देई मातीला आकार -इशिका

Submitted by uju on 26 September, 2015 - 11:21

हा आमचा पेपेर मॅशे वापरून बाप्पा बनवायचा प्रयत्न.
पेपर मॅशे बनवण्यासाठी रद्दी पेपरांचे तुकडे करून ते पाण्यात ४-५ दिवस भिजत ठेवले मग मिक्सर मधून त्याचा लगदा करून घेतला ( ते काम अर्थातच आईने केल ).हा तो लगदा.

नंतर तो लगदा १ दिवस वाळवला अन परत मिक्सरला फिरवला.

असा मस्त कापूस तयार होतो त्या पेपरचा. नंतर त्याच्यात मैदा आणि खळ घालून मस्त मळून गोळा तयार करून घेतला.

अन मग त्याचा असा बाप्पा बनवला.
मला चेस खेळायला खूप आवडते, मग काय बाप्पा पण माझ्याबरोबर चेस खेळायला आले.

रंगकाम पूर्ण झाल्यानंतरचे चेस प्लेयर बाप्पा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Bapre
Ishu ___/\___
Dandavat
Apratim ahe he sagalach... Kalpana,kam,jidd,chikati,bappa
Sagalyala salam

सगळ्यांना धन्यवाद !
आणि बाप्पा एव्हढे आरामात बसलेत कारण एक सॉलिड मूव्ह खेळून आपोनन्टची आता मी कोणती मूव्ह घेऊ अशी झालेली हालत बघायला बाप्पाला जाम मजा येत आहे - इति इशिका Biggrin

मस्त इशिका...
इशिकामुळे..पेपरंमॅशेची क्रुति कळली... आणि इतक्या मेहनती नंतर... इशिकाचा बाप्पा मात्र आरामात बसलाय... Happy

अरे वा, मस्त बनवला आहे बाप्पा. शाब्बास इशिका Happy

खळ आणि मैद्याचं प्रमाण आणि खळ कशी बनवली हे लिहाल का? आम्हाला असले messy उद्योग करायला आवडतात.
रंगवायच्या आधी किती तास सुकू दिलं?

Pages