Submitted by vishal maske on 21 October, 2015 - 21:32
दसरा
मनसोक्तपणे वाटतात सोनं
चेहरा ठेऊन सदैव हासरा
देऊन-घेऊन प्रेम-आनंद
असा साजरा होतो हा दसरा
आपटा आणि सौंदडीची
मग करण्यासाठी लूट
आनंदाची उधळण करत
सारे येतात होऊनी एकजूट
सोनं-चांदीची करूनी लूट
यशाची होते ती सुरूवात
लहाणांना मिळते प्रेरणा
मोठ्यांचे मिळतात आशिर्वाद
ते झेंडू तोरण दारावरचे
आनंदाने हसत डूलते
प्रसन्न ठेवते घरा-घराला
पाहून त्याला मन हे खुलते
विसरूनी द्वेश मना-मनातील
मनी आपुलकी पेरली जाते
गुण्या-गोविंदाने नांदत राहू
हिच पर्वनी ठरली जाते
वाटत राहू असाच आनंद
आपुलकीचा न सोडता पिच्छा
आनंददायी दसरा दिनाच्या
मंगल-मंगल-मंगल शुभेच्छा
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान..... तुम्हाला
छान..... तुम्हाला विजयादशमीच्या शुभेच्छा
सुंदर .. दसर्याच्या हार्दिक
सुंदर .. दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा .
मंगल मंगल मंगल शुभेच्छा
मंगल मंगल मंगल शुभेच्छा