तुमचे नाव मतदार यादीत शोधा

Submitted by नितीनचंद्र on 15 April, 2014 - 23:08

खरोखरी आपले सरकारे धन्य आहेत. जेव्हढा प्रचार मतदान करा हा प्रचार करण्यासाठी करतात त्याच्या १ टक्का सुध्दा प्रचार तुमचे नाव मतदार यादीत कसे शोधा यावर केला जात नाही.

किती जणांना माहित आहे आपले नाव मतदार यादीत कसे शोधायचे ?

महाराष्ट्रात तरी ही सुवीधा देणार्‍या लिंक घ्या.

https://ceo.maharashtra.gov.in/

ह्या मुख्य पानावर गेल्यानंतर Search your Name in Final Electoral Roll 2014 New यावर क्लिक करा आणि एक तर आपल्या आयडेंटीटी कार्ड नुसारच्या नंबरा नुसार किंवा नावा नुसार आपले नाव शोधण्याचा पर्याय उपलब्ध्द आहे.

आपण या सर्च इंजिनवर सरळ जाऊ शकता http://103.23.150.139/marathi/

कृपया लक्षात ठेवा आपल्याला किमान खालील गोष्टी माहित असल्याशिवाय इथे जाण्याचा काही फायदा नाही.

१) आपला जिल्हा'

२) आपले व्होटर आयडेंटीटीवरील आपला युनीक नंबर ( विधानसभा मतदार संघ माहीत नसल्यास )

३) आपला विधानसभा मतदार संघ ( आपले व्होटर आयडेंटीटी कार्ड त्या क्षणी उपलब्ध नसल्यास )

लक्षात ठेवा की मागल्या वेळी इथे मतदान झाले अस समजुन जर आपण नाव शोधायला गेलात तर बर्‍याच वेळा तिथे नाव शोधायला खुप उशार लागतो. कधी कधी मतदान केंद्र तेच राहिलेले नसते. त्यात बदल झालेला असतो आणि आता शासनाने नेमणुक करुनही मतदानाच्या स्लीप देणारे कर्मचारी तुमच्या पर्यंत पोहोचलेले नसतात.

हा मनस्ताप टाळुन आपल्या पसंतीचे सरकार स्थापन करण्याचा अधिकार मिळवा.

ही माहिती कॉपी पेस्ट करुन इतरांना कळवा आणि मतदानासाठी उद्युक्त करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Dear Citizens, we r holding a meeting on sunday 20/4/2014 at Harshal lawns karve rd opp Mcdonalds kothrud pune Between 9am to 1 pm to file the PIL to fight for our fundamental right to vote. All citizens are requested to participate with their relevant documents and also citizens who have voted but wish to support this cause your participation wud be valuable. Looking forward to your support. Jai Hind
Regds
Anita Shamani 9822976049

people need to complain with district collector immediately. It needs to be proven the number of missing voters would affect result.

हा मेसेज पुण्यातला एका पत्रकार ग्रुप कडून आला आहे

नितिन, माहिती छान दिलीस.. यावर्षी आम्हाला मतदान नाही येणार करता.. ऑन लाईन जाऊन फॉर्म भरलाय पण बहुतेक हे काम बघणार्‍या कार्यकर्त्यांना पुरेसं ट्रेनिंग नाही मिळालेलं.. Sad अबतक नो रिप्लाय..

ऑनलाईन फॉर्म भरल्यावर त्या फॉर्म ची प्रिंट तहसिल कार्यालयात घेउन जायचे असते बरोबर जे तुम्ही कागदपत्र अपलोड केले आहेत त्यांची ऑरिजनल घेउन जायची आहे.. ते बघितल्यानंतर ऑनलाईनच अप्रुव्ह होणार.. नंतर हीअरिंग साठी तुम्हाला परत बोलवण्यात येईल त्यावेळेला जाउन यावे लागते ....

नुसते ऑनलाईन फॉर्म भरुन उपयोग नसतो..

ऑनलाइन लिस्ट बोगस आहे. माझे नाव त्यातसापडले नाही. पण आज घरी चि ठी आली. मी आता मतदान करणार. जीव भांड्यात पडला माझा

मतदारयाद्यांतील ३० लाख नावांना कात्री लागली आहे. आपली नावे शाबूत आहेत का तपासून घ्या.
वर्तमानपत्रांत तशा आशयाच्या जाहिरातीही आल्या आहेत.

.

Pages