टिकलेल्या गणेशोत्सवाची शान : मुंबईचे खर्या मानाचे तीनगणपती.

Submitted by मी दुर्गवीर on 20 September, 2015 - 10:12

" परंपरा जपणारे गणेशोत्सव "

मुंबईचा पहिला गणपती : केशवजी नाईकचाळ १२३ वे वर्ष (स्थापना : १८९३)
मुंबईचा दुसरा गणपती : जितेकरवाडी १२२ वे वर्ष (स्थापना : १८९४)
मुंबईचा तिसरा गणपती : कामतचाळ १२० वे वर्ष (स्थापना : १८९६)

कालचा दिवस एक विलक्षण क्षण होता . सकाळी ऑफिस ला निघातांनाच ठरवले होते . संपूर्ण दिवस सार्थकी घालवायचा . दुपारी ऑफिस मधील मैत्रीनीसोबत गिरगावात आलो . गिरगाव म्हणजे हक्काची जागा खुप काही नात या गिरगावाशी आणि येथील लोकांशी जोडले आहे .
खेतवाडीच्या १०व्या गल्लीत गौरी गणपती निम्मित नैवद्या वर ताव मारून पुढे आलो .
01-IMG_20150919_144421.jpg

गिरणगाव पायी हिंडने म्हणजे हळू हळू गतकाळाचे दिवस समोर येऊ लागतात. एक एक वाडी , चाळी त्यांचा नाव वाचत वाचत पुढे होत राहिलो , एथेही प्रॉपर माणसाला पत्ता विचारण्याचे कसब पाहिजे . नाहीतर वेळ आणि माणुस चुकतो .
चाळी जवळ पोहचलो आणि "मुंबईचा पहिला गणपती " असा फलक समोर दिसला .
07-IMG_20150919_155931.jpg
चाळकऱ्यांची कसली तरी लबगसुरु होती . चाळीच्या मुख्य पटंगनाचा
मध्यभागी "गणेश " विराजमान होते .
08-IMG_20150919_155954.jpg
लहान लहान मुल शर्यतीचा खेळ खेळीत होते , मुंबईतील इतर ठिकाणी होणारी गर्दी अजिबात नाही पण इथे मिळणारी भक्ती ही कुठे नाही , मी संपूर्ण चाळ मधेच उभा राहुण पाहत होतो . तो सुरवातीचा काळ कसा असले , काय काय घडले असेल याचे गणित मांडीत होतो. तितक्यात एक गोडस लेकरु जवळ येऊन बोलल "दादा कोण पाहिजे , बाप्पा समोर आहे . तिच्या तो चेहऱ्या वरील मुद्रा अजुन खुप चांगल्या लक्षात आहे , ती मला बाजुला करण्याचा प्रयत्न करत होती मग लक्षात आले की मगाशी सुरु असलेली लगबग "रांगोळी स्पर्धे साठी होती " खिश्यातुन मेलोडी काढून त्या लेकरुच्या हातात दिला , हसत हसत ते Thnks दादा बोलून गेल ..

१२३ वर्षाचे मंडळ नव्या जुन्या आणि येणाऱ्या पुढच्यापिढीला आपले वारसा देत होते .
02-IMG_20150919_155527.jpg04-IMG_20150919_155609.jpg05-IMG_20150919_155719.jpg
मंडपा समोर एक बाबा साफ सफाई करत होते . त्यांना नमस्कार केला आणि "पहिल्या गणपतीचे दर्शन घेतले , काय तो विलक्षण राजशाही थाट , रुबाब , कानातील झुलणारी बाली चेहरयावर स्मित हास्य
सगळ काही प्रफुल्लित करणारे होते ....
तासभर तेथेच रेंगाळत होतो . जाता जाता स्थानिक चाळकऱ्यांना धन्यवाद बोलून भेट घेतली . धन्यवाद कश्यासाठी या प्रश्नाला उत्तर इतकेच " आजही तुम्ही तीच परंपरा आणि संस्कृति टिकवून आहत .

