Submitted by तुषार जोशी on 10 October, 2015 - 08:05
तुझा हात हाती नसे आजही
सुरू श्वास माझे तसे आजही
उफाळून येते तुझी पौर्णिमा
तुझा चंद्र ठेवी ठसे आजही
जगाया पुरे जाण साधी मला
कुणी उंबऱ्याशी बसे आजही
बुडालो किती खोल कामामधे
मला शोधती आरसे आजही
पहा हाक मारून, 'तुष्की' तुझा
कधीचाच होता असे आजही
तुष्की नागपुरी
नागपूर, २० एप्रिल २०१३, ०५:००
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त!
मस्त!
वाह्...मस्तच!
वाह्...मस्तच!
>>>पहा हाक मारून, 'तुष्की'
>>>पहा हाक मारून, 'तुष्की' तुझा
कधीचाच होता असे आजही<<< मक्ता छान! आरसेही छान! पौर्णिमा ही ओळ उंचावर गेली पण दुसर्या ओळीतून अधिक न्याय मिळाला असता तर अधिक आनंद झाला असता. अनेक शुभेच्छा!
सगळ्यांना धन्यवाद पौर्णिमा
सगळ्यांना धन्यवाद
पौर्णिमा बद्दल तुमचे मत पटले बेफिकीर
खूप छान ग़ज़ल
खूप छान ग़ज़ल
जिओ तुषारभाई!!! किती
जिओ तुषारभाई!!!
किती वर्षांनी!!!!!
तुमची विमान कविता अजून आठवते..