लहानपणी घरी ,'विचित्र विश्व' नावाचं एक मासिक येत असे.त्यात दुनियाभरातील चित्रविचित्र गोष्टींबद्दल वाचून खूप गंमत वाटायची..पुढे कामानिमित्त देशोदेशी भटकताना बर्याच असामान्य गोष्टीं शी सामना झाला. त्यापैकी विचित्र फूड्स किंवा bizarre foods हे प्रकरण, कधीकाळी डिस्कवरी चॅनेल वर पाहिलेले , अचानक आपल्या डोळ्यासमोर येऊन ठाकले तर कसे वाटेल, याचा मासला इथे देतेय.. यापूर्वी बीजिंग च्या खाऊ गल्ली चे फोटो तुमच्यापैकी काही जणांच्या लक्षात असतील..
यंदाचा पावसाळा,थायलँड च्या उत्तरेच्या टोकाकडील चिंगमाय प्रांतात घालवला. दोन महिने अक्षरश: जीवाची चिंगमाय केल्याने या प्रांताचा कानाकोपरा पाहायला मिळाला. येथील भाजी बाजारात भटकताना मधाच्या पोळ्यापासून ,अनेक प्रकारचे जीव जिवाणू ,कीटक विकायला दिसले.. नंतर कळले कि येथील चीनी वंशीय थाय लोकं
या सर्व वस्तू (?)आवडीने खातात . ( वैधानिक चेतावनी- सी @ युअर ओन रिस्क!! कृपया ,'ई ऊ' न करता पाहणे
)
२
वीकेंड मार्केट मधे खालील वरायटी, मीठ्,मसाला लावून कडक तळलेली दिसली. लोकं मस्तपैकी कुर्रम् कुर्रम करून स्वाद घेत होते..
इस्पेशली चायनीज टूरिस्ट्स् ची टोळधाडच पडली होती या ठेल्यांवर.. मी फोटो काढत असताना, मलाही प्रेमाने
आपल्याजवळच्या पुडक्यांतून देऊ करत होते..
५
मी नुस्तीच फोटू काढतेय म्हटल्यावर आता ठेलेवाला माझ्याकडे रागाने पाहू लागला होता , म्हणून मी निमूटपणे तिकडून काढता पाय घेतला.. दुसर्यांदा चक्कर मारली तेंव्हा त्याने एक कार्डबोर्ड वर ठेवला होता त्यावर इंग्लिश मधे लिहिलेले होते ,' नो फोटो प्लीज'!!! 
आणी चिउ चाय कौ विसर्लीस
आणी चिउ चाय कौ विसर्लीस का>>>>>>>>>>>> छे गं ......चिऊ काऊंना कस्काय विसरीन गं?
आणि ते विक्रमसींह आणि तू काय ते डिन्ग डॉन्ग करताय गं? आँ??
मानु.. अगा ही बाहासा
मानु.. अगा ही बाहासा इंडोनेसिया है!!! डाँग म्हंजे फ्रेंडली कोलोक्विअल एक्स्प्रेशन फॉर अ फ्रेंड!!!
देवा रे देवा चीनी बांधव चार
देवा रे देवा
चीनी बांधव चार पायाचं टेबल सोडून काहीही खाऊ शकतात अस ऐकून आहे
वर्षु, तू त्या माणसाला ' मी नो इंग्लिश!' म्हणून फ़ोटो काढायाचे नं!
वत्सला.. गुड ऐडिया.. पण
वत्सला.. गुड ऐडिया..
पण नंतर नंतर मीच तिथे किती जणांना बोर्ड्स करून दिले असे ..( ऊप्स किती तो आगाऊपणा!!) , तिथे मला फ्रिक्वेंटली पाहून तो वळकायला पण लागला नं मला 
इकडे भारतात "तुझ्या तोंडात
इकडे भारतात "तुझ्या तोंडात किडे पडतील" असा दिला जाणारा गावंढळ शाप तिकडे वरदान वाटत असेल ना? >
अग्ग्ग्ग्ग्ग्गा! कसले
अग्ग्ग्ग्ग्ग्गा! कसले सोनकिडे, रातकिडे, ढेकणे बिकणे खातात हे लोक!

