'अशी ही अदलाबदली' - पाककृती क्र. ५ - ओटसचे मोदक

Submitted by जर्बेरा on 27 September, 2015 - 11:33

ओटॅपल (Oat + Apple) पाय/ क्रम्बल

बदललेले पदार्थ:

१) दुधी ऐवजी १ सफरचंद
२) गुळाऐवजी अर्धी वाटी मेपल सिरप (Grade A Dark Amber)

साहित्य:

१) एक वाटी ओट्स् आणि ४-५ बदाम, ४-५ अक्रोड घालून केलेले पीठ
२) अर्धी वाटी ओलं खोबरं (खरवडून)
३) तीन चमचे (tbsp) साजूक तूप
४) अर्धा चमचा वेलची पूड
५) मीठ चवीनुसार

तेलाची गरज पडली नाही.

क्रमवार कृती:

१) अवन २०० डिग्री सेल्सियस वर प्रिहिट करायला ठेवा.
२) ओटस, बदाम, अक्रोड एकत्र करून त्याचे पीठ करा आणि तूप घालून हाताने एकत्र करा. इथे तूप घट्ट असायला हवे, नसल्यास आधी फ्रीज मध्ये ठेऊन घट्ट करू शकता.
३) एका जाड बुड्याच्या भांड्यात एक सफरचंद पातळ तुकडे करून टाका आणि त्यात २ चमचे (tbsp) पाणी घालून गॅसवर ५-६ मिनिटे ठेवा.
४) सफरचंदाचे पाणी गाळून त्यात मेपल सिरप, वेलची पूड आणि खोबरे टाकून अलगद हाताने एकत्र करा.
५) पाय डिश मध्ये ओटसचे मिश्रण लावा. ते लावण्याआधी भांड्याला थोडे तूप लावणे गरजेचे आहे.
६) कडेने पीठ लावल्यावर त्यात सफरचंदाचे मिश्रण घाला. वरतून त्याला आवरण घालू शकता.
७) अवन मध्ये १८० डिग्री सेल्सियस वर २०-३० मिनिटे ठेवा.
८) मेपल सिरप, आईस क्रीम किंवा व्हिप्ड क्रीम सोबत सर्व्ह करा.

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

टीप:

अवन मध्ये ४० मिनिटे बेक करूनही पीठ पायला हवे तसे खुसखुशीत (आकार आणि crispiness) नाही झाले. पीठ, मऊ राहिले, मात्र पूर्णपणे शिजले.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

है शाब्बास जर्बेरा ! मस्त.

ही अ‍ॅपल पायपेक्षा अ‍ॅपल क्रंबलची रेसिपी होईल. अजूनही वेळ गेली नसेल तर शीर्षकात बदल करु शकतेस.
अर्थात क्रंबलचे कव्हर थोडे खुसखुशीत, कुरकुरीत असे असते. ह्याच ओट्सच्या मिश्रणात थोडे वितळवलेले बटर वगैरे घातल्यास तसे होईल बहुधा.

खरेतर मला पाय करायचा होता पण... आता प्रोब्लेम ऑट्सच्या पिठात आहे की माझ्या रेसिपीत आहे मला माहित नाही. पण पिठाचाही थोडा प्रॉब्लेम असावा. कारण आईची रेसिपीची जरा...... गडबडली. Happy Happy

अ‍ॅपल क्रंबल, पाय प्रकार आवडतात, त्यामु़ळे नक्की करून बघणार.

पायक्रस्ट साठी पीठात ग्लुटेन हवे. ओटस मध्ये ग्लुटेन नसल्याने इतर बाईंडिंग एजंट वापरावा लागणार. अंडे घालून जमेल बहुतेक. (अर्थात ह्या स्पर्धेसाठी नाही चालणार.)

Novel idea, for binding you can use flax seeds powder, mixed with water. It works like egg.