कथासाखळी - वरदान

Submitted by संयोजक on 22 September, 2015 - 01:53

कथासाखळी किंवा एस टी वाय म्हणजे स्पिन द यार्न!
धागा गुंडाळा.
थोडक्यात,एक सुरूवात देऊन मग बाकीच्यांनी आपापल्या कल्पनाशक्तीने गोष्टं थोडी थोडी पुरी करायची.

===========================================================================

तुम आ गए हो नूर आ गया है
नहीं तो चिरागों से लौ जा रही थी
..
घराच्या बेलच्या सहा-सात ट्यून्स्‌पैकी नेमकी हीच ट्यून चंद्रकांताच्याच एंट्रीला कशी काय वाजते, याचं दीपाला नेहमी नवल वाटायचं. चंद्रकांता आली, टकटक आवाज करणार्‍या चपला कोपर्‍यात काढताकाढताच सरकवल्या. खांद्यावरची पर्स तिथेच भिंतीला लावून ठेवली. ओढणी काढून त्यावर पांघरली. चटचटा आत शिरत म्हणाली,
"आजच्या भाजीचं नाव काय ताई?"
दीपा म्हणाली, "ओट्यावर काढून ठेवलीये. आज तीन पोळ्या कमी कर."
"का? बाहेर जाणारेत वाटतं संध्याकाळी? मग भाजी पन कमी लागंन ना?"
"नाही, भाजी नेहमीसारखीच कर. आज बंटीच्या बाबांना दुपारी गरम फुलके करून देईन म्हणते."
"वा! जरा कंदीमंदी घरच्या लक्ष्मीचा हात लागला ओट्याला तं अन्नपूर्णा प्रसन्न होत आसंन", कणीक मळता मळता तोंडभरून हसत चंद्रकांताने कमेंट पास केली. दीपा कसंनुसं हसत बंटीला उठवायला गेली.

बंटी शाळेत आणि बंटीचे बाबा आवरून अॉफिसला निघाले. चंद्रकांताचा स्वयंपाक आटपला होता. केसांना फायनल टचप करून ओढणी सारखी करत तीही निघाली. दीपा जणू त्या सगळ्यांनाच 'बाय' करायला दारात आली होती. सगळे गेल्यावर दार लावून घेतलं. जरा सोफ्यावर बसून अंग टाकणार तोच तिला एका घमघमत्या सुगंधानं वेढून टाकलं. नेहमीच्या पर्फ्यूमचा, टाल्कम पावडरचा, आफ्टरशेव्ह लोशनचा किंवा साबणाचाही सुवास नव्हता तो. स्वयंपाकघरात गोडाधोडाचा स्वयंपाक करताना जसा एक स्वादिष्ट, रुचकर दरवळ घरभरून राहतो तसा सुगंध होता तो. शेकडो धूप एकदम लावल्यावर जसं स्वर्गीय वातावरण निर्माण होईल तसं दीपाचं घर ढगासारखं हलकं, पांढरंशुभ्र दिसायला लागलं. भिंतींचे रंग, त्यावरच्या फ्रेम्स्, नेहमीच्या ओळखीच्या वस्तूंवर कुणीतरी जाडसर कापसाची दुलई टाकली आहे, असं वाटत होतं. हे सगळं स्वप्न आहे की सत्य, असा विचार करत असतानाच दीपाला स्वयंपाकघरात प्रखर प्रकाश भरून राहिला अाहे, असं दिसलं. तसा उजेड तर तिने दुपारी बाराच्या उन्हातही पाहिला नव्हता. आश्चर्यानं संमोहित झाल्यासारखी ती स्वयंपाकघराच्या दिशेनं ओढली गेली.

