मायबोलीवरील दिशाभूल करणारी शीर्षके

Submitted by मामी on 3 September, 2011 - 09:21

ही शीर्षके वाचून सगळ्यात आधी मनात काय आलं माहिते?

तुझा खेळ सारा
घरात मुलाने पसारा कसा केलाय याचं आईनं केलेलं वर्णन

वन बीचके फ्लॅट भाड्याने, साड्यांचा सेल लागलाय!!!
छोट्या जाहिराती चुकून नविन लेखनात आलेल्या दिसतायत!

पलाट साडेबाराचा
ते शाळेत असताना 'रेल्वे प्लॅटफॉर्मवर १ तास' असे निबंध लिहायचो ना? त्याचच एक व्हेरीएशन - 'रेल्वे प्लॅटफॉर्मवर रात्री साडेबारा वाजता'

हरवलेले शब्द
अल्झायमर झालेल्या रूग्णाची रोजनिशी

काय गुण सांगू माझ्या सालीचे
नारळातील खोबर्‍याने आपल्या कवचाबद्दल गायलेले स्तुतीकाव्य

आंबोली सुंदर नाही - अस्मिता
अस्मिता नावाच्या आंबोलीत राहणार्‍या आयडीने पर्यटकांना रोखण्यासाठी लिहिलेला लेख

कळेना खरे ओळखावे कसे?
लहानपणी लग्न झालेल्या सौ खरे आपल्या पतीच्या घरी पहिल्यांदा गावाहून एकट्याच मुंबईत आल्या आहेत. हातात फक्त लग्नातला श्री खर्‍यांचा फोटो आणि पत्ता. त्यांच्या हालअपेष्टांचे वर्णन. (शेवट अर्थात गोड!)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी वाट आहे काढली नेईल जी माझ्याकडे

'इस मोड से जाते है' चा फसलेला ( व काही शब्द चुकलेला) अनुवाद आत असेल असे वाटले होते Happy

'सुप्रसिध्द पशु-पक्षी' >>>> मामींनी उघडलेला हा धागा बघितला.
रानडुक्कर, घुबड, कावळा याबद्दल काही माहिती वाचायला मिळेल या उत्सुकतेने उघडला.
पण................... मामी निराश केलंत !

मामी, या बाफचंच शीर्षकदेखील दिशाभूल करणारं आहे! Happy ते 'शीर्षक वाचून झालेली दिशाभूल' असं काहीसं हवं होतं.
आ.न.,
-गा.पै.

माझ काय चुकलं:-
मला हे लिहिणार्या काहीतरी व्यक्तिगत समस्या share करत आहेत असे वाटले...
या नावाची अशीच एक ट्रॅजिडी वाली मालिका पण होती...
पण पुढे आहार पाककृती वाचल मग समजल.. Happy

मामी,

दस्तुरखुद्द मायबोलीचं शीर्षक बघा : Marathi footsteps around the world

आणि गुग्गुळाचार्यांनी लावलेला अर्थ बघा इथे :

footsteps2.JPG

मस्त दिशाभूल केलीये गुग्गुळाचार्यांची! मानलं बुवा मायबोलीला!! Lol

आ.न.,
-गा.पै.

माझा आवडता आयडी या बाफचं नाव दिशाभूल करणारं आहे. खरंतर या शीर्षकातच माझा नावडता आयडी दडलेला आहे. मी वंदनाताईंचे फॅन्स वाढत आहेत असा उल्लेख केल्याबरोबर त्याचा धसका घेऊन हा उपद्व्याप सुरू केला गेला असावा.

माझ्या घरातिल नविन सदस्य
>>

मला वाटले की नुकत्याच जन्मलेल्या बाळांचे फोटो असतील

दुप्पट प्रेम
गणितातला तोंडी हिशेब - उदा.
एका प्रेयसीवर एक प्रेम तर दोन
प्रेयश्यांवर किती?
(हाच हिशेब पुढे चालवत नेला तर
चोविसपट प्रेमं ही सापडतील)>>
हे ग्रेटचे!

ही भर माझ्याकडून

१. bootle feeding sodvnya sathi - एक मैत्रीण
बॉटल फीडींग सोडवण्यासाठी मिळालेली एक मैत्रीण

२. नेहमी गर्दी तुला जी लागते
अशा ट्रेनमध्ये तु का चढते

३. आय मेड अ मिस्टेक
चेतन भगत अवतरले की काय मा.बो.वर असे वाटले होते शीर्षक वाचून 3 mistakes of my life नंतरची अजुन एक मिस्टेक Uhoh

अपूर्ण मी तुझ्याविना हि कथा मी काही दिवासापुर्वी लिहत होते , काही वयक्तिक कारणास्तव मी ती लिहण बंद केल तर एका मायबोली करणे मला प्रतिसाद दिला ----- " अपूर्ण मी तुझ्याविना ... हे कथा बोलत आहे का ?" Happy

गुगल सर्च इंजिनात ठराविक काळाने माझे नाव टाकून शोध घेऊन बघत असतो. आज असाच शोध घेतला असता हा धागा सापडला. स्वाती_आंबोळे यांनी माझ्या शोकांतिकेचा उल्लेख केलाय.

खरं तर या लेखिका स्वाती_आंबोळे यांनी देखील असा एक दिशाभूल करणारा धागा टाकलाय.

वसंता आणि त्याची सेना (http://www.maayboli.com/node/15344)
एखाद्याला वाटेल की वसंत दादा पाटील आणि शिवसेना यांच्या मधूर संबंधावर आधारित लेख आहे की काय? पण त्यात तसं काही नाहीये.

हे पण पहा मधे हे दिसलं !! भन्नाट धागा Proud

आणि बाजूला तडका : नैसर्गिक हाहाकार हे पण दिसलं Uhoh

सध्याचे हे शीर्षकः गर्भसंस्कार

शीर्षकावरून असे वाटतेय की गर्भसंस्कारांची माहीती देणारा लेख आत असेल. पण आहे त्याच्या विरोधात. Proud

पण आहे त्याच्या विरोधात. >>> कोणी आज पहिल्यांदा तो धागा पाहिला तर प्रतिसादांची संख्या बघून हे लक्षात येईलच

Pages