रंगरेषांच्या देशा - तुझे रूप चित्ती राहो

Submitted by मामी on 23 September, 2015 - 09:14

केव्हाची मधुबनी स्टाईलमध्ये एखादं चित्रं रंगवायची इच्छा होती. या गणेशोत्सवातील या उपक्रमामुळे छान संधी मिळाली.

नेटवरून मधुबनी स्टाईलमध्ये एक गणपती सिलेक्ट करून घेतला. ठोबळमानानं तो मनात धरून त्यावरून मी गणपती चितारला. अर्थात ही शुद्ध मधुबनी आर्ट नाहीये कदाचित. हे फ्युजन असेल फारतर.

कागद : अजय पाटील यांच्या जलरंग शाळेकरता आणलेला तसाच पडून होता. हा कागद ३०० GSM चा आहे. आकार - ३७.५ x २७ cms

रंग : पोस्टर कलर्स - Chrome Yellow Deep Hue, Crimson, Poster Green
याशिवाय गणपतीच्या ठळक रेषांसाठी PikPens permanent marker -500, आतील नक्षीसाठी Staedtler triplus fineliner आणि इतर काही ठिकाणी Staedtler Lumocolour permanent markers वापरले आहेत.

या स्टेप्स :

हा रंगवण्यापूर्वीचा गणपती (वरच्या कोलाजमधील शेवटचा) :

आणि हा पूर्ण झाल्यावर :

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी,

तुझा हा धागा बघितल्यावर मला आठवलं ... माझं चित्र टाकायचं राहिलयं...

धन्स.. गं . तुझ्यामुळे.. ते काम पुर्ण झालं...:)

आणी बाप्पा... सुन्दर... ते झीरो च्या ब्रश ने केलेलं काम कित्ती पेशन्स लागतात त्याला... बाबो.

धन्यवाद.

आणी बाप्पा... सुन्दर... ते झीरो च्या ब्रश ने केलेलं काम कित्ती पेशन्स लागतात त्याला.. >>> नाही गं. ते ब्रशनं नाही केलंय. बारीक नक्षीकामासाठी Staedtler triplus fineliner वापरलंय.

वॉव. मस्त दिसतंय चित्र. मला रंगवलेलं आवडलंच शिवाय त्या पिवळ्या रंगामुळे जुने लोकचित्र असल्याचा एक वेगळाच फिल येतोय तो आवडला.

Pages