स्वयंपाकघराच्या दारात दीपाचे पाय जागीच थिजले. समोरचं दृश्य पाहून तिला भोवळच आली. हे असं न भूतो न भविष्यति आपल्याच बाबतीत, आपल्याच घरात का, हा पहिला विचार सवयीनं तिच्या मनात शिरला. तिच्यासमोर त्या प्रकाशात एक अत्यंत तेजस्वी अशी स्त्री उभी होती. सोन्याच्या वर्खाचा लाल शालू नेसून, दागिने लेऊन ती प्रसन्नवदना स्त्री एखादी देवीच दिसत होती. तिच्या केसांत रत्नांची फुलं होती. हातांत माणकांच्या बांगड्या. गळ्यातल्या हिरेमोत्यांच्या सरींचाच तो पांढरा शुभ्र प्रकाश होता. तिची कांती दुधासारखी गोरीपान आणि सायीसारखी मऊसूत होती.त्यावर कपाळावर केशराच्या काडीने रेखलेली चंद्रकोर आणि मुखावर तृप्तीची झळाळी! ते दैवी रूप पाहून दीपाने नकळत हात जोडले. तशी ती देवी हसून उत्तरली ,
"ये बाळ! अशी स्तिमित होऊ नकोस. मी देवी अन्नपूर्णा. तुझ्यावर प्रसन्न झाले आहे. "
दीपाने देवीच्या चरणकमलांवर मस्तक ठेवलं. देवीनं तिला उठवून आपल्या वत्सल स्पर्शानं गोंजारलं.
"मी तुला तीन वर देऊ शकते. पण एका वेळी एकच. " आपल्या केसांतलं एक रत्नजडीत फूल तिला देत देवी पुढे म्हणाली, " हे फूल ओंजळीत घेऊन डोळे मिटून माझी प्रार्थना केलीस की, मी वर देण्यास प्रकट होईन. मात्र माझं हे रूप फक्त तुलाच दिसेल बरं! वरदानांची अट एवढीच की दुसरा वर मागितलास की पहिल्याचा प्रभाव संपुष्टात येईल. तेव्हा नीट विचार करून वर माग. तथास्तु!"
इतकं बोलून देवी अंतर्धान पावली. तो लख्ख उजेडही हळूहळू कमी झाला. घरावरची कापसाची दुलईही अदृश्य होत गेली. घर पूर्वीसारखे दिसू लागले. पण तो विलक्षण दैवी सुगंध मात्र दीपाच्या विचारचक्रासारखा रेंगाळत राहिला.

=========================================================================

नियमावली:

१) कथेचा शेवट अतिरंजीत चालेल पण पटेल असा असावा
२) आपण लिहिलेला प्रसंग आधीच्या प्रसंगाला पुढे नेणारा आणि सुसंगत असावा.
३) आधीच्याने लिहिलेला प्रसंग, 'हे सगळं स्वप्नात झालं' असं पुढच्याने म्हणून त्याची मेहनत वाया घालवू नये. थोडक्यात, स्वप्न पडणार असतील, तर ती अधिकृत ज्याची त्याने स्वतःच्या प्रसंगातच रंगवावी.
४) चारपेक्षा जास्त नवीन पात्रांचा एका प्रसंगात नव्याने परीचय करून देऊ नये.
५) स्थळ, काळ, वेळेचं भान ठेवावं.

============================================================================

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साक्षात अन्नपुर्णेनं तीन तीन वर दिले तरी त्याचं नक्की काय करावं हे दीपाला समजेचना. रोजचं स्वयंपाकपाणी चंद्रकांताकडून करून घेणं इतकं अंगवळणी पडलं होतं. सकाळी उठून स्वतःचा कोरा चहा करून घेणे इतकाच तिचा संबंध "स्वयंपाका"शी उरला होता. चहा झाला की यंत्रवत तिच्या हालचाली सुरू होत. फ्रिझमधून दूध काढून ठेवणे, त्या दिवशी करायची भाजी, वरण-आमटीसाठी एखादी डाळ, कोशिंबीर नाही तर सॅलडसाठी आणखी एखादी भाजी, कणकेचा डबा. सगळे जिन्नस ओट्यावर मांडले की चंद्रकांता बाकीचा कारभार शिस्तीत पार पाडे. चंद्रकांताची सुट्टी असेल त्या दिवशी बंटीचे बाबा कुलकर्ण्यांकडून मिसळ नाही तर साबुदाण्याच्या खिचडीचं पार्सल नाष्ट्यासाठी आणत. जेवणं बाहेरच होत. काही न सुचून तिनं स्वतःच्या नकळत चहासाठी आधण ठेवलं. पाणी उकळलं तरी ती विचारातच हरवली होती. वरच्या मजल्यावरून चर्र आवाज आला आणि पाठोपाठ हिरवी मिरची-कडिपत्त्याच्या फोडणीत कांदा परतल्याचा सुवास. पोहे? सांजा?? अहं! फोडणीचा कुस्करा!!! कित्येक वर्षांत केला किंवा खाल्लाच नाहीये. रोज मोजून तीन लोकांच्या घासभर सुद्धा अन्न उरणार नाही अशा बेतानं करून घेतलेल्या स्वयंपाकातून कुठून आल्यात पोळ्या उरायला. पोळ्या परतल्याचा खमंग वासामुळे दीपाला काही सुचेनासं झालं. उगाच नाही मनोहर नाव पडलं ते असं स्वत:शीच पुटपुटत असतानाच तिनं निर्णय घेतला आणि फूल ओंजळीत घेऊन डोळे मिटून अन्नपुर्णेचं स्मरण केलं.......

