bizarre foods ऑफ चिंगमाय.

Submitted by वर्षू. on 5 October, 2015 - 20:07

लहानपणी घरी ,'विचित्र विश्व' नावाचं एक मासिक येत असे.त्यात दुनियाभरातील चित्रविचित्र गोष्टींबद्दल वाचून खूप गंमत वाटायची..पुढे कामानिमित्त देशोदेशी भटकताना बर्‍याच असामान्य गोष्टीं शी सामना झाला. त्यापैकी विचित्र फूड्स किंवा bizarre foods हे प्रकरण, कधीकाळी डिस्कवरी चॅनेल वर पाहिलेले , अचानक आपल्या डोळ्यासमोर येऊन ठाकले तर कसे वाटेल, याचा मासला इथे देतेय.. यापूर्वी बीजिंग च्या खाऊ गल्ली चे फोटो तुमच्यापैकी काही जणांच्या लक्षात असतील..
यंदाचा पावसाळा,थायलँड च्या उत्तरेच्या टोकाकडील चिंगमाय प्रांतात घालवला. दोन महिने अक्षरश: जीवाची चिंगमाय केल्याने या प्रांताचा कानाकोपरा पाहायला मिळाला. येथील भाजी बाजारात भटकताना मधाच्या पोळ्यापासून ,अनेक प्रकारचे जीव जिवाणू ,कीटक विकायला दिसले.. नंतर कळले कि येथील चीनी वंशीय थाय लोकं
या सर्व वस्तू (?)आवडीने खातात . ( वैधानिक चेतावनी- सी @ युअर ओन रिस्क!! कृपया ,'ई ऊ' न करता पाहणे Proud )




वीकेंड मार्केट मधे खालील वरायटी, मीठ्,मसाला लावून कडक तळलेली दिसली. लोकं मस्तपैकी कुर्रम् कुर्रम करून स्वाद घेत होते..
इस्पेशली चायनीज टूरिस्ट्स् ची टोळधाडच पडली होती या ठेल्यांवर.. मी फोटो काढत असताना, मलाही प्रेमाने
आपल्याजवळच्या पुडक्यांतून देऊ करत होते..





१०

११

१२

१३

मी नुस्तीच फोटू काढतेय म्हटल्यावर आता ठेलेवाला माझ्याकडे रागाने पाहू लागला होता , म्हणून मी निमूटपणे तिकडून काढता पाय घेतला.. दुसर्‍यांदा चक्कर मारली तेंव्हा त्याने एक कार्डबोर्ड वर ठेवला होता त्यावर इंग्लिश मधे लिहिलेले होते ,' नो फोटो प्लीज'!!! Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

#६-१० मध्ये क्रिकेट दिसतायत. मागे शार्क टॅंकमध्ये एक आलेला, बिझनेस प्रपोजल घेउन. त्याने क्रिकेट दळुन केलेल्या पिठाचे प्रोटिन/एनर्जी बार्स बनवले होते. मार्क क्युबन कडुन त्याला फंडिंग मिळालं... Proud

ममो, देवकी Lol
@ राज.. रिअली???

चीन मधे ककून मधून रेशीम काढून घेतल्यावर , रेशमाचे किडे डीप फ्राय करून, तिखट मीठ भुरभुरवून रेस्टॉरेंट्स मधून चखना म्हणून मिळतात.

वर्षू ................. अगं आधी ते शिंक देऊन म्हणयचं नाव..............................क्वांग चौ की काय ते!
आता ही कोणत्या चिंगीची माय.............:फिदी:
आत जाऊन जिवंत झाले तर माणूस वाकडातिकडा नाचत सुटेल.>>>>>>>>>>>>>>> Biggrin
असो...........पण हेही मस्तच!

देवा !!!! दुनिया अजब आहे हेच खरं.

ई कसं आणि का म्हणायचं? बरंच आहे की ते चिनी हे असं पण खातात नाहीतर चिकन, मटण, माश्यांचे भाव अवाच्या सवा वाढले असते.

