहे का जे मलाअ वरील सुविधा देईल आणि कमी रॅमच्या फोनवरपण व्यवस्थित चालेल?

भारतात कॉल रेकॉर्ड करणे अलाऊड नाही. बहुसंख्य अ‍ॅप्स कॉल इन्टर्नली रेकॉर्ड करीत नाहीत स्पीकर फोनवर करतात . जसे आपणआवाज रेकॉर्ड करतो तसा तो बाहेरून रेकॉर्ड होतो. अनधिकृत कॉल रेकॉर्डिंगला पुरावा मानत नाहीत. पोलीस देखील पंचनामा करून कॉल रेकॉर्ड करतात.

अनधिकृत कॉल रेकॉर्डिंगला पुरावा मानत नाहीत. पोलीस देखील पंचनामा करून कॉल रेकॉर्ड करतात.

>> रॉबीनहूड मी कोर्टात वै. पुरावा म्हणून वापरणार नाहीये. कॉल रेकॉर्ड करायची इतर साधी कारणे आहेत.

भारतात कॉल रेकॉर्ड करणे अलाऊड नाही.

>> म्हणजे मी माझ्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप घालुन कॉल रेकॉर्ड होत असतील तर तो गुन्हा आहे का? तसे होत असल्यास कृपया सांगा.

मला सर्वात जास्त आवडलेले अ‍ॅप म्हणजे अ‍ॅपलिकाटो (APPLIQATO) कंपनीचे ऑटोमेटिक कॉल रेकॉर्डर (फ्री). >> Is it beep free ? Tried few apps and they put beeps and other person knows call is getting recorded.

अजिबात टाकु नका...... त्यातुन व्हायरस येतो आणि मोबाईल वर सतत अ‍ॅड येत राहतात... मोबाईल फॉरमॅटच करावा लागतो...

मोबाईल वरुन डाउनलोड करता येत नाही... युट्युब वरचे... रिक्स घ्यायची असल्यास घेउ शकतात...
कंम्पुटर मधुन करायची असल्यास रियल प्लॅअर ९ हे डाउनलोअड करुन घ्या.. त्यातुन साईटवर कुठे ही विडीओ चालु झाल्यास आपोआप डाउनलोड करण्याची लिंक त्या विडीओ वर येते..

मला सर्वात जास्त आवडलेले अ‍ॅप म्हणजे अ‍ॅपलिकाटो (APPLIQATO) कंपनीचे ऑटोमेटिक कॉल रेकॉर्डर (फ्री). >> पियू, हे अ‍ॅप फोन स्पिकरवर असेल तरच रेकॉर्ड करते. इन इअरसाठी हे चालत नाही.. तुम्ही काहि सेटिंग केले आहे का?

माझ्याकडे श्याम सुन्ग ग्याळेक्षी ३ हाये. शीडी एमे हाये. त्येच्यावर आजुन एकही कॉल कोणत्याही अ‍ॅपवरून रेकॉर्ड झालेला नाही.....नुस्ती वार्‍यासारखी खर्खर य्ते. कारण काय्य?

अ‍ॅन्ड्रॉईडसाठी अ‍ॅन्टीथेफ्ट सॉफ्टवेअर कोणते चांगले आहे. मला मोबाईल डेस्कवर ठेऊन जाण्याची सवय आहे, म्हणुन कधी हारवलाच तर उचलेगाराची माहीती मिळेल यासाठी कोणते अ‍ॅप वापरावे

Is it beep free ? Tried few apps and they put beeps and other person knows call is getting recorded.

>> हो. बीप फ्री आहे.

पियू, हे अ‍ॅप फोन स्पिकरवर असेल तरच रेकॉर्ड करते. इन इअरसाठी हे चालत नाही.. तुम्ही काहि सेटिंग केले आहे का?

>> अजिबात नाही. मी कोणतीही सेटिंग केलेली नाही. फोन स्पिकरवर असण्याची गरज नाही. हेडसेट घातलेले असले किंवा स्पीकरवर नसला तरी व्यवस्थीत रेकॉर्डींग होते.

त्येच्यावर आजुन एकही कॉल कोणत्याही अ‍ॅपवरून रेकॉर्ड झालेला नाही.....नुस्ती वार्‍यासारखी खर्खर य्ते. कारण काय्य?

>> मी सांगितलेले अ‍ॅप डालो करुन बघा.

आणखी कोणते कॉल रेकॉर्डर अ‍ॅप आहे का जे मला वरील सुविधा देईल आणि कमी रॅमच्या फोनवर (कॅनव्हास १) पण व्यवस्थित चालेल?

माझ्या फोनवर मध्येच कधीतरी आपोआप "Restricted access changed" असं नोटिफिकेशन येतं आणि डेटा सर्विस व वॉइस कॉल्स ब्लॉक होतात. नोटिफिकेशन टॅप केलं की गायब होतं. असं झालं की मी फोन रिस्टार्ट करतेय.

नक्की काय होत असावं?

तुमच्या सर्विस प्रोवायडरचा प्रॉब्लेम आहे. रीस्टार्ट करू नका. एरोप्लेन मोड ऑन - ऑफ करा, नेटवर्कवर पुन्हा लॉगईन होईल.

Pages