"देवी अन्नपुर्णे, जेव्हा केव्हा मी फ्रिजचं दार उघडेन तेव्हा तिथे मनोहरानं शिगोशीग भरलेले कमीत कमी दोन तरी डबे असू देत"

तिनं असं म्हणायचा अवकाश की साक्षात देवी प्रकट झाली.

"बाळा, फारच लवकर आठवण केलीस. बरं मला एक सांग, दोन डबे कशासाठी गं हवेत?"

"बंटीचे बाबा कधी-कधी वर्क फ्रॉम होम करतात. ते घरी असतील आणि मला मनोहराची हुक्की आली तर माझ्या वाटेस अर्धाच डबा येइल ना?"

("कार्टे, शिळ्या पोळीचा कुस्कुरा काय तो स्वतःच्या नवर्‍याला देववेना होय?" - देवी मनातल्या मनात)
"बाळा, अगं पतीदेव आहेत ते तुझे, तुझं कर्तव्यच आहे मिळालेली प्रत्येक गोष्ट त्यांच्याशी वाटून घेणं"

"देवी, नो ऑफेन्स पण मनोहर is too precious to share with anyone"

आता यापुढे काय बोलावं न उमजून देवीनं दीपाला हवा असलेला वर दिला आणि ती अंतर्धान पावली.

.

अवांतर :

त्या दिवसापासून झालं काय की दीपाच्या वरच्याच मजल्यावर राहणार्‍या मनोहरच्या घरात हाहा:कार उडाला. मनोहर बिचारा एकटाच राहत असे. रोज सकाळी उठून साग्रसंगित स्वैपाक करून एक पोळीभाजीचा आणि एक आमटीभाताचा डबा असे दोन डबे भरगच्च भरून तो ऑफिसला जात असे. घरी कोणी नसल्याने तो उशीरापर्यंत कामं करत राही आणि त्यामुळे दोन दोन डबे शिगोशीग भरून घेऊन जाई.

दीपाला वर मिळाल्यापासून तिच्या वरच्या मजल्यावर राहणार्‍या मनोहरचे डबे गायब होऊन दीपाच्या फ्रीजमध्ये प्रकट होऊ लागले.

अधिक अवांतर :

त्या दिवसापासून झालं काय की समस्त जगातले मनोहर नामक पुरुष गायब झाले नि दीपाच्या फ्रीजमधल्या डब्यात सूक्षरुपात प्रगट झाले. मनोहाराची आठवण काढून जरी दीपाने वर मागितला असला तरी देवी अंतर्धान पावल्यावर आपण एक वर असाच फुकट घालवला हे तिच्या लक्षात आले नि वैतागून मनोहरांच्या डब्यांकडे सरळ दुर्लक्ष करून तिने उरलेली दुपार TV समोर लोळण्यात घालवली. मधेच कधीतरी तिला डुलकी लागली असावी कराण ती जागी झाली ती कोणाच्या तरी ओरडण्याने.
दचकून जाग्या झालेल्या तिने ओरडण्याचा आवाज कुठून आला ह्याचा अंदाज घेतला. 'किचन, नक्कीच किचन' मधून आला हा आवाज म्हणत तीने तिकडे मोर्चा वळवला ......