दुसर्‍यांदा चक्कर मारली तेंव्हा त्याने एक कार्डबोर्ड वर ठेवला होता त्यावर इंग्लिश मधे लिहिलेले होते ,' नो फोटो प्लीज' >>>> वर्षुताई, त्या ठेलेवाल्याच्या भावनांचा विचार करून पुढच्यावेळी सगळं चाखून तरी बघच.

अगं आधी ते शिंक देऊन म्हणयचं नाव..............................क्वांग चौ की काय ते!
आता ही कोणत्या चिंगीची माय... >>>> Rofl मानुषी यु मेड माय डे.

अगं मामे........ती वर्षूच म्हणाली होती तेव्हा की आमच्या गावाचं नाव घेताना आधी शिंक द्यायची.........हो की नाही वर्षू?
Biggrin

अरे वा! फारच तोंपासु.... निदान पाव किलो तरी एकाच प्रकारचे किडे मिळाले तर एकदा नक्की करुन पाहणार. कांद्याच्या पातीचं ड्रेसिंग आहे का किडा फ्रायला? चाट मसाला आणि लिंबू पण पिळलं असेल.

एकाच प्रकारचे अगणित किडे कसे मिळतात त्यांना? खास पैदास करत असतील ना? इकडे झुरळ मिळणंही मुश्किल आहे. २ वर्षांपुर्वी सिंक खालचा पाईप फुटल्याने झुरळ धाड आली होती. पण तेव्हा ही डिश माहित नव्हती. मी आपलं पेस्ट कंट्रोलवाल्याला बोलावून त्यांचा नायनाट केला.

११व्या फोटोत फ्राय केलेले ढेकूण आहेत का?
१२व्या मधले किडे मालत्यांसारखे दिसतायत.
केळीच्या पानांत हा करवंदांसारखा मेवा पाहून ड्वाले पाणावले.
-----------
Uhoh Biggrin

वर्षूताई, मला वरचे फोटो पाहून अज्जिबात ईयू वगैरे नाही झालं. म्हणून तर वरची पोस्ट भंकसमध्ये लिहू शकले Happy

बेफी, अश्वे, मित Rofl

मानु..ते क्वांग चौ नै कै.. छोंग व्हा होतं.. आणी चिउ चाय कौ विसर्लीस का>?? Proud

श्री.. अजूनपर्यन्त या गोष्टीचा पत्ता नाही लागलाय कि कोणते किडे एडिबल न्हाईत.. अ‍ॅक्चुली , ज्या कुण्या प्राण्याची पाठ , सूर्याकडे बघत असते तो प्रत्येक प्राणी, चायनीज मनुष्याकरता एडिबल असतो !!

मामे Lol खरंय ..म्हणूनच चिकन्,मटन चे भाव कंट्रोल मधे आहेत.. ठेलेवाल्याच्या भावना लक्षात घेता , झूम करून काढीन फोटो नेक्स्ट टैमाला.. यावेळी तर मी त्याच्या बंद पिशव्या ही स्वतःच उघडून, फोटो काढण्याचा भार्रीच आगाऊपणा केला होता..

वर्षू, चांग मई मध्ये दोन महिने म्हणजे मस्तच.
मी खाल्ले आहेत वरचे किडे, फोटो नं ५ आणि १२ मधले. फुटाण्याच्या जवळची चव आहे.

नोन्या, साया सूका बन्याक.
सकारांग दिमाना नोन्या वर्षू.

अश्विनी Rofl

र्होड्स सारखी स्कॉलरशिप देऊन दिनेश आणी जागुतै यांना तिथे सहा महिने पाठवायल हवे. मग जागुतै यांचे कोरडी भाजी, पीठ पेरून भाजी, रस्सा, कालवण असे शोध लावतील व दिनेश मस्त प्रेझेंटेशन करून फोटो काढतील. एक कॉफी टेबल बूक तय्यार.

अरे देवा.

आता ईऽ म्हणायचं नाही म्हणुन....

कुणाचं तरी खाणं आहे त्याला वाईट म्हणु नाही... पण तरीपण कसंतरीच झालं. मुळात किड्यांची किळस वाटते त्यामुळे जौदे...

अश्विनी के, Rofl तुझी पोस्ट पाहुन मी पुन्हा एकदा नक्कीच तुच लिहीली आहेस का याची खात्री करायला आयडी पाहीला Lol

Pages