मागे एकदा चायनिज सुपमधे उन्दराची पिल्ले असलेला फोटो पाहिला तेव्हा अन्गावर काटा आला होता.
हे त्यामानाने अगदीच ईई नाहीत.
मी पण अश्विनीची पोस्ट दोनदा वाचली... खात्री करुन घेण्यासाठी.
विकु, जागूला हे एकदम सोप्पं
विकु, जागूला हे एकदम सोप्पं आहे. तीन पाण्यातून काढायचं नाहिये. झुरळाचे पाय तसेच ठेवलेत म्हणजे साफ करण्याचंही काम नाहिये. कालवणासाठी चिंचेचा कोळ तिच्याकडे करुनच ठेवलेला असेल कायम. चिटुकले पिटुकले असल्याने तुकडी करायचेही काम नाही.
आणि दिनेश काय! डिशच्या मध्ये ढिगारा ठेवतील आणि बाजूने सॉसचा स्वल्पविराम काढतील, काकडीच्या चकत्या त्या ढिगाच्या डोक्यावर मांडतील, तीन-चार कोथिंबिरीची पानं (झूमकरुन तुळशीएवढी दिसतील अशी) मांडतील. हाकानाका.
डिन्ग डॉन्ग>>> ओ बेबी सिंग अ साँग
सावली, आर्या, भंकस करायची ठरवलं की करायची
तिथे मला फ्रिक्वेंटली पाहून तो वळकायला पण लागला नं मला >>> हातावर चणे दाणे ठेवतात तसे तुझ्या हातावर चिमुटभर ठेवले नाहीत का येता जाता?
अश्वीतला विनोद सम्राट चा
अश्वीतला विनोद सम्राट चा संमंध जागृत झालेलाय.. आता कै खरं नाय!!!
ईSSयुयुयु.. ( तुझा वैधानिक
ईSSयुयुयु.. ( तुझा वैधानिक इशारा मोडलेला नाही बरं.. अजुन २-३ अक्षर लावली आहेत :फिदी:)
अश्विनी
.. पोस्ट वाचल्यावर मी पण आयडी चेक केला दोनदा!
वर्षूताई, तुझा वैधानिक इशारा
वर्षूताई, तुझा वैधानिक इशारा वाचुनच खालचे फोटो पाहाण्याचा आगाऊपणा केला नाही, पण अश्विनीतैनी मात्र खुप हसवलं
हातावर चणे दाणे ठेवतात तसे तुझ्या हातावर चिमुटभर ठेवले नाहीत का येता जाता?>>>>>
अरुणाचलचा अनुभव आठवला.
अरुणाचलचा अनुभव आठवला. अरुणाचलच्या होस्टने जेवायला बोलावले होते ते तुमची आमची खाद्य संस्क्रुती अशा गप्पा सुरु होत्या ज्योतीने वाळवलेला उंदीर, पक्षी आमच्या समोर ठेवले ... पाहून कसेतरीच झाले पण तसे काही दाखवले नाही ... ते त्यांच अन्न आहे... कुणाच्या अन्नाला 'ई' म्हणून अपमान करु नये ... हा विचार मनात आला त्यामुळे होस्ट दुखावले गेले नाही....
भारी आहे हा चकना... इथल्या
भारी आहे हा चकना... इथल्या बाटली शौकिन लोकांना द्या हे खायला..
बापरे...खरंच bizzare. मस्तं,
बापरे...खरंच bizzare. मस्तं, वेगळाच अनुभव.
मस्त फोटो. कुणाच्याही अन्नाचा
मस्त फोटो. कुणाच्याही अन्नाचा अपमान करणं शक्य नसल्यानं ई वगैरे म्हनणार नाही.
वर्षू, तु भारी आहेस.. मस्त
वर्षू, तु भारी आहेस.. मस्त फोटो!
अश्विनी फुल्ल फॉर्ममध्ये..
७ वा फोटो बघून पटकन तोंडातून आलच.. "कसा दिला वाटा?"
बाकी ११ व्या फोटोतला खजूर फारच Tempting..
आज केशवीला कोणता कीड़ा चावलाय?
आज केशवीला कोणता कीड़ा चावलाय?