टिळकांच्या जीवनातील प्रमुख घटना मुंबईतच घडल्या उत्सवातून लोकसंघटन शक्ती निर्माण करणे या हेतुसाठी "गाभाऱ्यातील गणपती रस्त्यावर आला"
टिळकांची खरी ताकद त्यांच्या सोबत असलेल्या लोकजनतेवर होती , यांच्याशक्ती मुळेच पुण्यात तीन ठिकाणी आणि गिरणगावातील केशवजी नाईक चाळीत गणेशउत्सवाला सुरवात झाली , या पहिला वहिला मान लाभेलेला गणेशउत्सवाची स्थापना १८९४ झाली आणि टिळक चाळीत आले ते २५ ऑगस्ट १९०९ ला .
केशवजी चाळीतुन खुप सुंदर आठवण घेऊन बाहेर पडलो .
कर्यक्रम पत्रिका :
06-IMG_20150919_155844.jpg

Fecebook वर एका मित्राच्या एक Comment वरुण दुसऱ्या आणि तिसऱ्या गणपतीची माहिती मिळाली .त्या क्षणी ठरवले होते कोणत्याच "राजाचे दर्शन नाही घेतले तरी "इथे कपाळ टेकवाणार
बाहेर पडताच क्षणी विचारात विचारत चाळी समोर आलो .
16-IMG_20150919_163159.jpg
मुंबईचा दूसरा गणपती हा फलक समोर लागल होता . आता गेलो "गिरगावातील जुण्याचाळी अजूनही "स्थितप्रज्ञ" उभ्या आहेत ..
13-IMG_20150919_161819.jpg14-IMG_20150919_161926_0.jpg
कुठेही अती रोशनाई नाही स्पीकर बाज नाही . नाही कसली गर्दी नाही "भ्रष्टलोकांचे " फलक नाही ,
चाळीच्या एका कोनाडयात एक छोटसे मंडप होते . Normal Spot Light मारलेला गणपती बाप्पा दिसले , आता येताच दोन "शांत पोर " हॉलिजन " चालूबंद करण्याचा खेळ खेळत होती .
त्यांच्या शांतपनाचे गुपित असे की "Light चालु मधे गणपती बाप्पा छान दिसतो तर दूसरा बंद केल्यावर वर चांगला दिसतो .दोघांना न दुखवता चालु आणि बंद मधे 'बाप्पाचे ' फोटो टिपले , संपूर्ण मंडळाच्या या कर्ताधर्ता धडाधडीच्या पोरांसोबत एक फोटो काढून मुंबईच्या तिसऱ्या गणपतीच्या दर्शनाला बाहेर पडलो

10-IMG_20150919_161508.jpg11-IMG_20150919_161649.jpg

शांत पोर आणि मी
12-IMG_20150919_161709.jpg
गिरगावात " कामतचाळ " मधे मुंबईचा तीसरा गणपती बसतो हे बहुदा इथे कामकरणाऱ्या आणि सध्याच्या गिरगावकरांना महितच नसावे , एका गांधी टोपी वाल्याबाबांनी खालच्या हात वरचा हात करत चाळीचा रस्ता दाखवाला , Left Right ची सवय पडलेल्या आपल्या लोकांना अश्या रस्त्याची सवय नसते ..
चाळीसमोर आलो "कामतचाळ " नावाचा अधूर सा फलक दिसला . आता शिरल्यावर गणपती इथे बसतो का ? हा प्रश्न पडतो खरा कारण आपल्या सारख्या सगळ्या लोकांना "मोठ्या आवजातील गाणे " नको तिथे रोशनाई , भक्तांच्या मोठ मोठाली रांगा" दीसल्या शिवाय आपल्याला Feeling च येत नाही ना ,
डाव्या हाताने आत आलो .चाळीत मध्य भागी एक स्टेज दिसला आणि काही काका लोक चर्चा करीत बसली होती , त्यांना या स्टेजच्या मागे गणपती असावे असा अंदाज लावला आणि पुढे आलो पण बाप्पाचे भव्य मंडप नाही ना , ऊंची गाठलेले बाप्पा नाही . तितक्यात एक बाबांना विचारेल ' गणपती बाप्पा कुठे आहे ? . त्यांच्या डाव्या बाजूला हात दाखवीत मला पुढे केले तरी बाप्पा दिसेना , बाप्पा कडे हात दाखवत त्या बाबानी मला अवाकच केले .
उजव्या बाजूच्या छोटास्या बंदिस्त मंदिरामधे बाप्पाचची नितान्त सुंदर आणि गोड मुर्ति होती ..
१२० वर्ष जुन्या बाप्पाच्या थेट पायी पडलो . एका बाळा ने अक्खा मोदक हातात ठेवला ....
18-IMG_20150919_163925_HDR.jpg19-IMG_20150919_163956_HDR (2).jpg
थोड्यावेळ चाळकऱ्यासोबत बोलत बसलो , गणपती विषयी अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या ,
बोलता बोलता एक प्रश्न केला तुम्ही रायगडारील मुर्ति पाहिली आहे का ? मी हो म्हणताच ते म्हणाले ज्यांनी ती मूर्ती घडवली ते इथेच राहायचे , मी चटकन बोलून बसलो "सहस्त्रबुद्धे " का ? त्यांनी मान डोलावुन होकर दिला ..
ज्यांनी रायगडावरील मुर्ति अजरामर केली त्यांच्या चाळीत मी बसलो होती . ते हयात असु पर्यन्त गणपतीची मूर्ती ही तेच घडवीत ..
मनो मनी मी स्वतःला खुप भाग्यवान समजत होतो , तब्बल तास भर गप्पा रंगल्याहोत्या , तेवढ्यात ज्या मित्राच्या Comment मुळे मी एथ वर आलो तोही अचानक भेटला तो Rohan Dilip Damushte इथे राहतो याची कल्पना अजिबात नव्हती . दोन एक वर्षा पुर्वी दादरला Amit मुळे भेटलो होता ...आज तो या चाळीचा धडाधडीचा कार्यकर्ता आहे ....
- एक चाळकरी04-IMG_20150919_155609.jpg