मामी हा घे फुलटॉस आहे Wink

किचनमधून आवाज तर येत होता कुजबुजल्यासारखा पण कुठून येत असेल हे आधी काही तिच्या लक्षात आले नाही.
पण भूक लागल्याने ती मनोहराच्या डब्याकडे व़ळली.
सूक्ष्म रुपातले सगळे मनोहर आत्ता पोळीच्या तुकड्याच्या रुपात होते. तिने एक चमचा घेऊन् त्यात एक तुकडा घेतला, मनभर निरखला . हिर्‍याचे पैलू निरखावेत तसा!
मग नाकाजवळ जेऊन त्याचा वास घेतला . अन आता खाणार तोच ..!.
तिच्या रसरशीत ओठांचा स्पर्श त्या तुकड्यास झाला मात्र , अन काय चमत्कार !
"फाट्ट" असा आवाज येऊन तो तुकडा अंतर्धान पावला. खोलीत धूर झाला. अन धूर विरल्यावर तिथे तिला एक देखणा तरुण उभा असलेला दिसला !! देखणा असला तरी याक्षणी त्याच्या अंगावर एक टॉवेलव्यतिरिक्त काहीही कपडा नसल्याचे दीपाच्या लक्षात आले!
व्हॉट द????!! ती चित्कारली !!
तो तरुण म्हणाला " फायनली !!दीपा!! केव्हाचा तुझ्या चुंबनाची वाट पहात होतो !! "
"एक्सक्यूज मी!!" दीपा खेकसलीच!! "आहेस कोण तू अन इथे काय करतोयस? अन चुंबन ... ई काय मराठी बावळटपणा आहे हा! "
" मी मनोहर"
"तरीच! नावावरूनच म.म. .. ..."
"हो नावावरूनच झालेला घोटाळा आहे हा!" मनोहर मधेच बोलला
पण पुढे काही बोलायच्या आत " तेरी नीयsssssत खराssssब है " असं गाणं जोरजोरात वाजायला लागलं! - बॉलिवुड ट्युन्स पैकी नेमके नको ती घेऊन घराची बेल वाजली होती !! दीपा अन मनोहर दोघे दचकले !!
कोण असेल !!

>>>घराच्या बेलच्या सहा-सात ट्यून्स्‌पैकी नेमकी हीच ट्यून चंद्रकांताच्याच एंट्रीला कशी काय वाजते, याचं दीपाला नेहमी नवल वाटायचं.<<<

हे आणि

>>>वरदानांची अट एवढीच की दुसरा वर मागितलास की पहिल्याचा प्रभाव संपुष्टात येईल. तेव्हा नीट विचार करून वर माग.<<<

हे वाचल्यानंतर तीन वर सुचले ते असे:

मी केलेला स्वयंपाक बंटीच्या बाबांना अजिबात आवडू नये

बंटीचे बाबा घरात असतानाच चंद्रकांताची एण्ट्री व्हावी

चंद्रकांताची एण्ट्री होण्याआधी बंटीचे बाबा घरातून बाहेर पडलेले असावेत

-'बेफिकीर'!