की तिच्या डोक्यात वळवळणारे कीड़े तिला स्वस्त बसु देत नाहीयेत?
किरू.. खजूर, कसा दिला वाटा??
किरू.. खजूर, कसा दिला वाटा?? ..
वत्सला.. मस्त कोटी केलीयेस..
भारी आहेत एकेक प्रतिसाद.
भारी आहेत एकेक प्रतिसाद.
थोडी भर माझीही,
डिनरचा मेनू ठरवताना चिनी बायको आपल्या नवर्याला,
अहो ऐकलत का, आज रात्री किडे करूया का ?
चांगमाई ला दोन महिने म्हणजे
चांगमाई ला दोन महिने म्हणजे खरच धमाल!, मस्तच फोटो.
... कुणाच्या अन्नाला 'ई' म्हणून अपमान करु नये >+१
ई म्हटल्याने अपमान होत असता,
ई म्हटल्याने अपमान होत असता, तर ईमेल हा पुरुषाचा अपमान झाला असता.
दबकत दबकत आले होते आधी, पण
दबकत दबकत आले होते आधी, पण लगेच पळाले.:फिदी: पण अश्विनीचे नाव बघीतल्यावर जरा सरसावुन पोस्ट वाचली.
अश्विनी, हाईट केलीस.:हाहा:
वर्षु, तू हे सगळे बघु शकलीस आणी त्यावर हाईट म्हणजे फोटो काढु शकलीस त्याबद्दल तुझे अभिनन्दन आणी धाडसाबद्दल कौतुक.:स्मित:
वर्षु, भारतात आल्यावर जेवायला
वर्षु, भारतात आल्यावर जेवायला बोलावलसच तर...
केलेल्या पदार्थांचे आधी फोटो काढून दाखव..
वरचे फोटो असतील तरच येईन..
वर्षु ताई तिकडचे चांगले फोटो
वर्षु ताई तिकडचे चांगले फोटो टाकायच्याऐवजी अस्ले किडाळु फोटो काय टाकतेस
मस्त फोटो. ते डीप फ्राईड
मस्त फोटो. ते डीप फ्राईड मसाला भुरभूरवलेले किडे खरंच टेम्पटिंग वाटतायत. किडे म्हटल्यावर हात पुढे जाणार नाही पण फोटो मस्त.
अश्विनी 
हे भगवान! केश्वे जोरातेस
हे भगवान!
केश्वे
जोरातेस
रश्मी आज किड्यांच्या वरताण
रश्मी
आज किड्यांच्या वरताण हायलाईटे,'अश्विनी'
किरू.. तुला मी चीनी वंशीय थाय नागरीक न्हाई ना वाटते मी??
सुशांत, अरे चांगलेच्चेत हे
सुशांत, अरे चांगलेच्चेत हे फोटो.. बघ किती जणांना टेंप्टिंग वगैरे वाटताहेत.. :हीही:
वर्षुताई आता ह्यावर उतारा
वर्षुताई आता ह्यावर उतारा म्हणून तिकडचे निसर्ग फोटो टाका (झाडे, फुले, पाने, जिवंत प्राणी, पक्षी). हे नाही बघू शकत ब्वा.
एकदा डिस्कव्हरीवर कोरियाचा बाजार दाखवला त्यात पण असलं काय काय विकायला होतं आणि लोकं चवीने खात होते.
फोटो इंटरेस्टिंग आणि
फोटो इंटरेस्टिंग आणि प्रतिक्रिया
पाचवा फोटो टेंप्टिंग वाटला पण अमितव म्हणतोय तसं खायचं धाडस नाही होणार.
मागे एका संपादकांनी त्यांच्या जपानवारीबद्दल लिहिताना किस्सा लिहिला होता की डाळमूठ / ड्राय स्नॅक्स सारखा प्रकार दिसला म्हणून विकत घेतलं पाकीट आणि मग नीट निरखून पाहिलं तर त्यात चक्क एक तळलेला डोळा दिसला
केश्विनी, तुमच्या
केश्विनी, तुमच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींनी कीटकरूप धारण केलेलं दिसतंय!
आ.न.,
-गा.पै.
Pages