मायबोलीवरील दिशाभूल करणारी शीर्षके

Submitted by मामी on 3 September, 2011 - 09:21

ही शीर्षके वाचून सगळ्यात आधी मनात काय आलं माहिते?

तुझा खेळ सारा
घरात मुलाने पसारा कसा केलाय याचं आईनं केलेलं वर्णन

वन बीचके फ्लॅट भाड्याने, साड्यांचा सेल लागलाय!!!
छोट्या जाहिराती चुकून नविन लेखनात आलेल्या दिसतायत!

पलाट साडेबाराचा
ते शाळेत असताना 'रेल्वे प्लॅटफॉर्मवर १ तास' असे निबंध लिहायचो ना? त्याचच एक व्हेरीएशन - 'रेल्वे प्लॅटफॉर्मवर रात्री साडेबारा वाजता'

हरवलेले शब्द
अल्झायमर झालेल्या रूग्णाची रोजनिशी

काय गुण सांगू माझ्या सालीचे
नारळातील खोबर्‍याने आपल्या कवचाबद्दल गायलेले स्तुतीकाव्य

आंबोली सुंदर नाही - अस्मिता
अस्मिता नावाच्या आंबोलीत राहणार्‍या आयडीने पर्यटकांना रोखण्यासाठी लिहिलेला लेख

कळेना खरे ओळखावे कसे?
लहानपणी लग्न झालेल्या सौ खरे आपल्या पतीच्या घरी पहिल्यांदा गावाहून एकट्याच मुंबईत आल्या आहेत. हातात फक्त लग्नातला श्री खर्‍यांचा फोटो आणि पत्ता. त्यांच्या हालअपेष्टांचे वर्णन. (शेवट अर्थात गोड!)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आंबोली सुंदर नाही - अस्मिता
अस्मिता नावाच्या आंबोलीत राहणार्‍या आयडीने पर्यटकांना रोखण्यासाठी लिहिलेला लेख.>>>>>>

Biggrin

सही Lol

मामी Lol

ही आणखी काही

तुझ्या चाहुलीचा कधी भास होतो
>>> दाखवा चांगल्या डॉक्टरला

क्षण एक पुरे जगण्यास खरा
>> झाला का एक क्षण? मग मर की आता.

तुझ्या पावलांचे
>>> ढुंगणावर ठसे काढायला पाहिज्येत.

शेवटी संपायला आलीच ही एकांकीका
>>> नशीब!

तुझा हात सोडुन जावे कुठे?
>>> मसणांत जा! हा काय लोचटपणा आहे!!

मऊ मखमाली गवतावर हिरव्या...
लगेच खाली
एक रक्ताचा ओघूळ... का का का?

ही घ्या अजून :

सारे प्रवासी घडीचे
ओरीगामी स्पर्धा (इति नंद्या Proud )

दुप्पट प्रेम
गणितातला तोंडी हिशेब - उदा. एका प्रेयसीवर एक प्रेम तर दोन प्रेयश्यांवर किती?
(हाच हिशेब पुढे चालवत नेला तर चोविसपट प्रेमं ही सापडतील)

राजहंस मी!
बालगंधर्वांवर लिहिलेल्या पुस्तकाचे टायटल

Happy सहिये

मामी Biggrin

हे घ्या:

लग्नातल्या गमतीजमती"
चला आता काही दिवसांनी "लग्नानंतारच्या गमतीजमती" पण वाचायला मिळतील Light 1 Biggrin

Pages