तुझा हात हाती नसे आजही

Submitted by तुषार जोशी on 10 October, 2015 - 08:05

तुझा हात हाती नसे आजही
सुरू श्वास माझे तसे आजही

उफाळून येते तुझी पौर्णिमा
तुझा चंद्र ठेवी ठसे आजही

जगाया पुरे जाण साधी मला
कुणी उंबऱ्याशी बसे आजही

बुडालो किती खोल कामामधे
मला शोधती आरसे आजही

पहा हाक मारून, 'तुष्की' तुझा
कधीचाच होता असे आजही

तुष्की  नागपुरी
नागपूर, २० एप्रिल २०१३, ०५:००

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>पहा हाक मारून, 'तुष्की' तुझा
कधीचाच होता असे आजही<<< मक्ता छान! आरसेही छान! पौर्णिमा ही ओळ उंचावर गेली पण दुसर्‍या ओळीतून अधिक न्याय मिळाला असता तर अधिक आनंद झाला असता. Happy अनेक शुभेच्छा! Happy