मित्रांनो Global होण्याच्या नादात आपण आपली संस्कृतीच नाश नाही करत ना ? हा प्रश्न स्वतःला ला करा , आजही गिरणगावत १०० वर्ष पूर्ण झालेली पंधरा एक मंडळ आपले अस्तित्व आणि संस्कृती टिकवून आहे .माझ्या सर्व मुंबईकर असलेल्या टेंभा मिरवणाऱ्या मित्रांनो येथील "टिकलेल्या गणेशोत्सवाची शान "नक्की अनुभवा आणि हो इथे .. अजिबात लाईन नाही हा , नाही टिकिट आणि वट लागते ...
येथील चाळसंकृतीत टिकलेल्या "गणेशबाप्पाचे दर्शण नक्की घ्या .
- एक चाळकरी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे कमाल अनुभव!
हे इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद ..

यंदाच्या गणितात नाही बसत पण पुढच्या वर्षी हे गणपती नक्की करणार .. करायचा प्रयत्न करणार

चांगली माहिती आणि आढावा. पण साहेब, गिरगांव आणि गिरणगांव हे मुंबईचे दोन वेगळे भाग आहेत. लालबाग, परळ (एलफिस्टन, लोअर परेल) हा भाग गिरणगांव म्हणुन ओळखला जातो...

छान आढावा घेतला आहे. या चाळी, गिरगाव/गिरणगाव/दादर हे भाग आमच्या सारख्या अमुंबईकरांसाठी केवळ अश्या लेख/साहित्यातूनच माहिती होतात. यांचा इतिहास जेमतेम गेल्या १२५/१५० वर्षांचा आणि तरी कितीतरी वादळी

मनपुर्वक धन्यवाद हो !!

दिनेश दा , हा घोळ माझा नेहमीच आहे .. तरी सुधारण्याचा नेहमी हा प्रयत्न असतो .

राज दा , हा हि माझ्या त्या घोळातील एक भाग आहे . Biggrin Biggrin :

हे माहित नव्हतं.. खुप खुप धन्यवाद.

आधी मनात आलं फेसबुकवर या लेखाची लिंक शेअर करुया, पण मग म्हंटलं नको... गिरगावकरांच्या शांततेत भंग नको. Happy

गिरगांव आणि गिरणगांव हे मुंबईचे दोन वेगळे भाग आहेत. > +१

केशवजी नाईक चाळ, जितेकर वाडी ह्या वाड्यांमध्ये येणं जाणं होतं. त्यामुळे दरवर्षी तिथले गणपती बघितले जायचे. केना चाळ आणि जितेकर वाडीत मैत्रिणी होत्या आणि कामत चाळीतील गणपती कारखान्यातून आमच्या वाडीचा सार्वजनिक गणपती यायचा. आमचा पण घरगुतीच असायचा.

मामी, गिरगावातील बर्‍याचश्या वाड्यांमध्ये सार्वजनिक गणपतीही घरगुती पद्धतीनेच गणपती बसतात. फक्त खेतवाडीच्या गल्ल्या, निकदवारीलेन, मुगभाट गणपती मोठे असतात. अमक्या गल्लीचा राजा वगैरे फॅशन सुरु झाल्यावर हे झालं.

व्वा! दुर्गवीर तुमच्या मुळे आज मुंबईतील तीन मानाच्या गणपतींबद्दल छान माहिती मिळाली. खरंच साधेपणातच सौंदर्य सामावलेले आहे. तुम्हाला लाख लाख धन्यवाद!!!

दुर्गवीर,

अतीव सुंदर. तुमच्या हौसेचं कौतुक आहे! Happy इतिहास आपणच सांभाळून ठेवायला हवा हे पटलं.

आ.न.,
-गा.पै.