लहानपणी घरी ,'विचित्र विश्व' नावाचं एक मासिक येत असे.त्यात दुनियाभरातील चित्रविचित्र गोष्टींबद्दल वाचून खूप गंमत वाटायची..पुढे कामानिमित्त देशोदेशी भटकताना बर्याच असामान्य गोष्टीं शी सामना झाला. त्यापैकी विचित्र फूड्स किंवा bizarre foods हे प्रकरण, कधीकाळी डिस्कवरी चॅनेल वर पाहिलेले , अचानक आपल्या डोळ्यासमोर येऊन ठाकले तर कसे वाटेल, याचा मासला इथे देतेय.. यापूर्वी बीजिंग च्या खाऊ गल्ली चे फोटो तुमच्यापैकी काही जणांच्या लक्षात असतील..
यंदाचा पावसाळा,थायलँड च्या उत्तरेच्या टोकाकडील चिंगमाय प्रांतात घालवला. दोन महिने अक्षरश: जीवाची चिंगमाय केल्याने या प्रांताचा कानाकोपरा पाहायला मिळाला. येथील भाजी बाजारात भटकताना मधाच्या पोळ्यापासून ,अनेक प्रकारचे जीव जिवाणू ,कीटक विकायला दिसले.. नंतर कळले कि येथील चीनी वंशीय थाय लोकं
या सर्व वस्तू (?)आवडीने खातात . ( वैधानिक चेतावनी- सी @ युअर ओन रिस्क!! कृपया ,'ई ऊ' न करता पाहणे
)
२
वीकेंड मार्केट मधे खालील वरायटी, मीठ्,मसाला लावून कडक तळलेली दिसली. लोकं मस्तपैकी कुर्रम् कुर्रम करून स्वाद घेत होते..
इस्पेशली चायनीज टूरिस्ट्स् ची टोळधाडच पडली होती या ठेल्यांवर.. मी फोटो काढत असताना, मलाही प्रेमाने
आपल्याजवळच्या पुडक्यांतून देऊ करत होते..
५
मी नुस्तीच फोटू काढतेय म्हटल्यावर आता ठेलेवाला माझ्याकडे रागाने पाहू लागला होता , म्हणून मी निमूटपणे तिकडून काढता पाय घेतला.. दुसर्यांदा चक्कर मारली तेंव्हा त्याने एक कार्डबोर्ड वर ठेवला होता त्यावर इंग्लिश मधे लिहिलेले होते ,' नो फोटो प्लीज'!!! 
अग हा खाऊचा धागा आहे की
अग हा खाऊचा धागा आहे की कॉमेडी? प्रतिक्रिया वाचून वाचून हसू आवरत नाहीये.
तो ५ नंबरच्या किड्यांचा फोटो भडंग वाटतोय.
यम्मी... तेरे मुहं में किडे
यम्मी...
तेरे मुहं में किडे पडे.. ज्याला आवडत त्यानचं फक्त मनाला लावून घ्यावं
ज्याला आवडत त्यानचं फक्त
ज्याला आवडत त्यानचं फक्त मनाला लावून घ्यावं<<<<
मन लावून खावं. मनाला लावून घेणारे आजूबाजूचे..
कि>>रू आता या थ्रेड ला
कि>>रू

आता या थ्रेड ला विनोदी विभागात हलवायचा विचार करतेय , सिरियसली!!
>>>> हातावर चणे दाणे ठेवतात
>>>> हातावर चणे दाणे ठेवतात तसे तुझ्या हातावर चिमुटभर ठेवले नाहीत का येता जाता?>>>>> <<<<<
केश्वे..... अग तिथे तू नव्हतीस ना हातावर चिमुटभर प्रसाद ठेवतात तसा ठेवायला.... मग खाल्ले अस्ते तिनेही.... प्रसाद म्हणून
डब्बल पोस्ट.. उडवली.
डब्बल पोस्ट.. उडवली.
आमच्या चीन भेटीत ज्या
आमच्या चीन भेटीत ज्या पदार्थाचा फुल्ल फॉर्म दिसेल तेवढच खायच, अस ठरवल होत.
भाषांतरसुंदरीने तुमचा कुत्रा पेट म्हणून पाळलाय का म्हणून विचारल होत त्याची आठवण झाली.
इंडोनेशियात आमच्या कॉलनीत लोक घूशी पकडायला यायचे.
अश्वे अग माझ्या रेसिपी किती
अश्वे अग माझ्या रेसिपी किती पाठ करुन ठेवल्यास तू.
ते प्रत्येक किड्यावर कोथिंबीरीप्रमाणे कांदापात टाकलेय का?
त्या मधमाश्या कच्च्या खाल्यात
त्या मधमाश्या कच्च्या खाल्यात का? पोळ भाजीसारख शिजवून खातांना पाहिलंय भारतातच, पण माश्यांना हाकलून
बाकी हे तळलेले किडे लहानपणी लोनली प्लानेट मध्ये बघितल्या जायचे! तेव्हा जाम उत्सुकता असायची कसकाय लागत असेल
मोठ झाल्यावर बेअर ग्रील्स ह्यांनी कच्च किंवा थोडस भाजून मस्त लागतात असे ज्ञान दिले. त्यांच्या मते प्रथिनांचा उत्तम समावेश असतो!