मै, Biggrin

मै आता त्याला ट्रांसिस्टर कोण देणार ? Lol

अवांतर :
कोण असेल !! * इथे कर्णकर्कश्य संगीत*
कोण असेल !! *इथे फोकस दीपाच्या उजव्या भुवईवर*
कोण असेल !! *इथे फोकस मनोहरच्या चेहर्‍यावर*
कोण असेल !! *इथे फोकस दीपाच्या डाव्या भुवईवर, ती थोडी वर उचललेली आहे*
कोण असेल !! *इथे झूम आऊट करून मनोहरचा छातीपर्यंतचा शॉट*
कोण असेल !! *इथे फोकस बंद दरवाज्यावर *
कोण असेल !! *इथे झूम आऊट करून मनोहरच्या कंबरेपर्यंतचा शॉट*
कोण असेल !! *इथे झूम आऊट करून दीपाचा फुल शॉट*
कोण असेल !! *इथे झूम आऊट करून मनोहरच्या ............. पोटावर गोंदलेल्या चित्राचा शॉट*
"अहो उशिर व्हायच्या आधी लवकर दरवाजा उघडा" दाराबाहेर उभी असलेली व्यक्ती आता ठणाणा करतेय.
आवाज ओळखीचा वाटत नाही हे लक्षात आल्याने दीपाने मनोहरला किचनमधेच थांबायला सांगत निर्धास्तपणे दरवाजा उघडला. बाहेर तीन-चार जणांचा घोळका अस्वस्थपणे उभा होता. चेहरे घामाघूम.
"आपण कोण ? काय हवाय तुम्हाला ?"
"आम्हि २०१५ माबो गणपती संयोजक आहोत"
"कोण आहात तुम्ही ?" दीपा पूर्णपणे बुचकळ्यात पडलेली होती
"अहो ते मह्त्वाचे नाही. तुम्ही हे घ्या नि त्या किचनमधे असलेल्या मनोहरला हे योग्य जागी नीट धरून ठेवायला सांगा. अहो आमचा गणेशोत्सव PG आहे. उगाच गडबड नको"
त्यातल्या म्होरक्याच्या हातात एक वस्तू होती, जी त्याने दीपाच्या हातात बळेच ढकलली.
ती वस्तू होती ट्रांसीस्टर !!! Wink

'टॉवेल कुठे होता ?' हे नमूद न केल्याने ट्रान्झिस्टर दिला Lol

पोटावर गोंदलेल्या चित्राचा शॉट >> हे DJ नि HH ला आमंत्रण दिलाय Wink

त्या म्होरक्याच्या हातातला ट्रांझीझ्टर मनोहरनी खसकन ओढून घेतला आणि 'स्ट्रॅटेजिकली ' धरला.

अमितव : टॉवेल गुंडाळला आहेस तर तिथे कशाला धरला आहेस?
मनोहरः म्हण्जे ही वस्तू 'झाकायसाठी' आहे?
आशूडी : काहीही हं मनोहर...
दीपा : ए तुझं नाव जान्हवी का गं?
आशूडी : (एक तु. क. देत ) आशूडी.. बरं ! ते जाऊ दे. मनोहर, त्या वस्तूचा उपयोग नं गाणी ऐकायसाठी......
मनोहर : माय गॉड! मग या ऐवजी आमीरखानकडे आयपॉड असता तर?.....

देवी माते! फोडणीच्या पोळीतून रणबीर आणि आमीर! लोणचं घाला आता त्यांचं, लिहा पुढे. Lol
मैत्रेयी,.तू पहिली कथासाखळी ज्या अजब वळणावर नेली आहेस ती पण सोडव. Happy

मै, Biggrin

मामी ऑनलाइन आलेली दिसतेय. लिहा हो मामी. मी रात्री लॉगिन केलं तर खरडेन.

'स्ट्रॅटेजिकली ' धरला. >>> Rofl

खरच अवांतर,
pk चे 'ते' पोस्टर लॉन्च zale त्यावेळी मी त्या पोस्टरचे वर्तमानपत्रात आलेले वर्णन(!) वाचले. तोपर्यन्त मी पोस्टर पहिलेले नव्हते.
त्यात असे लिहिलेले होते कि त्याने फक्त ट्रांज़िस्टर वापरून स्वतःची राखलेली आहे.
मी नेमका इलेक्ट्रॉनिक्स चा विद्यार्थी, माझ्या डोळ्यासमोर तो आमचा लॅब मधला छोटासा ट्रांज़िस्टर आला (तो पार म्हणजे टिकली एवढा पण नसतो). मी एकदम अवाक् zalo..
यार म्हणल एवढंस्स याला पुरलच कस.?
म जालावर घाबरत घाबरत ते पोस्टर शोधले तेव्हा अस्मादिकांस लक्षात आले कि यात रेडियोला ट्रांज़िस्टर म्हंण्यात आलेले आहे ..
म्हणल नशिब. नाहीतर फारच वाताहत zali असती प्रेक्षकांची ..

Pages