हे अस डीप फ्राय करून पौष्टिक तत्वे संपत नाहीत का
फोटो २ मधे किड्यांबरोबर
फोटो २ मधे किड्यांबरोबर ठेवलेले मश्रूम्स आहेत का?
मधमाश्यांचे पोळे चांगले
मधमाश्यांचे पोळे चांगले लागते. बाकी काही खायचा धीर होणार नाही. फोटो भारी आहेत.
पोळे खातात? हे आताच कळले
पोळे खातात? हे आताच कळले मला.
माझ्या लहानपणी गावाला असताना आमच्याकडे पोळ्याचे छोटे तुकडे गरम पाण्यात टाकत. मग ते वितळून मेण मिळते. छोट्याश्या डबीत ते मेण भरून ठेवीत. कुंकू लावयला या मेणाचा वापर केला जात असे.
स्वाती२.. रिअली?? तू पोळं
स्वाती२.. रिअली?? तू पोळं खाऊन पाहिलंयस?? वॉव..
आर एम डी.. हो मशरूम्स आहेत ते..
पोळं,भाजीसार्खं शिजवून खातात, भारतात ?कुठे, नॉर्थ ईस्ट मधे का??
यस्स.. जागु, पाती चा कांदा च आहे तो..
अनिरुद्ध जी.. स्नॅक्स खाताना प्रोटीन्स ची कोण पर्वा करतं.. मस्त चलते फिरते खात होते सर्व, पॉपकॉर्न सारखे!!
वर्षू नील, महाराष्ट्रातच
वर्षू नील,
महाराष्ट्रातच बघितलं. नागपूर - गडचिरोली रोडवर आदिवासी लोक मध विकायला बसतात कधी कधी. ताजे पोळे उडवून पोळे पिळून मध देतात. मध काढून घेतल्यावर ते पोळ व्यवस्थित ठेवतांना बघितल्यावर मी विचारलं तर त्यांनी सांगितलं की त्याची भाजी करून खातात म्हणे.
बाकी स्नॅक्स खातांना प्रोटीन्स कोणी बघत नाही हेही खरच!
वर्षू, इथे कोंब हनी म्हणून
वर्षू, इथे कोंब हनी म्हणून जो प्रकार मिळतो त्यात मध काढलेला नसतो. मधासकट पोळ्याचा तुकडा असतो. एकदम रॉ हनी. पूर्वी असाच विकायचे. आता हॉबीवाले छोटे बीकिपर महाग एक्स्ट्रॅक्टरमधे गुंतवणूक करण्यापेक्षा असा कोंब हनी विकतात. त्याचे बरेच हेल्थ बेनिफिट असतात म्हणे. एकंदरीत हल्ली इथे बरीच डिमांड आहे.
खत्रा आहे हे
खत्रा आहे हे
घरी एकदा केक मधे झुरळ निघाले
घरी एकदा केक मधे झुरळ निघाले म्हणून बेकरीवाल्याला दाखवायला नेले होते. इथे तसे केले तर म्हणतील खास तुमच्याकरता घातले आहे त्यात. लाडूत बेदाणा जास्त घालतात तसे
लाडूत बेदाणा
लाडूत बेदाणा
बापरे धागा उघडायला नको होता
बापरे धागा उघडायला नको होता ...
लाडूत बेदाणा.. अनिरुद्ध
लाडूत बेदाणा..

अनिरुद्ध , स्वाती२ !! अगदी नवीनच माहिती दिलीत तुम्ही!! मला अजिबात माहीत नव्हती ही गोष्ट!!!
लाडूत बेदाणा ! आता लाडू
लाडूत बेदाणा ! आता लाडू खाताना हा धागा आठवणार !.
मी युकेत असताना चॉकलेट
मी युकेत असताना चॉकलेट हनीकोम्ब बाईट्स पुष्कळ वेळा खाल्ले आहेत. मस्त क्रंची असायचे त्यातले हनीकोम्ब.
)
रेग्युलर चॉकलेट सेक्शनमध्ये मिळाल्यामुळे असेल कदाचित पण तेव्हा त्याच्याकडे 'बिझार फूड' म्हणून पाहिलेच नाही आणि त्यात अळ्याही नसाव्यात ( बहुतेक !
अगो, स्वाती२ आयेम सो प्राऊड
अगो, स्वाती२ आयेम सो प्राऊड ऑफ यू.. तुम्ही ब्रेवली ट्राय केलंय यातील काहीतरी
>>>> खास तुमच्याकरता घातले
>>>> खास तुमच्याकरता घातले आहे त्यात. लाडूत बेदाणा जास्त घालतात तसे <<<<<<
बापरे धागा उघडायला नको होता
बापरे धागा उघडायला नको होता ...>>>+१११११
आता भयानक स्वप्ने पडणार रात्री..
लाडूत बेदाणा
लाडूत बेदाणा
लाडूत बेदाणा !!!! >> हाईट!
लाडूत बेदाणा !!!!
>>
हाईट!
जबरी फोटोज ! मला काही ईईईई
जबरी फोटोज ! मला काही ईईईई वगैरे वाटल नाही .
बाकी लाडूत बेदाणा >>>
Pages